ईश्वरशासित वृत्त
◆ अलास्काने जुलैमध्ये २,०५३ प्रचारकांचे नवे शिखर गाठले, ही गेल्या वर्षीच्या सरासरीपेक्षा १२ टक्क्याची वाढ होय. जुलैमधील “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनाची सर्वाधिक उपस्थिती २,९२९ होती व ५० लोकांचा बाप्तिस्मा झाला.
◆ ब्राझिलने जुलैमध्ये आपला २,९३,४६६ प्रचारकांचा सर्ववेळेचा उच्चांक स्थापित केला; हा सेवावर्षातील नववा उच्चांक आहे. याशिवाय ३,६९,९९९ पवित्र शास्त्र अभ्यासाचा नवा उच्चांक देखील कळवण्यात आला.
◆ फिजीने जुलैमध्ये १,५३४ प्रचारकांचा अहवाल कळवून सलग असा ६७ वा उच्चांक स्थापिला. पवित्र शास्त्राभ्यासांची संख्या २,६०५ वर गेली.
◆ दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागाकडील फ्रेंच गियाना या देशात सप्टेंबर १९९० पासून वॉचटावर संस्थेचे एक शाखा दप्तर आहे. त्यांनी जुलैमध्ये ६६० प्रचारकांचा नवा उच्चांक कळविला आहे; तेथील प्रांतिय अधिवेशनाला १,४७९ इतकी उपस्थिती होती व ४१ जणांचा बाप्तिस्मा झाला.
◆ ग्वाडेलोपच्या चार प्रांतिय अधिवेशनाची एकंदर उपस्थिती १३,०२१ इतकी होती आणि २५९ जणांचा बाप्तिस्मा झाला. तेथील प्रचारकांचा उच्चांक ६,२३३ असा आहे.