तुम्ही त्रैक्य मानावे का? या माहितीपत्रकाच्या अभ्यासाचे प्रश्न
पहिला आठवडा
पृष्ठ ३, शीर्षकः “तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार का?”
१, २. त्रैक्याच्या तत्वाविषयी कोणते परिक्षण करता येण्याजोगे आहे?
३. त्रैक्याचा विषय आज आमच्या दिवसाकरता आस्थेचा का वाटावा?
४. त्रैक्याची परिभाषा थोडक्यात सांगता येईल का?
५. त्रैक्य न मानणाऱ्यांचे काय म्हणणे आहे?
६. त्रैक्याच्या मूळारंभाविषयी (अ) त्याचे पुरस्कर्ते, (ब) त्यावर टीका करणारे काय म्हणतात?
७. (अ) त्रैक्य खरे आहे तर, (ब) त्रैक्य खोटे आहे तर काय काय परिणाम दिसतील?
८. या माहितीपत्रकात कशाचे परिक्षण केले जाईल?
पृष्ठ ३, शीर्षकः “त्रैक्याचे स्पष्टीकरण कसे देण्यात येते?”
१. कॅथोलिक चर्च त्रैक्याची व्याख्या कशी देते?
२, ३. इतर बहुतेक चर्चेस या तत्त्वाची कशी व्याख्या देतात?
पृष्ठ ४:
१. त्रैक्याच्या स्पष्टीकरणाविषयी पुष्कळांची कशी प्रतिक्रिया दिसते?
२-४. त्रैक्याविषयी विविध उगम काय सांगतात?
५, ६. एक कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ पाठशाळेतील विद्यार्थी व शिक्षकांविषयी काय सांगतो, आणि त्या विवेचनांविषयीची सत्यता तुम्हाला कशी पडताळून पाहता येईल?
७. एक जेसुईट पंथीय पाळक त्रैक्याविषयी काय म्हणतात?
८. एका कॅथोलिक वेदांत्याने कोणते योग्य परिक्षण केले आहे?
९. काहीजण त्रैक्याच्या मूळारंभाचे कसे स्पष्टीकरण देतात?
१०. व पृष्ठ ५, परि. १. त्रैक्य हे ईश्वरी प्रकटीकरणाद्वारे आले असावे हे मतप्रतिपादन कोणती प्रधान समस्या निर्माण करते?
२. ‘खरा देव व त्याचा पुत्र यांना ओळखण्यासाठी’ लोकांनी खरेच वेदांती असण्याची गरज आहे का?
दुसरा आठवडा
पृष्ठ ५, शीर्षकः “ती पवित्र शास्त्राची स्पष्ट शिकवण आहे का?”
१. त्रैक्य खरे आहे तर मग, ते पवित्र शास्त्रात स्पष्टपणे का शिकवण्यात आले पाहिजे?
२. पहिल्या शतकातील विश्वासधारकांनी शास्त्रवचनांविषयी कोणता दृष्टीकोण धरला?
३, ४. प्रेषित पौल तसेच येशू यांनी आपल्या शिक्षणाचा आधार म्हणून कशाचा वापर केला?
५, ६. (अ) पहिल्या शतकातील विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी शास्त्रवचनांचे श्रेय कोणास दिले? (ब) त्रैक्य खरे असल्यास पवित्र शास्त्रात खरेपणाने आपल्याला काय आढळले पाहिजे?
७-९. (अ) “त्रैक्य” या शब्दाविषयी प्रॉटेस्टंट तसेच कॅथोलिक उगम देखील काय कबूली देतात, आणि हा शब्द प्रथमतःच चर्च वेदांतीय लिखाणात केव्हा आढळतो? (ब) टर्टुलिनने त्रैक्यासाठी असणाऱ्या लॅटिन शब्दाचा वापर केला म्हणून त्याने त्या शिक्षणाचा पुरस्कार केला असे म्हणावे का?
पृष्ठ ६:
१, २. इब्री शास्त्रवचने व त्रैक्य याविषयी दोन एन्सायक्लोपिडिआ काय कबूल करतात?
३. इब्री शास्त्रवचनांनी दिलेल्या साक्षीविषयी एक यहुदी प्रामाण्य काय सांगतात?
४. इब्री शास्त्रवचनांचे केलेले परिक्षण काय दाखवते?
