१९९१ करिता ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेचा आराखडा
सूचना
१९९१ मध्ये ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा पुढील व्यवस्थेनुरुप चालविली जाईल.
क्रमिक पुस्तके: पवित्र शास्त्र, “ऑल स्क्रिपचर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशल” [si], यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ् [pe], बायबल टॉपिक्स फॉर डिस्कशन [td], आणि युवर युथ—गेटिंग द बेस्ट आऊट ऑफ इट [yy] ही प्रकाशने साहित्याच्या नेमणूका देण्यासाठी वापरली जातील.
शाळेचा कार्यक्रम गायन, प्रार्थना व स्वागतपर अभिवादनाने सुरु होईल. त्यानंतर तो पुढील प्रकारे चालविला जाईलः
नेमणूक क्रमांक १: १५ मिनिटे. ही वडील किंवा प्रशिक्षित उपाध्य सेवकांकरवी हाताळली जावी. ही नेमणूक “ऑल स्क्रिपचर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशल” यावर आधारलेली असेल. ही नेमणूक १० ते १२ मिनिटाकरिता बोधप्रद भाषण या अर्थी सादर करावी व नंतर ३ ते ५ मिनिटे पुस्तकातील प्रश्नांचा वापर करून तोंडी उजळणी घ्यावी. या मागील ध्येय केवळ साहित्य उरकावे हे नसावे तर चर्चिल्या जात असलेल्या माहितीतील व्यावहारिक मुद्यांवर लक्ष केंद्रित करावे व मंडळीस अत्यंत साहाय्यक ठरणारे मुद्दे ठळकपणे सामोरे मांडावे हे असावे. गरज आहे तेथे या साहित्याचे शिर्षक निवडावे. सर्वांना या साहित्याची काळजीपूर्वक पूर्वतयारी करण्याचे प्रोत्साहन दिले जाते की ज्याकरवी साहित्याचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकेल.
या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवाने वेळेमध्ये आपले भाषण संपविण्याची दक्षता घ्यावी. जरुरी भासल्यास या बांधवास खाजगी सूचना द्याव्या.
पवित्र शास्त्र वाचनातील ठळक मुद्दे: ६ मिनिटे. हा भाग शाळा देखरेख्यांकरवी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या लायक वडीलांनी किंवा उपाध्य सेवकांनी हाताळावा. नेमून दिलेल्या वाचनाचा तो सारांश नसावा. नेमलेल्या अध्यायातील एकंदर त्रोटक दृष्टीकोण सांगितल्यावर त्यातील माहिती आम्हास का व कशी महत्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी सभागृहाला साहाय्य करावे. साहित्यातील ठळक मुद्यांसाठी टेहळणी बुरुज यातील साहित्याचा परामर्श घ्यावा. यानंतर शाळा देखरेखे विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात पाठवितील.
भाषण क्रमांक २: ५ मिनिटे. एका बंधूला नेमून दिलेल्या पवित्र शास्त्र भागाचे हे वाचन आहे. हे शाळेच्या मुख्य वर्गास तसेच उप वर्गास सुध्दा लागू आहे. सुरुवातीला त्रोटक विवेचन, समाप्तीचे विचार व मध्यंतरात काही मुद्दे विवेचीत करता येतील एवढी पुरेशी ही वाचनाची नेमणूक आहे. यात ऐतिहासिक पार्श्वभूमि, भविष्यवादित किंवा तात्विक विषयाची अर्थसूचकता व त्यांचा अवलंब यांचा समावेश करता येईल. नेमून दिलेली सर्व शास्त्रवचने वाचली जावीत.
भाषण क्रमांक ३: ५ मिनिटे. हे भाषण भगिनींना नेमून देण्यात येईल. या भाषणाचा विषय लिव्ह फॉरएव्हर पुस्तकातून राहील. नियुक्ती मिळालेल्या विद्यार्थिनीस वाचता आले पाहिजे. भाषण सादर करताना ही विद्यार्थिनी बसू शकते वा उभी राहू शकते. एक मदतनीस शाळा देखरेखे नेमून देतील पण अधिक मदतनीस वापरता येतील. भाषणातील दृश्य रचना क्षेत्र कार्य किंवा अनौपचारिक साक्षीकार्य याजशी संबंधित असावी. ही दृश्य रचना भाषण देणाऱ्याकरवी वा तिच्या मदतनीसाकरवी प्रस्तुत करता येईल. दृश्य रचना नव्हे तर साहित्याला प्राधान्य दिले जावे. विद्यार्थिनीने आराखड्यात दिलेल्या शिर्षकाचा वापर करावा.
भाषण क्रमांक ४: ५ मिनिटे. बंधूला किंवा भगिनीला नेमून देण्यात येईल. या भाषणाचा विषय बायबल टॉपिक्स फॉर डिस्कशन आणि युथ पुस्तक यावर अदलीबदली होत राहील. युथ पुस्तकावरील विषय प्रामुख्यत्वे तरुण किंवा नव्या विद्यार्थ्यांना नेमून देण्यात येईल. नेमणूक मिळालेल्या विद्यार्थ्याला वाचता आले पाहिजे. जेव्हा बंधूला नेमणूक देण्यात येईल तेव्हा त्याने सबंध सभागृहाला ते भाषण सादर करावे. राज्य सभागृहातील उपस्थितांना विचारात घेऊन त्या बांधवाने भाषणाची तयारी करावी हे बरे, म्हणजे जे ते ऐकतील ते त्यांना माहितीयुक्त व लाभदायक ठरेल. तथापि, एका दुसऱ्या व्यावहारिक व सभागृहास अनुलक्षून असणाऱ्या योग्य रचनेकडे साहित्याचा कल असेल तर तो बंधू त्या पध्दतीने त्या भाषणाची तयारी करू शकेल. विद्यार्थ्याने, नेमून दिलेल्या शिर्षकाप्रमाणे तयारी करावी.
