घोषणा
● प्रकाशन देणगीः
मार्च: जुन्या १९२ पानांच्या पुस्तकांची सादरता. दोन १२ रुपये, किंवा एक ६ रुपये.
एप्रिल: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ३५ रुपयांना द्या, लहान आकाराचे २० रुपयांना. जेथे हे प्रकाशन नाही तेथे खास सादरतेच्या १९२ पृष्ठांच्या दोन जुन्या पुस्तकांपैकी एक ६ रुपयांना द्या. प्रादेशिक भाषेत एक खास सादरतेचे पुस्तक सहा रुपयांना द्या.
मे व जून: द वॉचटावर याची एका वर्षाची वार्षिक वर्गणी ५० रुपयांसाठी. सहा महिन्याची तसेच महिन्याला एकदा प्रकाशित होणाऱ्या मासिकाची वार्षिक वर्गणी २५ रुपये. (मासिक रुपाने प्रसिद्ध होणाऱ्या अंकासाठी सहा महिन्याची वर्गणी नाही. जेथे वर्गणी प्राप्त होत नाही तेथे दोन मासिके व एक माहितीपत्रक असे मिळून ८ रुपयांना द्यावे.)
जुलै: ट्रु पीस पुस्तक. जेथे हे उपलब्ध नाही तेथे “तुझे राज्य येवो” हे १२ रुपयांना द्यावे.
● मंडळीतील सचिव व सेवा देखरेखे यांनी एकत्रपणे सर्व नियमित पायनियरांच्या कार्याची उजळणी करावी. कोणाला तासांचे नेमलेले ध्येय पुरे करण्यास अडचण असेल तर त्यासंबंधाने वडीलांनी मदतीची व्यवस्था करावी. संस्थेची पत्रे (एस-२०१) ऑक्टोबर १, १९८९चे व ऑक्टोबर १, १९९० यांची उजळणी मार्गदर्शनासाठी करावी. तसेच आमची राज्य सेवा ऑक्टोबर १९८६ च्या पुरवणीतील १२-२० परिच्छेद पहा.
● पायनियर कार्याविषयी पुढील संस्मरण देण्यात येत आहेः
○ कोणा नियमित पायनियराने आपली पायनियर सेवा बंद केली असता मंडळीला त्याविषयी घोषणा करावी. या छोट्याशा घोषणेत हे साधेपणात सांगता येईलः “मंडळीला हे कळविण्यात येत आहे की, [नाव] आता नियमित पायनियर म्हणून सेवा करीत नाही.”
○ नियमित पायनियरांच्या वार्षिक तासांचे ध्येय अद्याप १,००० तासांचे आहे.
○ न्यायालयीन वाग्दंड दिला गेला किंवा मंडळीत परत घेण्यात आले आहे त्यानंतर पूर्ण वर्ष गेल्यावरच एखाद्याला साहाय्यक किंवा नियमित पायनियरींग कार्यासाठी विचार करता येईल.—पहा आमची राज्य सेवा पुरवणी, ऑक्टोबर १९८६, परिच्छेद २१ व २३.
● स्मारक विधीचा समारंभ शनिवार, मार्च ३०, १९९१ रोजी होईल. भाषणाची सुरवात जरी लवकर केली तरी कृपया हे लक्षात असू द्या की, स्मारक विधीची भाकर व द्राक्षारस या बोधचिन्हांचे फिरविणे हे सूर्यास्त होत नाही तोपर्यंत करू नये. तुमच्या वसाहतीत हा सूर्यास्त केव्हा आहे ते स्थानिक उगमांपासून मिळवा. क्षेत्रकार्याच्या सभेशिवाय इतर कोणतीही सभा त्या दिवशी चालवू नये. ज्या मंडळ्यात शनिवारी नियमित सभा होत असतात अशांनी त्या शक्य आहे तर इतर दिवशी आटोपून घ्याव्या. रविवारच्या सभेत बदल होऊ देऊ नये.
● एप्रिल व मे मध्ये साहाय्यक पायनियरींग करू इच्छिणाऱ्या बांधवांनी आत्ताच योजना आखावी आणि लवकरात लवकर अर्ज द्यावेत. यामुळे वडीलांना आवश्यक त्या क्षेत्र कार्यविषयक योजना आखता येतील आणि पुरेसा प्रकाशन साठा उपलब्ध करून देता येईल.
● नवी प्रकाशने उपलब्धः
हाव कॅन ब्लड सेव युवर लाईफ? —इंग्रजी
तुम्ही त्रैक्य मानावे का? —कोकणी (केएन) कोकणी (केटी), बंगाली
यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ् (लहान) —कन्नड, हिंदी, मराठी
● प्रकाशने पुन्हा उपलब्धः
लर्न टू रिड ॲण्ड राईट् —इंग्रजी
“राज्याची ही सुवार्ता” —मराठी
पृथ्वीवर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! —मराठी