५-७. त्रैक्य व ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने याविषयी दोन उगम काय सांगतात?
८-१०. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात त्रैक्य शिकवण्यात आलेले नाही याविषयी कोणती अवतरणे उद्धृत करता येतील?
११, १२. ख्रिस्ती धर्मराज्यात त्रैक्याचे शिक्षण केव्हापासून शिकवण्यात येऊ लागले असे दोन इतिहासकारांचे म्हणणे आहे?
१३. पुरावा आपल्याला कोणत्या निर्णयाप्रत निरवितो?
१४-१७. आरंभीच्या ख्रिश्चनांनी ते शिकवले होते का?
पृष्ठ ७:
१. केवळ कोणत्या काळानंतर त्रैक्याच्या शिक्षणाची प्रस्थापना झाली?
२, ३. देव व ख्रिस्त यांजविषयी दुसऱ्या शतकातील जस्टीन मार्टीन तसेच ईरेनियस यांनी कोणता दृष्टीकोन बाळगला होता?
४, ५. अलेक्झांड्रियाच्या क्लेमेंत तसेच टर्टुलिनने कोणते दृष्टीकोन बाळगले होते?
६, ७. तिसऱ्या शतकात हिप्पोलायटस व ऑरिजन यांनी कोणती विवेचने मांडली?
८. त्रैक्याच्या पुराव्याविषयी एक इतिहासकार कोणता गोषवारा प्रस्तुत करतात?
९. पवित्र शास्त्र तसेच इतिहास याद्वारे कोणती स्पष्ट साक्ष मिळते?
तिसरा आठवडा
पृष्ठ ७, शीर्षकः “त्रैक्याच्या तत्त्वाची कशी वाढ झाली?”
१, २. इ.स. ३२५ मध्ये निका येथील परिषदेत त्रैक्याच्या शिक्षणाची पूर्णपणे रचना झाली का?
पृष्ठ ८:
१. कॉन्स्टंटाईन याने निका येथे का सभा बोलावली?
२. कॉन्स्टंटाईनच्या परिवर्तनाविषयी एक इतिहासकार काय सांगतो?
३. निका येथे कॉन्स्टंटाईनने कोणती भूमिका पार पाडली?
४. निका येथील सभेत ज्या वेदांतीय प्रश्नांवर वादविवाद चालला तो कॉन्स्टंटाईनला खराच समजू शकला का?
५. निका येथील सभेत जे संमत करण्यात आले त्याच्या दृष्टीकोनातून कोणते प्रश्न विचारता येतील?
६, ७. (अ) निका येथील परिषदेनंतर काय घडले? (ब) इ.स. ३८१ मधील कॉन्स्टँटिनोपलच्या परिषदेत काय निश्चित करण्यात आले?
८. कॉन्स्टँटिनोपलची परिषद संपल्यावर काय झाले, आणि केव्हा त्रैक्याला तत्त्वप्रणाली या अर्थाने मान्यता मिळाली?
पृष्ठ ९:
१. अथेनेसियस हा कोण होता, आणि त्याचे नाव असणारे तत्त्व काय सांगते?
२. (अ) अथेनेसियस याने आपले नाव असणाऱ्या तत्त्वाची रचना केली का? (ब) युरोपात अथेनेशियन तत्त्वाला विस्तारित मान्यता मिळण्यासाठी किती काळ लागला?
३. त्रैक्याला विस्तारित मान्यता मिळण्यासाठी जी शतके लागली त्यात तो निर्णय बहुतांशी कशाने समंत झाला?
४. त्रैक्याचा इतिहास पवित्र शास्त्र भविष्यवादाशी कसा जुळतो?
५, ६. प्रेषित पौल तसेच इतर पवित्र शास्त्र लेखकांनी काय भाकिते केली?
७. (अ) खऱ्या ख्रिस्ती उपासनेपासून दूर नेण्याला कोण कारणीभूत आहे असे येशूने दाखविले? (ब) जे काही घडले त्याविषयी एक एन्सायक्लोपिडीआ काय सांगतो?
चवथा आठवडा
पृष्ठ ९, परि. ८ व पृष्ठ ११, परि. १. (अ) प्राचीन काळी खोट्या भक्तीचा सामान्य प्रकार कोणता होता? (ब) इतिहासकारांच्या मते त्रैक्याची कल्पना ख्रिस्ती धर्मात कशी घुसली?