हे भाषण भगिनीला नेमून दिल्यास ते तिने भाषण क्रमांक ३ च्या पध्दतीने सादर करावे.
सल्ला व शेरा: प्रत्येक विद्यार्थी भाषणानंतर शाळा देखरेखे विशिष्ट प्रकारातील सल्ला देतील. याकरता कौन्सिल स्लीपवरील प्रगतिशील सूचनासंबंधाने दाखविण्यात आलेला अनुक्रम पाळण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी विद्यार्थ्याने कोणत्या क्षेत्रात प्रगति करण्याची गरज आहे त्याकडे त्यांनी लक्ष देण्यास हवे. विद्यार्थी वक्ता “जी” या शेऱ्यास पात्र आहे व स्पीच कौन्सिलवर इतर कोणत्याहि गुणावर “आय” किंवा “डब्ल्यू” असा निर्देश नाही तर ज्या गुणावर पुढील भाषणाबाबत विद्यार्थ्याने तयारी करावी असे शाळा देखरेख्यास वाटते तेथील चौकोनावर त्याने आळे करावे. ही माहिती ते त्या विद्यार्थ्याला त्या सायंकाळी देतीलच व त्यासोबत पुढल्या वेळी विद्यार्थ्याला थिओक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल असायन्मेंट स्लीप (एस–८९) वर जी नेमणूक ते देतील त्यावेळीही हाच गुण तयारीकरता दर्शवितील. भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली बैठक पहिल्या रांगेत घ्यावी. याद्वारे एकतर वेळ वाचेल व शाळा देखरेख्यांनाही त्यांना थेट सूचना देण्याचे सोईचे होईल. तोंडी सूचना देऊन झाल्यावर वेळ मुभा देईल त्याप्रमाणे सल्लागारास, विद्यार्थ्याने आपल्या भाषणात साहित्याच्या ज्या माहितीयुक्त व व्यावहारिक मुद्यांचा समावेश केला नव्हता त्यावर विवेचन मांडता येईल. प्रत्येक विद्यार्थी भाषणानंतर सल्ला व शेरा देण्यासाठी शाळा देखरेख्यांनी केवळ दोनच मिनिटे वापरण्याची दक्षता घ्यावी. पवित्र शास्त्र वाचनातील ठळक मुद्यात काही विशिष्ट असे सांगायचे राहून गेले असल्यास याविषयीची सूचना त्या बंधूस खाजगी रितीने देण्यात यावी.
भाषणाची तयारी: नेमणूक क्रमांक १ लाभलेल्या बांधवाने शक्य आहे तेथे एक विषय निवडावा. दुसरे भाषण मिळालेल्या विद्यार्थ्याने असा विषय निवडावा की ज्याकरवी नेमलेल्या साहित्याचा एकंदर उरक त्यामध्ये येऊ शकेल. तिसऱ्या व चवथ्या भाषणाची नेमणूक मिळालेल्या विद्यार्थ्याने दाखविलेल्या विषयाचा वापर करावा. भाषण देण्याआधी विद्यार्थ्याने, तो ज्या भाषणशैलीच्या गुणावर काम करीत आहे त्याविषयी स्कूल गाईड पुस्तकामध्ये असलेले साहित्य वाचलेले असावयास हवे.
वेळ: कोणतेही भाषण वेळेबाहेर जाऊ देऊ नये. तसेच सल्लागाराने दिलेला सल्ला व शेराही वेळेच्या आत असावा. भाषण क्रमांक २ ते ४ ची वेळ झाली म्हणजे ते कुशलतेने थांबवावे. ज्या बांधवाला “थांबण्याचा संकेत” करण्यासाठी नेमले आहे त्यानेहि तो तत्परतेने करावा. नेमणूक क्रमांक १ चे बांधव वेळेबाहेर गेल्यास त्यांना खाजगी सूचना देण्यात यावी. सर्वांनी वेळेकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. सबंध कार्यक्रम, गीत व प्रार्थना वगळता ४५ मिनिटांचा आहे.
