रक्ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? या माहितीपत्रकाच्या अभ्यासासाठी प्रश्न
या अभ्यासामध्ये काही ठिकाणी पृष्ठ २७ ते ३१ मधल्या पुरवणीचा उल्लेख केला आहे. तेथील उचित परिच्छेदांवरील उत्तरांचा समावेश त्या त्या अभ्यासात करावा. वेळ उपलब्ध असल्यास पुरवणीतील परिच्छेद वाचावे.
पहिला आठवडा
पृष्ठ २
१-४. रक्ताने जीवन वाचू शकते याचा विचार करण्याची ही योग्य वेळ का आहे? (पृष्ठ २७, परिच्छेद १-३ पहा.)
पृष्ठ ३
१, २. जीवनाचा रक्ताशी संबंध असल्याचा दृष्टीकोण का स्वाभाविक आहे व या बाबतीत देव कसा गोवलेला आहे?
३, ४. रक्ताविषयी देवाचे विचार काय आहेत यात आपण आस्था का ठेवावी?
५. उत्पत्ती ९:३-६ कडे आपण कोणत्या कारणांमुळे लक्ष द्यावे व त्या उताऱ्याचे महत्त्व काय?
६. रक्ताबद्दल इस्राएल लोकांवर काय बंधन होते?
पृष्ठ ४
१, २. प्राचीन इस्राएल लोकांना देवाच्या नियमांचा कसा फायदा झाला, परंतु इस्राएलांनी रक्त टाळण्याचे प्रमुख कारण काय होते?
३. आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये रक्ताबद्दलच्या नियमाकडे कशा दृष्टीने पाहिले जात होते?
पृष्ठ ५
१, २. रक्ताच्या नियमाबद्दल येशूने कोणते उदाहरण घालून दिले?
३, ४. (अ) ख्रिस्ती लोक व रक्त यांच्याविषयी प्रेषितांच्या कार्यकारी समितीने काय ठरवले? (ब) रक्त वर्ज्य करण्याचा हुकुम अगदी तात्पुरता होता किंवा नाही हे आपल्याला कसे कळते?
५. येशूच्या प्रेषितांच्या मते रक्त टाळणे हे किती महत्त्वाचे होते?
६, ७. रक्ताबाबतचा हुकुम कायमचा बंधनकारक असल्याचे कोणता अधिक पुरावा दाखवतो?
पृष्ठ ६
१, २. ख्रिस्तपूर्व काळात औषध म्हणून रक्ताचा उपयोग कसा केला गेला?
३. रोमी काळात अगदी औषध म्हणून देखील रक्ताच्या वापराला सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांची प्रतिक्रिया कशी होती?
४-६. (अ) रक्त संक्रमणाचा वापर कसा सुरु झाला? (ब) देवाचा नियम लक्षात घेता शिरेत रक्ताचे संक्रमण करणे चूक का होईल?
७. यहोवाचे साक्षीदार रक्त संक्रमणाला का नकार देतात? (पृष्ठ २७, परिच्छेद ४-६ व पृष्ठ २८ परिच्छेद १ पहा.)
८. ख्रिस्ती लोकांनी रक्त संक्रमण टाळण्याचे प्रमुख कारण धार्मिक असले तरी रक्ताच्या उपाय योजनेची वैद्यकीय बाजू आपण का पारखली पाहिजे?
दुसरा आठवडा
पृष्ठ ७
१, २. आधुनिक वैद्यकात रक्त संक्रमणाचे कोणते स्थान आहे?
३, ४. रक्त संक्रमणे धोकादायक आहेत किंवा नाहीत याचा उहापोह करणे का वाजवी आहे?
पृष्ठ ८
१. रक्त संक्रमणाविषयी आपण बुद्धिमानपणे काय विचारावे?
२, ३. रक्ताचा गट ओळखणे व त्यांची परस्पर जुळणी या गोष्टी अत्यंत क्लिष्ट असल्या तरी पुरेशा असतातच असे का नाही?
४, ५. रक्त संक्रमणामुळे प्रतिक्षमतेच्या समस्या कशा उत्पन्न होऊ शकतात?
६, ७. कर्करोगासाठी शस्त्रक्रिया केल्यानंतर रक्त संक्रमणाने कोणता अपाय होऊ शकतो?
पृष्ठ ९
१. रक्त संक्रमण व कर्करोगासाठी केलेल्या शस्त्रक्रियांबद्दल असलेल्या पुराव्याचे महत्त्व काय?