पृष्ठ १०:
१. प्राचीन मूर्तिपूजक धर्म, हिंदू व बौद्ध धर्म आणि ख्रिस्तीधर्मराज्यातील धर्म यात कोणते साम्य दिसते?
पृष्ठ ११:
२, ३. मूर्तिपूजक त्रैक्याची मिसरी उपासना तसेच ख्रिस्ती धर्मराज्याचे त्रैक्य यात कोणती सांगड आहे?
४. त्रैक्याच्या मूळारंभाविषयी दोन उगम कोणता निर्वाळा देतात?
५. हेस्टिंग्ज यांचा एन्सायक्लोपिडिआ ऑफ रिलिजन ॲण्ड एथिक्स मूर्तिपूजक त्रैक्ये व ख्रिस्ती धर्मजगतातील त्रैक्य यातील सांगड याविषयी काय माहिती देतो?
६, ७. ग्रीक तत्त्ववेत्ता प्लॅटो याने ख्रिस्ती धर्मराज्याच्या त्रैक्याच्या नंतरच्या वाढीवर कसा प्रभाव पाडला?
८, ९. त्रैक्याच्या घडामोडीवरील प्लॅटोचा प्रभाव इतिहासकारांनी कसा दाखवला आहे?
१०, ११. तिसऱ्या शकाच्या समाप्तीपर्यंत काय घडले?
१२. त्रैक्याच्या वाढीविषयी एका धार्मिक उगमाने जे परिक्षण केले आहे त्याद्वारे काय म्हणता येईल?
पृष्ठ १२:
१. पवित्र शास्त्र भविष्यवादाच्या सहमतात इ.स.च्या चवथ्या शतकात कोणती गोष्ट पूर्ण स्वरूपात बहरली?
२. त्रैक्याचे तत्त्व हे देवाकडून आलेले नाही हे कशामुळे दिसते?
३, ४. (अ) ख्रिश्चनांनी त्रैक्याचा स्वीकार करणे व्यवहार्य का नाही? (ब) यास्तव त्रैक्याच्या कोणत्या निर्णयाला आपण आले पाहिजे?
पृष्ठ १२, शीर्षकः “देव व येशू यांच्याविषयी पवित्र शास्त्र काय म्हणते?”
१, २. लोकांनी आधीच कोणतेही मत न ठरविता पवित्र शास्त्राचे वाचन केल्यास ते देव व ख्रिस्त यांच्याविषयी कोणत्या निष्कर्षास पोहंचतील?
३, ४. चर्च इतिहासाचे एक प्राध्यापक (अ) इब्री शास्त्रवचने व (ब) ग्रीक शास्त्रवचने यामधील देवाविषयीच्या दृष्टीकोनाबद्दल काय म्हणतात?
५. अनुवाद ६:४ मधील व्याकरण देव ही एकच व्यक्ती असल्याचे कसे दाखविते?
पृष्ठ १३:
१. देवाच्या व्यक्तीत्वाविषयी प्रेषित पौलाने कोणती पुष्टी दिली?
२. पवित्र शास्त्रात देवाविषयी काय सांगण्यात आले आहे?
३. त्रैक्य खरे असते तर प्रेरित पवित्र शास्त्र लेखकांनी कोणती स्पष्टता पुरविली असती?
४. पवित्र शास्त्र लेखकांनी कोणती स्पष्टता पुरविली?
पाचवा आठवडा
५. (अ) येशूने देवास कसे संबोधिले? (ब) केवळ यहोवालाच सर्वसमर्थ असे का संबोधिले गेले?
६. यहोवाला इब्री शास्त्रवचनात अनेकवचनी स्वरूपात का दर्शविण्यात आले आहे?
७. देव या शब्दासाठी इब्री भाषेत अनेकवचनी शब्द असला तरी तो केवळ एकाच व्यक्तीला उद्देशून आहे हे कसे दाखवता येते?
८. ʼएलो․हीमʹ हा शब्द त्रैक्याविरूद्ध आपला वाद का मांडतो?
९. पवित्र शास्त्र “देव” किंवा ‘अनेक देव’ हा शब्दप्रयोग कोणास लागू करते?
१०. “देव” व ‘अनेक देव’ यासाठी पवित्र शास्त्रात वापरण्यात आलेला शब्द त्रैक्यास का आधार देत नाही?