लेखी चाचणी: वेळोवेळी लेखी चाचणी घेण्यात येईल. याच्या तयारीसाठी नेमिलेल्या साहित्याची व नियुक्त केलेल्या पवित्र शास्त्र वाचन विभागाची उजळणी करावी. आमची राज्य सेवा याच्या जानेवारी, मे व सप्टेंबर या अंकाच्या पुरवणीत देण्यात येणाऱ्या प्रश्नांची पूर्वतयारी करा, पण लेखी चाचणी होईपर्यंत या प्रश्नपत्रिकेवर उत्तरे लिहू नका. २५ मिनिटांच्या चाचणीत फक्त पवित्र शास्त्र वापरता येईल. राहिलेल्या वेळात प्रश्नोत्तराच्या रुपाने चर्चा होईल. प्रत्येक विद्यार्थी आपली उत्तर पत्रिका तपासील. शाळा देखरेखे सर्व उत्तरे वाचून दाखवतील. यात कठीण प्रश्नावर अधिक लक्ष देऊन त्यांची उत्तरे सर्वांना स्पष्टपणे समजावून देण्याचे सहाय्य करतील. स्थानिक परिस्थितीच्या अपरिहार्य कारणामुळे ही लेखी चाचणी नियुक्त केलेल्या तारखेच्या एका आठवड्यानंतर घेता येईल.
मोठ्या व लहान मंडळ्या: ज्या मंडळीतील शाळेत ५० वा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी पटावर असतील तेथे नियोजित भाषणे देण्यासाठी विद्यार्थ्यांची गट रचना करता येईल व त्यांची भाषणे दुसऱ्या सल्लागारांच्या समक्ष ऐकविता येतील. अर्थातच, समर्पण न झालेल्या पण ख्रिस्ती तत्त्वानुरूप जीवन व्यतित करणाऱ्यांना शाळेत आपले नाव दाखल करून नेमणूका प्राप्त करता येतील.
अनुपस्थितीः दर आठवडी शाळेच्या कार्यक्रमास उपस्थित राहून, आपणाला दिलेल्या नेमणूकांची चांगली तयारी करून आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात भाग घेऊन सर्वांनी ह्या शाळेबद्दल रसिकता दाखवावी. सर्व विद्यार्थी, आपणास मिळालेल्या नेमणूका जाणीवपूर्वकतेने पूर्ण करतील अशी आम्ही आशा करतो. नेमलेला विद्यार्थी गैरहजर असल्यास एखादा स्वयंसेवक ती नेमणूक आपल्या परीने जे करता येईल त्याद्वारे हाताळील. किंवा शाळा देखरेखे त्या साहित्याची चर्चा सभागृहासोबत करू शकतील.
आराखडा
मार्च ४ पवित्र शास्त्र वाचनः कलस्सैकर १ ते ४
गीत नं. १७३ (४५)
नं. १: प्रकटीकरणाची प्रस्तावना (si पृ. २६१-२ परि. १-७)
नं. २: कलस्सैकर ३:१२-२५
नं. ३: तुम्ही इस्टर तसेच मनुष्याचा सन्मान करणारे सण पाळावेत का? (pe अध्याय २५ परि. १६, १७)
नं. ४: तारण हे येशूच्या खंडणी यज्ञार्पणाद्वारे देवाकडून मिळते (td ५१बी)
मार्च ११ पवित्र शास्त्र वाचनः १ थेस्सलनीकाकर १ ते ५
गीत नं. २१२ (११०)
नं. १: प्रकटीकरण १:१ ते ३:२२ (si पृ. २६२ परि. ८-११)
नं. २: १ थेस्सलनीकाकर ४:१-१२
नं. ३: ख्रिस्तीजन कोणा प्रतिमेला भक्तीयुक्त सन्मान का देत नाहीत? (pe अध्याय २५ परि. १८, १९)
नं. ४: आज व उद्यासाठी जगणे (yy अध्याय १)
मार्च १८ पवित्र शास्त्र वाचनः २ थेस्सलनीकाकर १ ते ३
गीत नं. १३२ (७०)
नं. १: प्रकटीकरण ४:१ ते ८:२ (si पृ. २६३ परि. १२-१६)
नं. २: २ थेस्सलनीकाकर ३:१-१२
नं. ३: कोणी सैतानी जगाचा आहे हे त्याची कोणती वागणूक दाखवून देते? (pe अध्याय २५ परि. २०, २१)
नं. ४: “नव्याने जन्मणे” म्हणजे आत्मिक जीवनाचे भवितव्य असणे (td ५१सी)
मार्च २५ पवित्र शास्त्र वाचनः १ तीमथ्य १ ते ३
गीत नं. १८८ (७७)
नं. १: प्रकटीकरण ८:३ ते १३:१८ (si पृ. २६३-४ परि. १७-२१)
नं. २: १ तीमथ्य ३:१-१३
नं. ३: रक्त संक्रमण का करू नये? (pe अध्याय २५ परि. २२, २३)
नं. ४: आमच्या पृथ्वीचे परिक्षण आम्हास काय सांगते? (yy अध्याय २ परि. १-१७)
एप्रिल १ पवित्र शास्त्र वाचनः १ तीमथ्य ४ ते ६
गीत नं. ३९ (१६)
नं. १: प्रकटीकरण १४:१ ते १६:२१ (si पृ. २६४ परि. २२, २३)
