युवकांना उपद्रवापासून दूर राहण्यास मदत देणे
१ यहोवाची अशी इच्छा आहे की, आपण त्याची बहुमोल देणगी, जीवन याचा परिपूर्ण आनंद घ्यावा. या कारणास्तव त्याने आम्हाला काही अंशी व्यक्तीगत स्वातंत्र्य दिले आहे की, ज्यामुळे आम्हाला आपल्या अंतःकरणातील इच्छा जोपासता येतील. पण हालचालीचे हे स्वातंत्र्य दिलेले असले तरी यहोवा आम्हाला आमच्या कृतीसाठी योग्यपणे जबाबदार धरतो.—उप. ११:९.
२ आम्ही अपूर्ण व पापी असल्यामुळे आम्हाला जीवनाक्रमणात येणाऱ्या उपद्रवापासून स्वतःला कसे दूर राखता येईल बरे? (उप. ११:१०) अनुभव नसणाऱ्या युवकांना ते जमणे शक्य आहे का? होय, आहे. हे आम्ही आनंदाने म्हणू शकतो. मार्गदर्शनासाठी असणारी आमची गरज किती अधिक आहे त्याची जाणीव यहोवाला आहे व म्हणूनच त्याने युवकांना व वयस्करांना सध्याच्या शेवटल्या काळाच्या वाढत्या त्रासात सुरक्षितपणे वाटचाल राखावी याकरता प्रेमळ सूचना व मार्गदर्शन दिले आहे.—स्तोत्र. १९:७; ११९:९; २ तीमथ्य ३:१.
पालकांची जबाबदारी
३ त्रास संभवल्यावर युवकांना आपल्या जबाबदार पालकांची मोठी गरज भासते; कारण ते ‘लोंबकळणारे हात सरळ करू शकतात व लंगड्याचा सांधा उखळू न देता तो बरा करू शकतात.’ (इब्री १२:१२, १३) मुलांना जीवनाकडे नेणाऱ्या मार्गावर ठेवण्यासाठी पालकांनी वेळेनुसार आपल्या मुलांची विचारसरणी सुधारली पाहिजे. यासाठी धीर, चातुर्य व शिवाय यहोवाच्या समृद्ध आशीर्वादांची गरज आहे.
४ सर्व वाईट प्रभावापासून पालकांना आपल्या मुलांना सर्वतोपरि संरक्षण देता येणे अशक्य आहे. पण त्यासाठी मुलाच्या मनाची कशी मजबूती करता येईल? त्याची ‘यहोवाकडील मानसिक शिक्षणामध्ये वाढ करून.’ (इफिस. ६:४) यामध्ये इतर गोष्टींसमवेत कौटुंबिक अभ्यास, आध्यात्मिक व नैतिक मार्गदर्शन, शाळा सुटल्यावर हितकारक अशा हालचाली, योग्य स्वरुपाची शिस्त आणि चांगले पालकीय उदाहरण यांचा समावेश आहे.
५ “ईश्वरी भक्ती” प्रांतिय अधिवेशनात प्रकाशित करण्यात आलेले पुस्तक, क्वश्चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क, युवकांना साहाय्य देण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. हे पुस्तक मुलांबरोबर योग्य दर्जाविषयीची चर्चा करण्यात पालकांची मदत करते. मुलांच्या मनात व अंतःकरणात देवाचे नियम प्रभावीपणे बिंबवण्यात आले तर ते नियंत्रण किंवा प्रभावी नियमन करतात. या नव्या पुस्तकातील साहित्याची कौटुंबिक रुपाने केलेली चर्चा युवकांना उपद्रव दूर करण्यात त्यांची मजबूती करील.