पृष्ठ १४:
१. येशूने, आपण कोठून आलो आहोत असे म्हटले?
२. येशू, मानवीप्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वात कसा होता?
३. पवित्र शास्त्र येशूला त्याच्या मानवीप्रकृतीपूर्वीच्या अस्तित्वामध्ये कोणत्या नावाने संबोधिते, आणि या संज्ञेचा आपण कसा अर्थ घ्यावा?
४. पवित्र शास्त्रातील नीतीसूत्रे पुस्तकातील “ज्ञान” कोण आहे, व याचा कसा उद्भव झाला?
५. मानवीप्रकृतीपूर्वीच्या येशूबद्दल नीतीसूत्रे ८:३० काय म्हणते, आणि कलस्सैकर १:१६ या भूमिकेला कशी पुष्टी देते?
६. निर्मितीकार्याच्या अनुषंगाने पवित्र शास्त्र देव व येशू यांजमधील नातेसंबंध कसा दर्शविते?
७. उत्पत्ती १:२६ मधील “आपल्या” व “आपण” हे शब्द त्रैक्याला का सूचित करीत नाहीत?
८, ९. येशूची घेण्यात आलेली परिक्षा हे कसे दाखविते की तो देव नव्हता?
पृष्ठ १५:
१, २. निष्ठावंत असण्याबाबत येशूला निवड होती ही गोष्ट काय दाखविते?
सहावा आठवडा
३, ४. आदामाच्या पापाची भरपाई करण्यासाठी खंडणीची किंमत केवढी असली पाहिजे?
५. (अ) येशू जर त्रिमस्तकीय देवापैकी एक असता तर याचा खंडणी यज्ञार्पणाच्या बाबतीत कोणता अर्थ झाला असता? (ब) येशू पृथ्वीवर असताना त्याचा जो दर्जा होता त्याद्वारे तो देव असू शकत नव्हता हे कसे दिसते?
६. येशू हा देवाचा “एकुलता एक पुत्र” होता ही गोष्ट त्रैक्याविरूद्ध कोणता वाद मांडते?
७. “एकुलता एक” या संज्ञेचे प्रतिपादन काही धार्मिक विवेचनकार कशा पद्धतीने करतात, पण ते का अव्यवहार्य आहे?
८. पवित्र शास्त्र “एकुलता एक” हा शब्द येशूशिवाय आणखी कोणाला अनुलक्षून वापरते व कोणत्या अर्थी?
पृष्ठ १६:
१, २. “एकुलता एक” यासाठी कोणता ग्रीक शब्द आहे, व त्याचा काय अर्थ होतो?
३. पवित्र शास्त्र देवाला येशूचा पिता असे म्हणते तेव्हा त्याचा काय अर्थ होतो?
४. पवित्र शास्त्र येशूबद्दल “एकुलता एक” अशी संज्ञा वापरते ते अर्थसूचक का आहे?
५. येशूविषयी दुरात्म्यांना तसेच रोमी शिपायांना देखील काय माहीत होते?
६. येशू हा देव का असू शकत नाही?
७. येशूचे “मध्यस्थ” असणे ही गोष्ट, तो देव असू शकत नाही हे कसे दाखविते?
८. तर मग, देव व येशूविषयी स्पष्ट अशी पवित्र शास्त्रीय शिकवण काय आहे?
सातवा आठवडा
पृष्ठ १६, शीर्षकः “देव येशूपेक्षा नेहमीच श्रेष्ठ आहे का?”
१, २. येशूने देवासोबत असणाऱ्या त्याच्या नातेसंबंधाविषयी काय दर्शविले?
पृष्ठ १७:
१. येशूने स्वतःबद्दल असे काय म्हटले ज्याकरवी तो देवापेक्षा वेगळा होता हे दिसले?
२. देव व येशू हे वेगळे, भिन्न आहेत हे प्रेषित पौलाने कसे सूचित कले?
३. एखाद्या गोष्टीविषयीची स्पष्टता होण्यासाठी दोन साक्षीदारांची गरज असते हे जे नियमशास्त्रात सांगण्यात आले आहे ते येशू व देवाविषयीच्या साक्षीच्या प्रकरणात कसे जुळते?
४. येशूने मार्क १०:१८ मध्ये हे कसे दाखवून दिले की, तो देवांच्या मस्तकापैकीचा एक नव्हता?