नं. २: १ तीमथ्य ६:१-१२
नं. ३: चांगले ते करण्यासाठी आम्हास का लढत द्यावी लागते? (pe अध्याय २६ परि. १-३)
नं. ४: “एकदा वाचला म्हणजे कायमचे तारण झाले” हे शास्त्रवचनीय नाही (td ५१डी)
एप्रिल ८ पवित्र शास्त्र वाचनः २ तीमथ्य १ ते ४
गीत नं. १६२ (८९)
नं. १: प्रकटीकरण १७:१ ते २०:१५ (si पृ. २६४ परि. २४, २५)
नं. २: २ तीमथ्य २:१४-२६
नं. ३: योग्य ते करण्यासाठी कशाची गरज आहे? (pe अध्याय २६ परि. ४, ५)
नं. ४: स्वतःवर टाकलेला एक कटाक्ष आत्मविश्वास का देऊ शकतो? (yy अध्याय २ परि. १८-२८)
एप्रिल १५ पवित्र शास्त्र वाचनः तीत १ ते ३ व फिलेमोन
गीत नं. ११९ (१११)
नं. १: प्रकटीकरण २१:१ ते २२:२१ (si पृ. २६५ परि. २६-२८)
नं. २: तीत २:१-१५
नं. ३: देवासोबतचे नजीकचे नाते हे इतके का महत्त्वाचे आहे? (pe अध्याय २६ परि. ६-८)
नं. ४: “सार्वत्रिक तारण” हे अशास्त्रीय आहे (td ५१ई)
एप्रिल २२ पवित्र शास्त्र वाचनः इब्रीयांस १ ते ३
गीत नं. १०५ (४६)
नं. १: वचनयुक्त देशास भेट—भाग १ (si पृ. २६९-७० परि. १-७)
नं. २: इब्रीयांस २:१-१३
नं. ३: दुसऱ्यांनी केलेल्या चुकांकडून धडा शिकून घ्या! (pe अध्याय २६ परि. ९-१२)
नं. ४: आमच्या शरीराविषयी कोणाला श्रेय दिले जावे? (yy अध्याय ३ परि. १-६)
एप्रिल २९ पवित्र शास्त्र वाचनः इब्रीयांस ४ ते ७
गीत नं. १२३ (६३)
नं. १: वचनयुक्त देशास भेट—भाग २ (si पृ. २७०-१ परि. ८-१५)
नं. २: इब्रीयांस ५:१-१४
नं. ३: देवाच्या मदतीने कोणकोणते बदल केले जाऊ शकतात? (pe अध्याय २६ परि. १३, १४)
नं. ४: देवाचे वचन खऱ्या विज्ञानाशी सहमत आहे (td ५२ए)
मे ६ पवित्र शास्त्र वाचनः इब्रीयांस ८ ते १०
गीत नं. १४४ (७८)
नं. १: वचनयुक्त देशास भेट—भाग ३ (si पृ. २७४-५ परि. १६-२४)
नं. २: इब्रीयांस १०:१९-३१
नं. ३: बदल करण्यासाठी जी लढत द्यावी लागते ती कशी जिंकता येईल? (pe अध्याय २६ परि. १५, १६)
नं. ४: लैंगिक घडामोडी व जबाबदाऱ्या (yy अध्याय ३ परि. ७-२०)
मे १३ पवित्र शास्त्र वाचनः इब्रीयांस ११ ते १३
गीत नं. २०६ (११९)
नं. १: वचनयुक्त देशास भेट—भाग ४ (si पृ. २७५-७ परि. २५-३२)
नं. २: इब्रीयांस १३:७-१९
नं. ३: लढत जिंकण्यासाठी आशा आम्हास कशी मदत करू शकते? (pe अध्याय २६ परि. १७-१९)
नं. ४: विज्ञानशास्त्र मानवास तारू शकत नाही (td ५२बी)
मे २० पवित्र शास्त्र वाचनः याकोब १ ते ५
गीत नं. ८८ (४२)
नं. १: काळ आणि पवित्र शास्त्रवचने—भाग १ (si पृ. २७७-८ परि. १-८)
नं. २: याकोब ४:१-१२
नं. ३: प्रार्थना का महत्त्वाची आहे? (pe अध्याय २७ परि. १, २)
नं. ४: “दरवाजा” की “भिंत”—कशासारखे? (yy अध्याय ४ परि. १-१४)
मे २७ पवित्र शास्त्र वाचनः १ पेत्र १ ते ५
गीत नं. १८ (४९)
नं. १: काळ आणि पवित्र शास्त्रवचने—भाग २ (si पृ. २७८-९ परि. ९-१७)
नं. २: १ पेत्र ३:१-१२
नं. ३: आम्हाला देवासोबत चांगले नातेसंबंध कसे जोपासता येतील? (pe अध्याय २७ परि. ३-५)
नं. ४: पाप हे खरेपणाने काय आहे (td ५३ए)
जून ३ पवित्र शास्त्र वाचनः २ पेत्र १ ते ३
गीत नं. १७७ (७५)
नं. १: काळ आणि पवित्र शास्त्रवचने—भाग ३ (si पृ. २८०-१ परि. १८-२७)
नं. २: २ पेत्र १:१-११
नं. ३: आमच्या प्रार्थना ऐकल्या जाव्यात यासाठी काय करण्याची गरज आहे? (pe अध्याय २७ परि. ६, ७)
नं. ४: शारीरिक स्वरुप व भावनिक समतोल (yy अध्याय ४ परि. १५-२१)
जून १० पवित्र शास्त्र वाचनः १ योहान १ ते ५
गीत नं. ५० (२३)
नं. १: काळ आणि पवित्र शास्त्रवचने—भाग ४ (si पृ. २८१-३ परि. २८-३४)
नं. २: १ योहान ४:७-१९
