ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा चाचणी
ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेत ऑक्टोबर ३०, १९८९ ते फेब्रुवारी १२, १९९० पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारीत पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.
[सूचनाः चाचणी परिक्षेच्या वेळी केवळ पवित्र शास्त्र वापरावे. प्रश्नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्तिगत संशोधनासाठी आहे. द वॉचटावरच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]
पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:
१. जखऱ्या ६:१२ मध्ये उल्लेखित, “कोंब” येशू ख्रिस्त आहे. [si पृष्ठ १७१, परि. २५]
२. जखर्या ८:२३ हे “दुसरी मेंढरे” यांचा “मोठा लोकसमुदाय” शेषांचे संगतीत शुद्ध भक्तीत सहभागी होतील असे भाकीत करते. (प्रकटी ७:९; योहान १०:१६) [wMR ८८ ३/१, पृष्ठ २०]
३. रोमकरांस पत्र, पुस्तकात पौलाने हे निश्चितपणे शाबीत केले की यहुदी व यहुदेत्तर यांना देवासमोर समान स्थान आहे. [si पृष्ठ २०४, परि. २]
४. रोममधील मंडळीची स्थापना प्रेषित पौलाने त्याच्या एका मिशनरी फेरीच्या वेळी केली होती. [si पृष्ठ २०५, परि. ३]
५. येशूच्या केवळ मोजक्याच शिष्यांनी येशू मृतातून उठाविला गेल्याची साक्ष दिली. [si पृष्ठ २११, परि. २०]
६. पौलाने करिंथमधील मंडळीला, त्याने आपल्या पहिल्या पत्रांत ज्या मनुष्याला बहिष्कृत करण्याचा आदेश दिला होता त्याने दुःख आणि पश्चाताप दाखविला म्हणून त्याला पूर्ववत प्रवेश द्यावा असे करिंथकर मंडळीला उत्तेजन दिले. [si पृष्ठ २१३, परि ६]
७. पौलाने त्याच्या “शरीरांत एक काटा” बोचतो, त्याला काढण्याकरिता तीन वेळा प्रार्थना केली म्हणून विनंती मान्य झाली. [si पृष्ठ २१५, परि. १६]
८. अगदीच अल्प मुल्याची दोन नाणी टाकून मार्क १२:४१-४४ मधील दरिद्री स्रीने खऱ्या भक्तीस निस्वार्थपणे पाठींबा देण्यात एक उत्तम उदाहरण पुरविले. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा wMR ८९ ११/१, पृष्ठ ३२]
९. मार्क १५:३४ मधून दिसते की येशू त्याच्या विश्वासात डगमगला व त्याला वाटले देवाने त्याला सोडून दिले. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w ८७ ६/१५, पृष्ठ ३१]
१०. कोणा व्यभिचारी सोबत्यासोबत, तो व्यभिचारी आहे हे समजल्यानंतरहि, लैंगिक समागम करण्यास परत सुरवात करणे हे जी निष्पाप व्यक्ती तिच्यावतीने क्षमेचे औदार्य आहे. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w ८१ ३/१, पृष्ठ ३०]
पुढील प्रश्नांची उत्तरे द्या:
११. ज्यावेळी जखऱ्याने भविष्यवाद देण्यास सुरवात केली त्यावेळी यरूशलेम मधील मंदिरात कसली परिस्थिती होती? [si पृष्ठ १६८, परि. १]
१२. जरी सर्व लोक पापाधीन होते, तरी कोणत्या मार्गी यहुदी लोक श्रेष्ठतेच्या हक्काचा आनंद अनुभवीत होते. [si पृष्ठ २०६, परि. ९]
१३. रोमकरांस पत्र १३:१-७नुसार, ते उच्च दर्जाचे अधिकारी कोण की ज्यांचे अधीन ख्रिश्चनांना राहणे आहे आणि खासकरून कोणत्या कारणास्तव? [si पृष्ठ २०७, परि. ६]
१४. पौलाने, करिंथकरास लिहिलेल्या आपल्या पहिल्या पत्रात कोणत्या चर्चेद्वारा हे स्पष्ट केले की कोणालाही मनुष्यपणाबद्दल गर्व बाळगता येणार नाही? [si पृष्ठ २१०, परि. ९]
१५. तो खडक कोण होता ज्यावर ख्रिस्ताने आपल्या मंडळीची उभारणी केली? [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पाहा w ८७ १२/१५, पृष्ठ ८]
१६. येशूने एका दुरात्म्याविषयी असे म्हणण्यामागील अर्थ काय होता की: “ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेहि निघत नाही?” (मार्क ९:२९) [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w ८२ ६/१, पृष्ठ ३१]
