शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
जानेवारी ७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ८० (६२)
१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. सप्ताहाच्या शेवटी मासिक वितरणामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या मासिकातील विशिष्ट मुद्यांची चर्चा करा.
२० मि: “सुवार्ता सादरता—युवकांना.” प्रश्नोत्तराने विचारविनिमय. परिच्छेद ५ चा विचार करताना एक प्रचारक नवयौवनास पुस्तकाची सादरता करीत आहे असे प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि: एक वडील व दोन किंवा तीन लायक प्रचारक यंग पीपल आस्क पुस्तकाची चर्चा करतात. थोडक्यात पुस्तकातील दहा विभाग ठळकपणे मांडा. निवडक अध्यायांवर विचारविनिमय करा. पृष्ठ २७ वर दाखविलेल्या चित्रांसारखी प्रभावी चित्रे विचारात घ्या. पुस्तकाच्या समयोचित सल्ल्याविषयी विचार करावा असे युवक, पालक व इतरांना उत्तेजन द्या. सर्वांनी क्षेत्र कार्यासाठी या पुस्तकाची सादरता करण्यासाठी तयारी ठेवावी.
गीत ४० (३१) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी १४ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ७६ (६१)
१० मिः स्थानिक घोषणा. मंडळीचा जमाखर्च अहवाल तसेच अनुदानाची पोच वाचून दाखवा. बांधवांनी “अनीतीकारक धना”चा योग्य उपयोग केल्याबद्दल त्यांची प्रशंसा करा. (लूक १६:९; इन्साईट-२, पृ. ८०६)
२० मिः “युवकांना उपद्रवापासून दूर राहण्यास मदत देणे.” प्रश्नोत्तराने चर्चा. ८ व्या परिच्छेदावर विचार करताना एक लायक प्रचारक संभाषणाच्या विषयाचा वापर करून थोडक्यात प्रकाशन सादर करीत असल्याचे दृश्य दाखवा.
१५ मिः तुम्ही दळणवळणाचे दालन खुले ठेवता का? कौटुंबिक जीवन पुस्तकाच्या ११ व्या अध्यायामध्ये आढळणाऱ्या दोन किंवा तीन तत्त्वांविषयी वडील चर्चा करतात. परिच्छेद ५-८ वरील साहित्यावर छोटी प्रात्यक्षिके दाखवून हे स्पष्ट करा की, पालक मुलाच्या दळणवळणास कसे उत्तेजीत करू शकतात वा खंडीत करू शकतात.
गीत २२१ (७३) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी २१ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १२६ (२५)
१० मिः स्थानिक घोषणा. प्रश्न पेटी. वेळ मिळेल त्याप्रमाणे ईश्वरशासित वृत्तातील माहिती हाताळा.
१५ मिः एक्झामिनिंग द स्क्रिपचर्स डेली—१९९१चा चांगला उपयोग करा. पुस्तिकेच्या प्रास्ताविकतेवर आधारीत भाषण. याचे महत्त्व दैनिक वचनाच्या मुद्यांसोबत चित्रित करा. आजच्या दैनंदिन वचनाचे वाचन करताना कुटुंबामध्ये ज्या मुद्यांची चर्चा झाली ती विदित करा.
२० मिः “अर्थभरीत कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यास चालविणे.” प्रश्नोत्तराने. वेळ मुभा देतो तसे एका किंवा दोघा पालकांना, त्यांनी आपला कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यास सूचनात्मक तसेच आनंदी बनविण्यासाठी काय केले ते सांगू द्या.
गीत ९३ (४८) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी २८ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ९१ (६१)
१० मिः स्थानिक घोषणा. सुट्टीच्या काळातील साक्षीकार्याचे प्रोत्साहन द्या. मासिक दिनी कोणते लेख दाखवावेत ते सुचवा.
२० मिः “यहोवाने शिकविलेले.” शाळा देखरेखे सभागृहासोबत चर्चा करतात. उदाहरणशील विद्यार्थ्याची मुलाखत घ्या व त्यामध्ये, पूर्वतयारी केल्यामुळे तसेच स्पीच कौन्सिलवरील मुद्यांवर काम केल्यामुळे त्याला जे लाभ मिळाले ते ठळकपणे सांगू द्या.
१५ मिः स्थानिक गरजा किंवा द वॉचटावरच्या नोव्हेंबर १५, १९९० च्या अंकातील “प्रे फॉर वन ॲनादर” या लेखावर भाषण. (प्रांतिय भाषेतः जानेवारी १९८९ टेहळणी बुरुज, लेखः “तुमच्या प्रार्थना केवढ्या अर्थभरीत आहेत?”)
गीत ५५ (१८) व समाप्तीची प्रार्थना.