नं. ३: प्रार्थनेविषयी देवाच्या गरजा पूर्ण करणे (pe अध्याय २७ परि. ८, ९)
नं. ४: आदामाच्या पापामुळे आम्हा सर्वांना का त्रास झाला आहे (td ५३बी)
जून १७ पवित्र शास्त्र वाचनः २ योहान, ३ योहान, यहुदा
गीत नं. २२ (७०)
नं. १: काळाच्या ओघात घडलेल्या घटनांचे मूल्यमापन करणे—भाग १ (si पृ. २८३-४ परि. १-७)
नं. २: यहुदा ३-१५
नं. ३: आमच्या प्रार्थना ऐकल्या जाण्यासाठी असणाऱ्या मूलभूत गरजा (pe अध्याय २७ परि. १०, ११)
नं. ४: नैतिकदृष्ट्या शुद्ध ठेवणे (yy अध्याय ५)
जून २४ लेखी चाचणी. कलस्सैकर १ ते यहुदा
गीत नं. ५९ (३१)
जुलै १ पवित्र शास्त्र वाचनः प्रकटीकरण १ ते ३
गीत नं. १६१ (८७)
नं. १: काळाच्या ओघात घडलेल्या घटनांचे मूल्यमापन करणे—भाग २ (si पृ. २८४-६ परि. ८-१५)
नं. २: प्रकटीकरण २:१-११
नं. ३: प्रार्थनेत कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात? (pe अध्याय २७ परि. १२, १३)
नं. ४: मना केलेले फळ आज्ञाभंजकता होती, लैंगिक आचार नव्हता (td ५३सी)
जुलै ८ पवित्र शास्त्र वाचनः प्रकटीकरण ४ ते ६
गीत नं. ९७ (५०)
नं. १: काळाच्या ओघात घडलेल्या घटनांचे मूल्यमापन करणे—भाग ३ (si पृ. २८९-९१ परि. १६-२३)
नं. २: प्रकटीकरण ६:१-११
नं. ३: इतरांसाठी प्रार्थना का करावी? (pe अध्याय २७ परि. १४-१६)
नं. ४: आपल्या शरीराची काळजी का घ्यावी व कशी? (yy अध्याय ६ परि. १-८)
जुलै १५ पवित्र शास्त्र वाचनः प्रकटीकरण ७ ते ९
गीत नं. १२७ (६४)
नं. १: काळाच्या ओघात घडलेल्या घटनांचे मूल्यमापन करणे—भाग ४ (si पृ. २९१-२ परि. २४-३०)
नं. २: प्रकटीकरण ७:१-४, ९-१७
नं. ३: ख्रिस्ताच्या खऱ्या शिष्यांची कोणती गुणलक्षणे आहेत?(pe अध्याय २८ परि. १-३)
नं. ४: यहोवा देवाने पाप आधीच ठरवून दिले नव्हते (td ५३डी)
जुलै २२ पवित्र शास्त्र वाचनः प्रकटीकरण १० ते १२
गीत नं. २६ (९)
नं. १: पवित्र शास्त्र व त्यातील पुस्तकांविषयीची कायदेशीर मान्यता—भाग १ (si पृ. २९८ परि. १-६)
नं. २: प्रकटीकरण १२:५-१७
नं. ३: आम्ही कोणावर प्रीती दाखवावी? (pe अध्याय २८ परि. ४, ५)
नं. ४: स्वच्छता व योग्य विश्रांतीचे महत्त्व (yy अध्याय ६ परि. ९-१८)
जुलै २९ पवित्र शास्त्र वाचनः प्रकटीकरण १३ ते १५
गीत नं. ६ (४)
नं. १: पवित्र शास्त्र व त्यातील पुस्तकांविषयीची कायदेशीर मान्यता—भाग २ (si पृ. २९९-३०० परि. ७-१६)
नं. २: प्रकटीकरण १४:१-१३
नं. ३: ख्रिश्चनांमध्ये समस्या का उद्भवू शकतात? (pe अध्याय २८ परि. ६, ७)
नं. ४: धर्मगुरुला कबुलीजबाब देणे हा क्षमेचा मार्ग नव्हे (td ५३ई)
ऑगस्ट ५ पवित्र शास्त्र वाचनः प्रकटीकरण १६ ते १८
गीत नं. १४५ (११५)
नं. १: पवित्र शास्त्र व त्यातील पुस्तकांविषयीची कायदेशीर मान्यता—भाग ३ (si पृ. ३०१-३ परि. १७-२६)
नं. २: प्रकटीकरण १८:१-१०, २०, २१
नं. ३: प्रेषितांनाही कधीकधी कोणत्या समस्या आल्या? (pe अध्याय २८ परि. ८, ९)
नं. ४: तुमचे कपडे व स्वरुप तुम्हाविषयी काय सांगतात (yy अध्याय ७ परि. १-११)
ऑगस्ट १२ पवित्र शास्त्र वाचनः प्रकटीकरण १९ ते २२
गीत नं. १८४ (१५)
नं. १: पवित्र शास्त्रवचनातील इब्री लिखाण—भाग १ (si पृ. ३०४-५ परि. १-९)
नं. २: प्रकटीकरण २१:१-१४
नं. ३: प्रेषितांनी आपल्यामधील समस्या कशा सोडवल्या? (pe अध्याय २८ परि. १०, ११)
नं. ४: पवित्र आत्म्याविरुद्ध पाप हे काय आहे? (td ५३एफ)
ऑगस्ट १९ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती १ ते ३
गीत नं. ५६ (३३)
नं. १: पवित्र शास्त्रवचनातील इब्री लिखाण—भाग २ (si पृ. ३०६-७ परि. १०-१६)