२, ३. संक्रमणाने प्रतिक्षमताविषयक आणखी कोणता अपाय होऊ शकतो?
४, ५. संक्रमणापासून होणाऱ्या रोगांच्या लागणीच्या धोक्यांबद्दल लोकांना माहिती असण्याची गरज का आहे?
पृष्ठ १० (चौकट)
१, २. संक्रमणातून होणाऱ्या काविळीची लागण होण्याचा धोका किती गंभीर आहे?
३. रक्तापासून होणाऱ्या काविळीच्या लागणीच्या धोक्यावर मात करण्यात आली आहे असे एका वेळी का वाटले?
४, ५. रक्तापासून काविळीची लागण होण्याच्या धोक्याकडे दुर्लक्ष करता येत नाही असे कोणत्या घटनांमुळे सिद्ध झाले?
६-८. काविळीबद्दलची चिंता भूतकाळात का जमा झालेली नाही?
पृष्ठ ११
१. रक्तामुळे होणाऱ्या रोगांचा धोका संपत आलेला नसल्याचे कोणत्या उदाहरणाने दिसून येते?
२-४. आपल्या वसाहतीत सर्वसामान्य नसलेल्या रोगांच्या धोक्याला रक्त संक्रमणामुळे लोकांना कसे तोंड द्यावे लागू शकते? (पृष्ठ ११ वरील चौकटही पहा.)
५-७. नव्या प्राणघातक रोगांचा संबंध रक्ताशी असू शकेल हे एडस्च्या साथीने कसे दाखवून दिले आहे?
परिच्छेद ८ व पृष्ठ १२
परिच्छेद १. एडस्च्या विषाणूच्या (व्हायरसच्या) अँटीबॉडीज् शोधण्याच्या परिक्षांचा उपयोग केल्यानंतरही रक्त धोक्यापासून मुक्त असल्याची हमी का देता येत नाही?
२-४. या बाबतीत धोका फक्त एडस्चाच नाही असे का?
५, ६. रक्तातून पसरणाऱ्या विषाणूं (व्हायरस) बद्दल विशेषज्ञांना कोणत्या साधार चिंता आहेत?
तिसरा आठवडा
पृष्ठ १३
१, २. उत्तम प्रतीची वैद्यकीय सेवा कोणाला हवी आहे व त्यात कशाचा समावेश आहे?
३-५. रक्ताच्या संक्रमणाला पर्याय असल्याचे तुम्ही सादोहरण कसे दाखवू शकाल?
६-८. अनेकदा रक्ताचे संक्रमण केव्हा केले गेले आहे, परंतु या प्रथेला पक्का आधार का नव्हता?
पृष्ठ १४
१. हिमोग्लोबिनची पातळी सामान्यपेक्षा कमी असली तरी चालू शकते असे कशाने दिसून येते?
२, ३. झपाट्याने रक्त गेल्यास कशाची गरज असते व ह्या समस्येवर कसा उपाय करता येतो?
४. रक्ताची जागा भरून काढणारे रक्तहीन द्रव परिणामकारक का असतात?
५. लाल पेशी गमावल्याने झालेले नुकसान हाताळण्यास डॉक्टर रूग्णाची मदत कशी करू शकतात?
पृष्ठ १५
१. लाल पेशींचे उत्पादन जलद होण्यासाठी काय करता येते?
२-४. शस्त्रक्रियेच्या वेळी रक्त गमावण्याचे प्रमाण कमी कसे करता येते?
पृष्ठ १६
१-३. संक्रमणाविना मोठ्या शस्त्रक्रिया करणे शक्य असल्याचे कोणत्या पुराव्याने दिसून येते?
४-६. रक्त न वापरता किती वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करणे शक्य आहे? (पृष्ठ २८ परिच्छेद २-४ पहा.)
पृष्ठ १७
१. रक्त न देता केलेल्या हृदयाच्या शस्त्रक्रियांमध्ये कोणते चांगले परिणाम प्राप्त झालेले आहेत?
२-४. रक्तहीन शस्त्रक्रियांमध्ये अनुभवास येणाऱ्या उत्तम परिणामांना स्वतः साक्षीदार रुग्ण कसा हातभार लावतात?
चौथा आठवडा
पृष्ठ १७
५, ६. जोखिम/फायदे परिक्षण म्हणजे काय व त्याचा उपयोग कसा केला जातो?
पृष्ठ १९
१, २. जोखिम/फायदे परिक्षणात रुग्ण कोणती भूमिका करतो?
