शिष्य बनविण्यास आम्हास सहाय्य करणाऱ्या सभा
एप्रिल २ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १०८ (९५)
७ मि: स्थानिक घोषणा, आणि आमची राज्य सेवामधील निवडक घोषणा. या महिन्यात ज्या प्रचारकांनी आधीच क्षेत्रसेवेत भाग घेतला असेल त्यांचे उबदार अभिनंदन करा, आणि सर्वांनी एप्रिलमध्ये क्षेत्रसेवेत आवेशाने सहभागी होण्याचे उत्तेजन द्या. प्रचारकांना मंडळीच्या क्षेत्रसेवेच्या सर्व योजनांची आठवण द्या.
१८ मि: “कार्यक्षमतेत उत्तरोतर वाढ करण्याचा समय” प्रश्नोत्तराने लेखाची चर्चा. एप्रिल व मे महिन्यात सहाय्यक पायनियरींग करण्यास आधीच किती जणांनी नावे नोंदविलीत त्याचा उल्लेख करा. परिच्छेद ५ वर चर्चा चालू असताना मार्च १९९० मध्ये आमची राज्य सेवा पत्रिकेत “मासिकातील विशेष लेख” या लेखाचा उल्लेख करा. एप्रिल १ चा टेहळणी बुरुज मिळाला असेल तर त्यातील काही विशेष मुद्यांची थोडक्यात उजळणी करा. मेमोरियल समारंभ पार पाडण्याचे आयोजित असता तसेच या दोन महिन्यांच्या कालावधीत सर्वांनी आपापल्या क्षेत्रसेवेत वाढ करावी हे अगदी उबदारपणे प्रोत्साहन द्यावे.
२० मि: “सर्व्हायवल पुस्तकास एप्रिलमध्ये सादर करा.” यावर सेवा देखरेखे भाषण देतील. त्यातील काही बोलक्या मुद्यावर भर देऊन सर्व्हायवल पुस्तक कसे सादर करावे हे लक्षात घेण्यात प्रचारकांचे साहाय्य करा. अध्याय १ ते ७ सार्वजनिक लोकाकरता रचिले आहेत. यापैकी कोणाही अध्यायाची सुरवात संभाषणाचा विषयासोबत जुळत असेल तो उपयोगात आणावा व घरमालकास वाचून दाखवावा.
गीत २३ (४०) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल ९ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १९२ (१०)
७ मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल, सोबतच मार्चमध्ये पाठविलेल्या दानाबद्दल संस्थेकडून पोचपत्र असेल तर तेही वाचावे, व मंडळीने आपल्या आर्थिक सहाय्याद्वारा राज्यकामास जो हातभार लाविला त्याबद्दल उबदार कृतज्ञता व्यक्त करा. मंडळीतील सेवेच्या योजना जाहीर करा व प्रचारकांना सेवेला येण्याचे तसेच गटाच्या साक्षीकार्यात सहभागी होण्याचे उत्तेजन द्या.
१० मि: “प्रश्न पेटी” मधील लेखावर वडीलाकरवी भाषण. त्यातच संस्थेकरवी उत्पादित होणाऱ्या टेप्स केवढ्या उच्च व उत्तम प्रतीच्या आहेत व त्यांचा ख्रिश्चन बंधू कसा व्यक्तिगत व कौटुंबिकपणे वापर करू शकतील ते बघण्याचे बांधवांना प्रोत्साहन द्या.
१८ मि: “सुवार्ता सादरता—विवेकी दृष्टीसह.” प्रश्नोत्तराद्वारे. परिच्छेद ३ वरील चर्चा संपल्यावर घरमालकाच्या परिस्थितीस अनुकूल अशी सादरता कशी असावी याबद्दल दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके सादर करा. हे साध्य होताच किंवा मांडून त्याकडे वळताच प्रात्यक्षिक संपवावे.
१० मि: “ए टेस्ट ऑफ जेनुएननेस ऑफ युवर लव्ह,” या विषयावर वडीलाकरवी भाषण, जे वॉचटावर डिसेंबर १, १९८९ मधील पान २४ वरील लेखावर आधारीत असेल. (प्रांतिय भाषेतः टे.बु. ऑक्टोबर १, १९८९ मधील “तुम्ही कृतज्ञ असा.”) मंडळी स्थानिकरित्या व जगभर जी उदारता व्यक्त करते तिजबद्दल प्रशंसा करा.