६ १९८९ मध्ये यंग पीपल आस्क हे पुस्तक प्रकाशित करताना अधिवेशनातील वक्त्याने आपले लक्ष उपस्थित असलेल्या युवकांकडे वळवून या पुस्तकाच्या मोलाची ठळक वैशिष्ट्ये त्यांना सांगितली. पालकांना आपल्या कौटुंबिक चर्चेसाठी या पुस्तकाचा उपयोग करावा असे सांगण्यात आले. प्रत्येक धड्याच्या शेवटाला “क्वश्चन्स फॉर डिस्कशन” हे सदर देण्यात आले आहे. हे प्रश्न साहित्याच्या प्रत्येक परिच्छेदाचे पृथ्थकरण करावे यासाठी दिलेले नाहीत. प्रत्येक प्रश्नात एक किंवा अधिक पोटमथळ्याखालील साहित्य येते. काही कुटुंब चालकांना तो धडा संपूर्ण वाचून झाल्यावर मग या प्रश्नांवर विचार करावासा वाटेल. किंवा काहींना त्या प्रश्नाचा संबंध असणाऱ्या पोटमथळ्याखालील साहित्य वाचल्यावर मग ते प्रश्न विचारात घ्यावेसे वाटतील.
आमच्या क्षेत्रातील युवकांना मदत द्या
७ आमच्या क्षेत्रात बरेच युवक आपल्याला आढळत असतील. त्यांना असणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे आपल्या नव्या पुस्तकात दिलेली आहेत, यामुळे आपण जानेवारी महिन्यात क्षेत्रावर यंग पीपल आस्क हे पुस्तक सादर करणार आहोत. ते कसे सादर करावे याची एखादी सादरता तुम्ही तयार केलेली असेलच. किंवा तुम्हाला पुढे दाखविल्याप्रमाणे असे काही म्हणता येईलः
८ “युवकावस्थेचा काळ आपल्या जीवनातील सर्वात आनंदाचा काळ असे आपण समजतो. पण आज, कित्येक युवक आनंदी नाहीत असे आपल्याला दिसते. बरोबर ना? [प्रतिसादास वाव द्या.] बदलत्या दर्जांमुळे एक संमिश्र जग निर्माण झाले असून त्यातही निरनिराळ्या समस्या सामोऱ्या आल्या आहेत व यामुळे युवकांचा आनंद हिरावला जात आहे. मग, युवकांना विश्वस्त असे मार्गदर्शन कोठून मिळू शकते? [त्यांचे विवेचन ऐका.] पहा, पवित्र शास्त्रात येथे स्तोत्रसंहिता ११९:९ मध्ये काय करण्यास सांगितले आहे. [वाचा.] पवित्र शास्त्र, शिक्षणाच्या बाबतीत पालकीय जबाबदारीचा उल्लेख करते व मग, नीतीसूत्रे १:८ मध्ये हा सल्ला देते. [वाचा.] याच्याच अनुषंगाने क्वश्चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक पवित्र शास्त्रावर आधारलेल्या व्यावहारिक मार्गदर्शनाने भरलेले आहे व शिवाय यामध्ये जीवनात प्रत्यक्षात घडलेल्या अनुभवांचाही समावेश करण्यात आलेला आहे की, ज्यामुळे युवकाला भविष्याचा कसा यशस्वीरित्या सामना करून आनंद मिळवता येईल ते समजू शकते. [आस्था जागृत करण्यासाठी अध्यायाची वेगवेगळी शीर्षके काढून वाचून दाखवा.] हे मदतगार व सुंदर छपाईचे पुस्तक तुम्हाला १५ रुपयांच्या अनुदानाकरवी मिळू शकेल.
९ युवकांनी आपली शक्ती सूज्ञ व योग्य ध्येयांसाठी वापरावी असे पवित्र शस्त्र सुचविते. हे नवे पुस्तक पुष्कळांना सूज्ञानाचा अमर्याद साठा—पवित्र शास्त्र—याकडे निश्चितार्थाने मार्गदर्शित करू शकेल. सध्याचे जीवन समृद्ध बनवावे व सुरक्षित भवितव्याची आशा राखावी यासाठी हे केवढे महत्त्वपूर्ण साधन आहे!—उप. १२:१.