५. येशूने वदविलेली कोणती विधाने देवाची श्रेष्ठता दाखवितात?
६. येशूने दिलेला कोणता दृष्टांत तो देवाशी अधीन असल्याचे विवेचीत करतो?
पृष्ठ १८:
१. येशूच्या अनुयायांनी त्याच्याविषयीचा कोणता दृष्टीकोन धरला होता?
२. येशूचा बाप्तिस्मा कसे सिद्ध करतो की तो देव नव्हता?
३. यहोवाने येशूचा अभिषेक करणे हे काय सूचित करते?
४. दोघा शिष्यांच्या आईसोबत संभाषण करताना येशूने आपल्या पित्याची श्रेष्ठता कशी स्पष्ट केली?
५. येशूच्या प्रार्थना काय दाखवितात?
६. येशू मरण्याच्या बेतात असताना त्याने केलेली आरोळी देवाची श्रेष्ठता कशी प्रकटविते?
७. येशूचे मरण व पुनरूत्थान या गोष्टी तो देव आहे या मताविरूद्ध कसे प्रतिपादन करतात?
८. येशूठायी अद्भूत चमत्कार करण्याचे असलेले सामर्थ्य, तो देव असल्याचे का सूचित करीत नाही?
आठवा आठवडा
पृष्ठ १९:
१. या व्यवस्थीकरणाचा शेवट केव्हा होईल हे येशूला का माहीत नव्हते?
२. इब्रीयांस ५:८ येशू देव असू शकत नाही हे कशाप्रकारे दाखविते?
३. प्रकटीकरण १:१ कसे दाखविते की, येशू हा देव असू शकत नाही?
४, ५. पुनरूत्थानानंतर येशूला उच्च करण्यात आले ही गोष्ट काय दाखविते?
६-८. येशूच्या पुनरूत्थानाविषयी देण्यात आलेले पुढील अहवाल त्रैक्याविरूद्धचे कसे प्रतिपादन मांडतात? (अ) इब्रीयांस ९:२४; (ब) प्रे. कृत्ये ७:५५; (क) प्रकटीकरण ४:८ ते ५:७.
९, १०. पुनरूत्थित येशूविषयी रायलँड यांचे बुलेटीन काय परिक्षण करते?
पृष्ठ २०:
१. येशू देवास किती काळापर्यंत अधीन राहणार?
२. करिंथकरांस पहिले पत्र ११:३ येशूपेक्षा देवाचे श्रेष्ठत्व कसे दाखविते?
३-५. आधुनिक काळात प्राप्त झालेल्या संशोधनामुळे अधिकाधिक प्रामाण्यांना कोणत्या निष्कर्षाप्रत निरविले गेले आहे?
नववा आठवडा
पृष्ठ २०, शीर्षकः “पवित्र आत्मा—देवाची क्रियाशील शक्ती”
१. पवित्र आत्मा काय आहे असे त्रैक्याचे शिक्षण सांगते?
२. पवित्र शास्त्रात “आत्मा” यासाठी कोणता इब्री व कोणता ग्रीक शब्द वारंवार वापरण्यात आला आहे?
३, ४. उत्पत्ती १:२ मध्ये लिखित आहे त्यानुसार पवित्र आत्मा काय असल्याचे पवित्र शास्त्र म्हणते?
५. देवाचा पवित्र आत्मा त्याच्या सेवकांना कसे प्रज्वलित करतो याची उदाहरणे द्या.
६. पवित्र आत्म्याकरवी पवित्र शास्त्र लेखकांना कसे प्रभावित करण्यात आले?
७. पवित्र आत्मा ही शक्ती आहे हे कोणत्या उदाहरणामुळे स्पष्ट होते?
८. देव आपल्या आत्म्याचा वापर कसा करतो?
पृष्ठ २१:
१. देवाचा आत्मा त्याच्या सेवकांना काय देतो?
२. शमशोनाचे बळ कोठून आले, आणि ती शक्ती कोणी व्यक्ती होते का?
३. येशूवर पवित्र आत्मा कोणत्या स्वरूपात आला, व त्याने येशूला काय करण्यास समर्थ केले?
४, ५. पवित्र आत्मा कोणत्या रूपात शिष्यांवर उतरला व त्यांना काय करण्याचे सामर्थ्य मिळाले?