नं. २: उत्पत्ती ३:६-१९
नं. ३: क्षमाशीलपणाविषयी देवाने जे उदाहरण राखले त्याचे अनुकरण करा (pe अध्याय २८ परि. १२, १३)
नं. ४: केशभूषा, सौंदर्यप्रसाधने व योग्य मार्गदर्शिका (yy अध्याय ७ परि. १२-२२)
ऑगस्ट २६ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती ४ ते ६
गीत नं. ६२ (३४)
नं. १: पवित्र शास्त्रवचनातील इब्री लिखाण—भाग ३ (si पृ. ३०७, ३१०-११ परि. १७-२५)
नं. २: उत्पत्ती ६:१-१२
नं. ३: आम्ही दयाळू का असावे? (pe अध्याय २८ परि. १४, १५)
नं. ४: जीव हा काय आहे (td ५४ए)
सप्टें. २ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती ७ ते ९
गीत नं. २०० (१०८)
नं. १: पवित्र शास्त्रवचनातील इब्री लिखाण—भाग ४ (si पृ. ३११-१२ परि. २६-३१)
नं. २: उत्पत्ती ९:१-११
नं. ३: आम्ही समस्या कशा सोडवाव्यात?(pe अध्याय २८ परि. १६, १७)
नं. ४: कोण चांगले मित्र होतात? (yy अध्याय ८ परि. १-८)
सप्टें. ९ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती १० ते १२
गीत नं. ६६ (३७)
नं. १: पवित्र शास्त्रवचनातील ख्रिस्ती ग्रीक लिखाण—भाग १ (si पृ. ३१४-१५ परि. १-७)
नं. २: उत्पत्ती ११:३१–१२:१३
नं. ३: देवाचे कोणते उदाहरण आम्ही अनुसरण्यास हवे? (pe अध्याय २८ परि. १८, १९)
नं. ४: जीव व आत्मा याजमधील फरक काय आहे? (td ५४बी)
सप्टें. १६ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती १३ ते १५
गीत नं. १०६ (५५)
नं. १: पवित्र शास्त्रवचनातील ख्रिस्ती ग्रीक लिखाण—भाग २ (si पृ. ३१५-१६ परि. ८-१६)
नं. २: उत्पत्ती १३:५-१८
नं. ३: कुटुंबातील अपयशासाठी देवाला का दोष देता येणार नाही (pe अध्याय २९ परि. १-३)
नं. ४: योग्य मित्रांची निवड करणे (yy अध्याय ८ परि. ९-१९)
सप्टें. २३ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती १६ ते १९
गीत नं. ११७ (९०)
नं. १: पवित्र शास्त्रवचनातील ख्रिस्ती ग्रीक लिखाण—भाग ३ (si पृ. ३१६-१७ परि. १७-२५)
नं. २: उत्पत्ती १७:१-१४
नं. ३: विवाह यशस्वी व्हावा यासाठी कोणत्या गोष्टी ओळखण्यास हव्या? (pe अध्याय २९ परि. ४, ५)
नं. ४: पवित्र आत्मा काय आहे? (td ५५ए)
सप्टें. ३० पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती २० ते २३
गीत नं. ६४ (३५)
नं. १: पवित्र शास्त्रवचनातील ख्रिस्ती ग्रीक लिखाण—भाग ४ (si पृ. ३१८-१९ परि. २६-३२)
नं. २: उत्पत्ती २२:९-१९
नं. ३: कुटुंबाचा मस्तक कोणाला बनविण्यात आले होते व का? (pe अध्याय २९ परि. ६, ७)
नं. ४: सर्वात अधिक महत्त्वाचे मित्र मिळवणे (yy अध्याय ८ परि. २०-२३)
ऑक्टो. ७ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती २४ आणि २५
गीत नं. २०५ (११८)
नं. १: आधुनिक काळातील पवित्र शास्त्र—भाग १ (si पृ. ३१९-२० परि. १-८)
नं. २: उत्पत्ती २५:१९-३४
नं. ३: ख्रिस्ताने पतींसाठी कोणकोणत्या रितीने उदाहरण घालून दिले? (pe अध्याय २९ परि. ८, ९)
नं. ४: ज्याला आत्मा म्हणतात ती जीवन-शक्ती काय आहे? (td ५५बी)
ऑक्टो. १४ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती २६ ते २८
गीत नं. २१३ (९९)
नं. १: आधुनिक काळातील पवित्र शास्त्र—भाग २ (si पृ. ३२०, ३२२-३ परि. ९-१५)
नं. २: उत्पत्ती २८:१०-२२
नं. ३: पत्नीची शास्त्रवचनीय भूमिका कोणती आहे? (pe अध्याय २९ परि. १०, ११)
नं. ४: काहींना घरी कंटाळवाणे का वाटते? (yy अध्याय ९ परि. १-९)
ऑक्टो. २१ लेखी चाचणी. प्रकटीकरण १ ते उत्पत्ती २८
गीत नं. ११४ (६१)