३-५. धोके व फायद्यांचा तौलनिक विचार करताना त्यात रक्ताच्या उपाय योजनेचा अंतर्भाव का करण्यात आला आहे? (पृष्ठ ३१ परिच्छेद १, २ पहा.)
६. वैद्यकीय उपाय योजनांमध्ये निवड करण्याच्या तुमच्या हक्काला कोणते कायदेविषयक तत्त्व लागू होते? (पृष्ठ ३० परिच्छेद १-८ पहा.)
पृष्ठ १८ (चौकट)
१-४. वैद्यकीय व्यवसायातील लोकांना कायदेविषयक चिंतातून मोकळे करण्यासाठी साक्षीदार असलेले रुग्ण काय करतात? (पृष्ठ २८ परिच्छेद ५ पहा.)
५-७. कायदेविषयक चिंतांचे निरसन करण्यासाठी साक्षीदार जे करतात ते लक्षात घेता, डॉक्टर व इस्पितळांनी सहकार्य देणे वाजवी का आहे?
पृष्ठ २०
१-३. साक्षीदारांनी घेतलेल्या भूमिकेला वैद्यकीय व्यवसायातील काही लोकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली आहे?
४, ५. साक्षीदार असलेल्या काही रुग्णांच्या बाबतीत न्यायालये कशी गोवली गेली आहेत?
परिच्छेद ६ व पृष्ठ २१
परिच्छेद १: साक्षीदार व रक्त गोवलेल्या बाबी हाताळण्यासाठी न्यायालयाकडे धाव घेणे हा सर्वोत्तम उपाय का नाही?
२, ३. रुग्ण लहान मूल असले तरी न्यायालयाकडे वळणे, कोणत्या कारणामुळे अनुचित आहे?
४, ५. मुलांसाठी वैद्यकीय उपाय योजनेची निवड करताना पालकांचा कोणता हक्क कार्यान्वित होतो? (पृष्ठ २८ परिच्छेद ६ व पृष्ठ २९ परिच्छेद १ पहा.)
परिच्छेद ६ व पृष्ठ २२
१-३. आपल्या मुलांसाठी वैद्यकीय निर्णय घेण्यास आईवडील स्वतंत्र असावेत असे सूचित करणाऱ्या काही कायदेविषयक गोष्टी कोणत्या?
४. साक्षीदार आईवडील व वैद्यकीय व्यवसायातील लोकांनी एकत्रितपणे काम का करावे?
पाचवा आठवडा
पृष्ठ २२
५, ६. रक्त व रक्तहीन वैद्यकीय उपाय योजनांची साक्षीदारांची मागणी याविषयी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत?
पृष्ठ २३
१-३. रक्त नाकारल्यामुळे कोणी मृत्युमुखी पडले तरी आपण कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये? (पृष्ठ २९ परिच्छेद २-५, व पृष्ठ ३१ परिच्छेद ३-५ पहा.)
४, ५. मृत्यु व रक्त यांच्या बाबतीत एक वास्तववादी दृष्टीकोण कोणता आहे?
पृष्ठ २४
१, २. रक्त खरोखर जीव कसा वाचवू शकते याचे मर्म जाणण्यास आपल्याला कशाची मदत होऊ शकते?
३, ४. ख्रिस्तपूर्व काळात रक्ताबद्दल देवाचा दृष्टीकोण काय होता व का?
पृष्ठ २५
१. प्रायश्चित्ताच्या दिवसाशी रक्त कसे गोवलेले आहे व त्यामध्ये आपण आस्था का ठेवावी?
२, ३. प्रायश्चित्ताच्या दिवसाचा व येशूच्या भूमिकेचा परस्पर काय संबंध आहे?
४. (अ) ख्रिस्ती लोक कोणत्या महत्त्वाच्या कारणासाठी रक्त वर्ज्य करतात? (ब) रक्त संक्रमणाच्या धोक्यावर आपण जास्त भर का देऊ नये?
५, ६. (अ) रक्ताचा, देवासमोर असणाऱ्या आपल्या स्थानाशी कसा संबंध आहे? (ब) रक्ताबद्दलच्या आपल्या दृष्टीकोणाचा गाभा कोणती शिकवण आहे असे आपण समजावे?
७. रक्ताविषयी साक्षीदारांच्या भूमिकेने जीवनाबद्दल आदर प्रदर्शित होतो असे आपण का म्हणू शकतो?
पृष्ठ २६
१, २. आपल्या सार्वकालिक भविष्यामध्ये रक्त कसे गोवलेले आहे?