६. पवित्र शास्त्रात पवित्र आत्म्याचे वर्णन देण्यासाठी ज्या व्यक्तीवाचक संज्ञा देण्यात आल्या आहेत त्याविषयी एक वेदांती काय म्हणतात?
७. ज्या गोष्टी व्यक्ती नाहीत अशांनाही शास्त्रवचने व्यक्तीवाचक रूपाने कशाप्रकारे संबोधितात?
८. पहिले योहान ५:६-८ वचने पवित्र आत्मा व्यक्ती नसल्याची कशी स्पष्टता देतात?
९. पवित्र शास्त्रात वापरण्यात आलेल्या कोणत्या सर्वसाधारण संज्ञा पवित्र आत्मा व्यक्ती नसल्याचे दाखविते?
पृष्ठ २२:
१. पवित्र आत्मा बोलतो असे जे पवित्र शास्त्र म्हणते त्याचे आम्हाला कसे स्पष्टीकरण देता येईल?
२. मत्तय २८:१९ मध्ये “पवित्र आत्म्याच्या नामाने” असे जे म्हणण्यात आले, त्याचा अर्थ काय होतो?
दहावा आठवडा
३. (अ) येशूने “कैवारी” या शब्दासाठी बोलताना ग्रीक भाषेत जो शब्द वापरला तो पुर्ल्लिगी रूपात का वापरला? (ब) “आत्मा” याजसाठी कोणता नपुसकलिंगी ग्रीक शब्द वापरण्यात येतो?
४. एक कॅथोलिक पवित्र शास्त्र, त्याने “आत्मा” यासाठी वापरलेले पुर्ल्लिगी व्यक्तीवाचक सर्वनाम सुयोग्य नसल्याचे कसे कबूल केले आहे?
५. “कैवारी” शब्दासाठी ग्रीक वचनात पुर्ल्लिगी व्यक्तीवाचक सर्वनाम का वापरण्यात आले आहे?
६-८. दोन कॅथोलिक उगम पवित्र आत्म्याविषयी काय कबूली देतात?
९, १०. दोन कॅथोलिक उगम पवित्र आत्म्याविषयीच्या पवित्र शास्त्राच्या दृष्टीकोणास आपले पाठबळ कसे दर्शवितात?
११. पवित्र आत्मा ही एक व्यक्ती आहे हे ख्रिस्ती धर्मराज्याने केव्हा जाहीर केले?
पृष्ठ २३:
१. देवाचा पवित्र आत्मा काय आहे व काय नाही?
पृष्ठ २३, शीर्षकः “त्रैक्य ‘सिद्ध करून दाखविणारी वचने’ यांच्याविषयी काय?”
१, २. त्रैक्याच्या पुराव्यादाखल जी शास्त्रवचने सादर केली जातात त्याविषयी काय लक्षात ठेवण्यास हवे?
३. कॅथोलिक एन्सायक्लोपिडिआ कोणती तीन “सिद्ध करून दाखविणारी वचने” सादर करते?
४. त्रैक्याच्या पुराव्यादाखल जी शास्त्रवचने सादर करण्यात आली ती काय सांगतात?
५-७. मॅक्लीनटॉक व स्ट्राँग यांचा सायक्लोपिडिआ यामध्ये कबूली दिलेली आहे त्याप्रमाणे त्रैक्याच्या पुराव्यादाखल देण्यात आलेली ही शास्त्रवचने प्रत्यक्षात काय सिद्ध करतात?
८. मत्तय ३:१६ मध्ये देव, येशू व पवित्र आत्मा यांचा उल्लेख असला तरी तो त्रैक्यास आधार का ठरत नाही?
९. काही जुन्या पवित्र शास्त्र भाषांतरात १ योहान ५:७ हे जसे आढळते ते आम्हाला का योग्यपणे खोडता येते?
पृष्ठ २४:
१. इतर “सिद्ध करून दाखविणारी वचने” त्रैक्यास का आधार देत नाहीत?
अकरावा आठवडा
२. “मी आणि पिता एक आहो,” असे म्हणण्याचा काय अर्थ होता हे येशूनेच स्वतः कसे दाखवून दिले आहे?
३. “एक” या शब्दासाठी असणाऱ्या ग्रीक शब्दाचा पौल ज्या पद्धतीने वापर करतो त्याद्वारे विचार व उद्देश यात एक असण्याचा भावार्थ योहान १०:३० मध्ये वापरण्यात आलेल्या शब्दातही असल्याचे कसे स्पष्ट होते?