गीत २२५ (११७) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल १६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २०८ (६)
१० मि: स्थानिक घोषणा. सप्ताहाच्या शेवटाला केलेल्या क्षेत्र सेवेची योजना घोषित करा. तसेच सादरता हे सूचित करते की, स्थानिक क्षेत्र भागात मासिकातील कोणते विषय चित्त आकर्षित ठरतील ते आधीच पहा.
२० मि: अधिक आस्थेस उत्तेजित करण्यास परत भेट घ्या. ज्या सर्वांनी सर्व्हायवल पुस्तक घेतेवेळी जी आवड दाखवली ती वाढविण्यास न चुकता प्रचारकांनी परत भेट घ्यावी. या आधीच्या भागात, ज्यांनी आवड दाखवली अशांची परत भेट घेऊन पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याचा प्रयत्न व्हावा. जेथे आवड दाखवली तेथे परत भेट देण्याचे उबदार प्रोत्साहन देऊन व याच्या गरजेबाबत अल्पशी चर्चा करून जेथे पुस्तक दिले आहे तेथे हे कसे साध्य करावे यांची एक किंवा दोन क्षणिक प्रात्यक्षिके दाखवा.
१५ मि: स्थानिक गरजा किंवा दैनिक वचन व त्यावरील विचार याची दररोज चर्चा करण्याचे मोल केवढे आहे यावर भाषण व प्रात्यक्षिक. हे कसे साध्य करावे याच्या काही सूचना द्या. हे भाषण एक्झामिनिंग द स्क्रिपचर्स डेली—१९९० च्या प्रस्तावनेवर आधारावे.
गीत ४६ (२०) व समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १२६ (२५)
१० मि: स्थानिक घोषणा. ईश्वरशासित वृत्त. सर्वांना या सप्ताहाचे शेवटास क्षेत्र सेवेत सहभागी होण्याचे उत्तेजन द्या. जे सर्व मे महिन्यात सहाय्यक पायनियरींग करणार अशांनी आपले अर्ज द्यावेत. अर्जप्रती अध्यक्षीय देखरेख्यांकडे मिळतील. वेळ असल्यास, चालू मासिकातील सादरता कशी करावी हे थोडक्यात दाखवा.
२० मि: “आमचे सेवकपण खंड पडू न देता पुढे चालू ठेवणे.” या लेखावर प्रश्नोत्तरे. एखाद्या कर्तबगार बंधूला परिच्छेद वाचावयास नेमा. श्रोत्यातील इतर दिलेली शास्त्रवचने वाचू व विचार मांडू शकतात. सर्व माहितीचा स्थानिकरित्या प्रचारक क्षेत्रावर कोणत्या अडीअडचणींना तोंड देतात व त्यावेळी उचित चित्तवृती कशी टिकवावी हे दाखवा. अंतापर्यंत उचित आवेशाने यहोवाची सेवा अखंडतेत करण्याचा सर्वांचा निर्धार असावा.
१५ मि: टेहळणी बुरुज वर्गणी सादर करा. जे सर्व यहोवाकडील नवीन जगात जीवन मिळविण्याच्या शोधात आहेत त्या सर्वांकरता टेहळणी बुरुज वर्गणीदार बनणे केवढ्या महत्त्वाचे आहे हे थोडक्यात निरनिराळ्या दृष्टीकोनातून विचार केल्यानंतर, वर्गणी सादर करण्याचे छोटे प्रात्यक्षिक दाखवा. टेहळणी बुरुज एप्रिलचा अंक उपयोगात आणीत असल्यास, प्रचारक या गोष्टीकडे अंगुली दर्शवून आवड उत्पादित करू शकतो की, देव लवकरच शांती स्थापेल. देवाचे वचन हे सत्य स्तोत्र ७२:७ मध्ये विदित आहे. शांतीचा मागोवा घेणारे हे पाहून अधिक उत्तेजीत होतील की, हेच वचन स्तोत्र ३७:१० व ११ मध्येही आहे की लवकरच खरी शांती स्थापीत होईल. वेळ असल्यास थोडक्यात वर्गणी सादरतेचे थेट प्रात्यक्षिक करावे.
गीत ७१ (९२) व समाप्तीची प्रार्थना.