आक्टो. २८ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती २९ ते ३१
गीत नं. ८२ (६६)
नं. १: आधुनिक काळातील पवित्र शास्त्र—भाग ३ (si पृ. ३२३-५ परि. १६-२६)
नं. २: उत्पत्ती २९:९-२९
नं. ३: पत्नी आपल्या कुटुंबाला कसा लाभ मिळवून देऊ शकते? (pe अध्याय २९ परि. १२, १३)
नं. ४: भूतविद्या हा दुरात्मिक प्रकार आहे म्हणून तो वर्ज्य केला पाहिजे (td ५५सी)
नोव्हें. ४ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती ३२ ते ३५
गीत नं. १८३ (७३)
नं. १: आधुनिक काळातील पवित्र शास्त्र—भाग ४ (si पृ. ३२५-६ परि. २७-३२)
नं. २: उत्पत्ती ३४:१-७, २५-३१
नं. ३: मुलांनी कुटुंबात कोणते स्थान राखले पाहिजे? (pe अध्याय २९ परि. १४, १५)
नं. ४: तुम्हाला घरी कंटाळवाणे वाटण्यापासून कसे दूर राहता येईल? (yy अध्याय ९ परि. १०-१८)
नोव्हें. ११ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती ३६ ते ३८
गीत नं. ११५ (१५)
नं. १: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनचे फायदे—भाग १ (si पृ. ३२६-७ परि. १-६)
नं. २: उत्पत्ती ३७:५-११, २५-२८
नं. ३: पती व पत्नीने कोणत्या आज्ञा पाळल्या पाहिजे? (pe अध्याय २९ परि. १६, १७)
नं. ४: अंधश्रद्धांचा उगम सैतान व त्याच्या दुरात्म्यांकडून आहे (td ५६ए)
नोव्हें. १८ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती ३९ ते ४१
गीत नं. ३८ (६५)
नं. १: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनचे फायदे—भाग २ (si पृ. ३२७-८ परि. ७-१०)
नं. २: उत्पत्ती ३९:७-१०, १७-२३
नं. ३: वैवाहिक सोबत्यांनी एकमेकांशी विश्वासू का असले पाहिजे? (pe अध्याय २९ परि. १८, १९)
नं. ४: तुम्ही आईवडिलांच्या आज्ञा का मानाव्यात? (yy अध्याय १० परि. १-१२)
नोव्हें. २५ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती ४२ ते ४४
गीत नं. १६४ (८१)
नं. १: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनचे फायदे—भाग ३ (si पृ. ३२८-९ परि. ११-१८)
नं. २: उत्पत्ती ४४:१८-३४
नं. ३: पालकांवर कोणती दुहेरी जबाबदारी आहे? (pe अध्याय २९ परि. २०, २१)
नं. ४: ख्रिश्चनांनी सर्व अंधश्रद्धा टाळल्या पाहिजेत (td ५६बी)
डिसें. २ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती ४५ ते ४७
गीत नं. २२१ (५१)
नं. १: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनचे फायदे—भाग ४ (si पृ. ३३० परि. १९-२३)
नं. २: उत्पत्ती ४५:१-१३
नं. ३: मुलांनी कोणत्या आज्ञा पाळण्यास हव्या? (pe अध्याय २९ परि. २२)
नं. ४: आपल्या पालकांच्या आज्ञा पाळणे लाभदायक ठरते (yy अध्याय १० परि. १३-१७)
डिसें. ९ पवित्र शास्त्र वाचनः उत्पत्ती ४८ ते ५०
गीत नं. १८० (१००)
नं. १: उत्खनन व प्रेरित अहवाल—भाग १ (si पृ. ३३१ परि. १-५)
नं. २: उत्पत्ती ४९:१-१२
नं. ३: कुटुंबाने पवित्र शास्त्राचा एकत्र अभ्यास का करावा? (pe अध्याय २९ परि. २३)
नं. ४: आधुनिक भाषांतरात देवाचा तोच संदेश समाविष्ट आहे (td ५७ए)
डिसें. १६ पवित्र शास्त्र वाचनः निर्गम १ ते ४
गीत नं. ६८ (१४)
नं. १: उत्खनन व प्रेरित अहवाल—भाग २ (si पृ. ३३२-४ परि. ६-१२)
नं. २: निर्गम ३:६-१०, १३-१७
नं. ३: विवाहीत सोबत्यांनी एकमेकांच्या उणीवांकडे कसे पहावे (pe अध्याय २९ परि. २४, २५)
नं. ४: शाळेत शिकण्यामुळे होणारे फायदे (yy अध्याय ११ परि. १-१८)
डिसें. २३ पवित्र शास्त्र वाचनः निर्गम ५ ते ८
गीत नं. ८६ (४५)
नं. १: उत्खनन व प्रेरित अहवाल—भाग ३ (si पृ. ३३४-६ परि. १३-२०)