४. सोळाव्या शतकातील जॉन केल्विन यांनी योहान १०:३० हे वचन त्रैक्याच्या पुराव्यादाखल वापरण्याविषयी काय म्हटले?
५. योहानाच्या १० व्या अध्यायात येशूने आपण स्वतः देव नाही हे कसे प्रतिपादित केले?
६-८. योहान ५:१८ मध्ये यहुद्यांनी येशूवर कोणता दोषारोप लावला व तो त्याने कसा खोडला?
पृष्ठ २५:
१. डुए व्हर्शन तसेच किंग जेम्स व्हर्शन फिलिप्पैकर २:६ हे वचन कसे सादर करते, आणि त्यामागील हेतू कोणता होता?
२-७. कित्येक पवित्र शास्त्र भाषांतरे फिलिप्पैकर २:६ चा अनुवाद कसा देतात व त्याकरवी डुए व्हर्शन तसेच किंग जेम्स व्हर्शन आवृत्तींनी प्रतिपादिलेल्या अर्थाच्या विरूद्ध अर्थ कसा दाखवितात?
८, ९. (अ) फिलिप्पैकर २:६ च्या अधिक अचूक सादरतेविषयी कोणता दावा करण्यात आला आहे? (ब) फिलिप्पैकर २:६ मध्ये जी ग्रीक भाषा वापरण्यात आली आहे ती येशू हा देवाच्या बरोबरीचा होता ही कल्पना का सादर करीत नाही?
१०. देवाच्या बरोबरीचा असणे चुकीचे आहे असा विचार येशूने केला नव्हता, या पद्धतीने फिलिप्पैकर २:६चे भाषांतर सादर करणाऱ्या आवृत्त्या प्रत्यक्षात काय करतात, पण ग्रीक भाषेतील त्या वचनाचे वास्तविक वाचन खरेपणाने काय प्रकटविते?
११. फिलिप्पैकर २:६ च्या आधीची वचने येशूला देवासमान बनण्याची इच्छा नव्हती हे कसे दाखवितात?
पृष्ठ २६:
१. फिलिप्पैकर २:३-८ वास्तविकपणे काय सांगते?
बारावा आठवडा
२. त्रैक्यास आधार मिळावा म्हणून त्रैक्यवादी योहान ८:५८ चा कसा वापर करतात?
३. निर्गम ३:१४ (किं.जे.) “मी आहे” ही संज्ञा कशी वापरते, आणि त्याचा काय अर्थ होतो?
४. “मी आहे” या संज्ञेचा वापर येशू योहान ८:५८ (जे.बी.) मध्ये कसा करीत होता?
५-९. विविध पवित्र शास्त्र आवृत्त्या योहान ८:५८ कसे सादर करतात?
१०. योहान ८:५८ येथील ग्रीक भाषेचा वास्तविक विचार कोणता आहे?
११. येशूचा काय अर्थ होता हे योहान ८:५८ आधीची काही वचने कसे दाखवितात?
१२. योहान १:१ किंग जेम्स व्हर्शनमध्ये कसे वाचण्यात येते?
पृष्ठ २७:
१. “शब्द” हा सर्वसमर्थ देव असू शकत नाही हे किंग जेम्स व्हर्शनसुद्धा दाखवीत असल्याचे एका प्रसिद्ध कॅथोलिक लेखकाने कसे स्पष्ट केले?
२-११. विविध पवित्र शास्त्रात योहान १:१ चा उत्तरार्ध कसा देण्यात आला आहे?
१२. ग्रीक भाषेत निश्चित उपपदाचा केलेला वापर योहान १:१ मधील पहिल्या थि․ऑसʹविषयी काय दाखवितो?
१३. योहान १:१ च्या उत्तरार्धातील दुसऱ्या थि․ऑसʹच्या वापरात निश्चित उपपद न आल्यामुळे त्या वाक्याची अक्षरार्थ सादरता कशी असणार?
१४. (अ) ग्रीक कोईन भाषेत दुसऱ्या थि․ऑसʹच्या आधी अनिश्चित उपपद का नाही? (ब) विधेय नामाच्या आधी कसलेही निश्चित उपपद नसले तर ते केव्हा अनिश्चित बनू शकते?
१५. योहान १:१ च्या उत्तरार्धाबद्दल जर्नल ऑफ बिब्लिकल लिटरेचर काय म्हणते?
१६. योहान १:१ मनुष्यप्रकृतीपूर्वीच्या येशूविषयी काय ठळक माहिती देते?
१७. ग्रीक शास्त्रवचनाच्या मजकुरात अनुवादकांनी कधी कधी “अ” (किंवा “एक”) अशा अनिश्चित उपपदाचा का वापर केला?
१८. योहान १:१ संबंधाने दोन प्रामाण्यांनी कोणती विवेचने मांडली?
तेरावा आठवडा
पृष्ठ २८:
१, २. योहान १:१ मधील दुसऱ्या थि․ऑसʹचे “एक देव” असे भाषांतर केल्यामुळे ग्रीक व्याकरणाच्या नियमाचा भंग होतो का?
३, ४. योहान १:१ च्या उत्तरार्धाचा संदर्भ थि․ऑसʹ या शब्दाआधी अनिश्चित उपपद लावण्याची गरज दाखवतो का?
५, ६. येशूला “एक देव” असे संबोधिणे हे एकच देव आहे या मताविरूद्ध मतभेद का निर्माण करीत नाही?
७. येशूला यशया ९:६ मध्ये “समर्थ देव” ही देण्यात आलेली पदवी तो यहोवा देव असल्याचे का सूचित करीत नाही?
८. देव व येशूविषयी रायलँड यांचे बुलेटिन काय विवेचन मांडते?
९. योहान २०:२८ मध्ये आढळते तसे थोमाने येशूला जेव्हा “माझा प्रभु, माझा देव” असे म्हटले तेव्हा ते त्याने कोणत्या अर्थाने म्हटले असावे?
पृष्ठ २९:
१. योहान २०:२८ चा मागचा पुढचा संदर्भ, थोमाने येशूविषयी सर्वसमर्थ देव असल्याचा अर्थ घेतला नसावा हे समजाविण्यात आमची कशी मदत करतो?
२. योहान २०:३१ वचन योहान २०:२८ ची स्पष्टता करण्याची कशी मदत देते?
३. त्रैक्याच्या पुराव्यार्थ दाखविण्यात आलेल्या कोणाही शास्त्रवचनाच्या बाबतीत आम्हाला काय म्हणता येईल?
४. त्रैक्याचे स्पष्ट शिक्षण देणारे एखादे तरी शास्त्रवचन आहे का?
चौदावा आठवडा
पृष्ठ ३०, शीर्षकः “देवाची त्याच्या नियमानुसार भक्ती करा”
१. सार्वकालिक जीवनाच्या प्राप्तीसाठी कोणते ज्ञान आवश्यक आहे?
२. (अ) देवाच्या सत्याविषयीच्या उगमाची ओळख द्या. (ब) सत्य जाणून घेतल्यामुळे काय टाळण्यात आमची मदत केली जाईल?
३. देवाची संमती मिळवावयाची आहे तर आम्ही स्वतःला काय विचारावयास हवे?
४. त्रैक्याचे शिक्षण देवाचा कसा अपमान करते?
५. त्रैक्याच्या शिक्षणामुळे कोणता परिणाम संभवला?
६. जेव्हा लोक “देवाची जाणीव अचूक ज्ञानाने” ठेवीत नाहीत तेव्हा कोणती कृती घडते?
७. त्रैक्यवाद्यांनी देवाचा कसा अपमान केला आहे?
८. ज्यांच्यापाशी सत्य आहे त्यांची व ज्यांच्यापाशी ते नाही त्यांची देवाचे वचन कशी ओळख देते?
९. एका डॅनिश वेदांत्याने ख्रिस्ती धर्मराज्याविषयी काय म्हटले?
१०. ख्रिस्ती धर्मराज्याच्या आध्यात्मिक स्थितीचे कसे वर्णन करता येईल?
पृष्ठ ३१:
१. ख्रिस्ती धर्मराज्याचा लवकरच कसा न्याय होईल, व का?
२. आम्ही त्रैक्याचा का धिक्कार करावा?
३. त्रैक्याच्या शिक्षणामुळे कोणाची आस्था जोपासली जाते?
४. देवाकडील अचूक ज्ञान बंधमुक्तता का देते?
५. देवाचा आदर करण्याची कोणती निकडीची कारणे आहेत?