नं. २: निर्गम ६:१-१३
नं. ३: कोणत्या पवित्र शास्त्रीय सल्ल्याकडे लक्ष दिल्यामुळे वैवाहिक सोबत्यांना आपल्या समस्या सोडविण्यात मदत मिळेल? (pe अध्याय २९ परि. २६, २७)
नं. ४: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ही आवृत्ती पवित्र शास्त्राची समज वाढविते (td ५७बी)
डिसें. ३० पवित्र शास्त्र वाचनः निर्गम ९ ते १२
गीत नं. १५९ (६७)
नं. १: उत्खनन व प्रेरित अहवाल—भाग ४ (si पृ. ३३६-७ परि. २१-२७)
नं. २: निर्गम १२:१-१३
नं. ३: घटस्फोटाविषयी पवित्र शास्त्राची भूमिका काय आहे? (pe अध्याय २९ परि. २८, २९)
नं. ४: जे सुरु केले आहे ते का संपवावे? (yy अध्याय १२ परि. १-१२)
जाने. ६ पवित्र शास्त्र वाचनः निर्गम १३ ते १६
गीत नं. १७१ (५९)
नं. १: पवित्र शास्त्र—विश्वसनीय व खरे—भाग १ (si पृ. ३३७-८ परि. १-८)
नं. २: निर्गम १४:१९-३१
नं. ३: पालकांना आपल्या मुलांशी विचारविनिमय कसा करता येईल? (pe अध्याय २९ परि. ३०-३३)
नं. ४: देव, पिता हा विश्वामध्ये सर्वथोर (td ५८ए)
जाने. १३ पवित्र शास्त्र वाचनः निर्गम १७ ते २०
गीत नं. १३९ (७४)
नं. १: पवित्र शास्त्र—विश्वसनीय व खरे—भाग २ (si पृ. ३३९ परि. ९-१३)
नं. २: निर्गम २०:१-१७
नं. ३: जीवनाच्या मार्गावर येण्यासाठी कोणती मूलभूत पावले उचलण्यास हवी? (pe अध्याय ३० परि. १-३)
नं. ४: ज्यांनी आपले काम सुरु केले व संपविले त्यांचे अनुकरण करा (yy अध्याय १२ परि. १३-१६)
जाने. २० पवित्र शास्त्र वाचनः निर्गम २१ ते २४
गीत नं. ९५ (५२)
नं. १: पवित्र शास्त्र—विश्वसनीय व खरे—भाग ३ (si पृ. ३४० परि. १४, १५)
नं. २: निर्गम २४:१-११
नं. ३: देवाच्या चांगुलपणाविषयीची आवड आम्हास काय करण्यास लावील? (pe अध्याय ३० परि. ४, ५)
नं. ४: पृथ्वीवर येण्याआधी व येऊन गेल्यावर देखील पुत्र हा पित्यापेक्षा कनिष्ठच आहे (td ५८बी)
जाने. २७ पवित्र शास्त्र वाचनः निर्गम २५ ते २८
गीत नं. १३ (७७)
नं. १: पवित्र शास्त्र—विश्वसनीय व खरे—भाग ४ (si पृ. ३४०-१ परि. १६-२०)
नं. २: निर्गम २५:१-१६
नं. ३: समर्पणासाठी कोणती पावले कोणाच्या अनुकरणार्थ उचलली पाहिजे? (pe अध्याय ३० परि. ६-८)
नं. ४: आम्हाला शिस्तीची गरज का आहे (yy अध्याय १३ परि. १-६)
फेब्रु. ३ पवित्र शास्त्र वाचनः निर्गम २९ ते ३२
गीत नं. १४३ (७६)
नं. १: पवित्र शास्त्र—विश्वसनीय व खरे—भाग ५ (si पृ. ३४१-२ परि. २१-२५)
नं. २: निर्गम ३२:१९, २०, २५-३५
नं. ३: समर्पण हे एखाद्याला कोणत्या कामामध्ये समाविष्ट होण्याचे बंधन घालते? (pe अध्याय ३० परि. ९, १०)
नं. ४: येशू पृथ्वीवर होता तेव्हा मानव होता, ईश्वरी आत्मा नव्हता (td ५८सी)
फेब्रु. १० पवित्र शास्त्र वाचनः निर्गम ३३ ते ३६
गीत नं. १४४ (७८)
नं. १: प्रेरित शास्त्रवचने चिरकालिक फायदे देतात—भाग १ (si पृ. ३४९-५० परि. १-७)
नं. २: निर्गम ३४:१-१०, १२-१४
नं. ३: सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी कशाची गरज आहे? (pe अध्याय ३० परि. ११, १२)
नं. ४: शिस्त स्वीकारणे कठीण का वाटते? (yy अध्याय १३ परि. ७-९)
फेब्रु. १७ पवित्र शास्त्र वाचनः निर्गम ३७ ते ४०
गीत नं. २०२ (८२)
नं. १: प्रेरित शास्त्रवचने चिरकालिक फायदे देतात—भाग २ (si पृ. ३५०-२ परि. ८-१६)
नं. २: निर्गम ३९:३२-४३
नं. ३: कोणी चिरकालिक जीवनाची निवड केली आहे, हे तो कसे दाखवतो? (pe अध्याय ३० परि. १३-१५)
नं. ४: देव व ख्रिस्ताचे ऐक्य (td ५८डी)
फेब्रु. २४ लेखी चाचणी. उत्पत्ती २९ ते निर्गम ४० पूर्ण
गीत नं. ८५ (४४)