१७. मत्तय १६:४ मध्ये उल्लेखित “योनाचे चिन्ह” काय होते? [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन, पहा w ८२ ११/१, पृष्ठ ३१]
१८. मलाखी ३:१ मध्ये उल्लेखित ‘करार वाहक “निरोप्या”’ कोण आहे? [w ८७ ६/१५, पृष्ठ १२]
पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा व्याख्या पुरवा:
१९. मलाखी हा _______________ समकालीन होता. [si पृष्ठ १७२, परि. २]
२०. आम्ही यहोवाच्या मेजावरचे व _______________ खाणारे असू शकत नाही. [si पृष्ठ २१०, परि १६]
२१. जो “तरूण” येशूला अटक करून नेणाऱ्याच्या हातातून निसटून पळाला तो कदाचित _______________ असावा. (मार्क १४:५१, ५२) [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा wMR ८९ ११/१, पृष्ठ ३१]
२२. मार्कला “कुर्बान” सारख्या शब्दाचा मार्क ७:११ मध्ये अर्थ स्पष्ट करावा लागला ही गोष्ट हे स्पष्ट करते की त्याने त्याचे लिखाण मुख्यत्वेकरून _______________ वाचकांना ध्यानी ठेऊन केले असावे. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पाहा wMR ८९ ११/१, पृष्ठ ३१]
२३. _______________ होऊ नये किंवा _______________ होऊ नये म्हणून येशूने पित्तमिश्रित द्राक्षारस पिण्यास नाकारला. (मत्तय २७:३४) [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा wMR ८९ ९/१, पृष्ठ ३२]
२४. मत्तय २६:६४ मध्ये येशूने निर्भयपणे दानीएल ७:१३, १४ मधील भविष्यवाद _______________ लाविला. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा wMR ८८ ३/१, पृष्ठ १६]
पुढील विधानांतून अचूक उत्तरे निवडा:
२५. आदामापासून (अब्राहाम; मोशे; ख्रिस्त) पर्यंत मरणाने आपले राज्य चालविले. [si पृष्ठ २०६, परि १०]
२६. पौलाने त्याचे करींथकरांस लिहिलेले पहिले पत्र इ.स. ५५च्या सुमारास (रोम; मासेदोनिया; इफिस) येथून लिहिले होते. [si पृष्ठ २०९, परि. ३]
२७. जेव्हा पौलाने त्याचे दुसरे पत्र करिंथकरास लिहिले होते, (त्यावेळी मंडळीला अद्याप त्याचे पहिले पत्र मिळाले नव्हते; दोन्ही पत्रात काही महिन्यांचाच काळ गेला होता; सुमारे तीन वर्षाचा कालावधी लोटला होता.) [si पृष्ठ २१३, परि. १]
२८. दकापलीस ही नगरे (ग्रीक किंवा हेल्लेनिक संस्कृतीची; शमरोनी धर्माची; यहुदी पंथीय) होती. (मार्क ५:२०) [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा wMR ८९ ११/१, पृष्ठ ३१]
२९. (मत्तय; मार्क; लूक) या एकट्यानेच अलीशिबा ही वांझ हाती; तिजठायी गर्भधारणा झाली व तिने योहानाला जन्म दिल्याचा उल्लेख केला. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा wMR ९० १/१, पृष्ठ २८]
३०. (मत्तय २०:३०; मार्क १०:४६; लूक १८:३५) हे इतर दोन्ही अहवालांच्या विरूद्धतेत नाही. तर ते केवळ अधीक स्पष्टता पुरविते. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा wMR ८९ २/१, पृष्ठ ५)
पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:
मलाखी ३:१-१८; मत्तय २२:३०; मत्तय २३:२७, २८; मार्क ४:३८, रोम ११:१३-२४.
३१. यहोवा न्याय करण्यास त्याच्या मंदिरी येतो; लेवी पुत्रास शुद्ध करण्यास आणि दुष्टांच्या विरूद्धतेत शीघ्रतेत साक्ष देण्याची भूमिका पार पाडतो. [si पृष्ठ १७३, परि १०]
३२. जैतुनाच्या झाडाचे उदाहरण देऊन पौलाने यहुदेत्तरांस हे स्पष्ट केले की इस्राएलास धिक्कारले म्हणून त्यांना आनंद वाटू नये. [si पृष्ठ २०६, परि १४]
३३. येशू कदाचित लोडवर किंवा जहाजाच्या मागच्या बाजूच्या सीट वरील उशीवर झोपला असावा. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा wMR ८९ ११/१, पृष्ठ ३१]
३४. या उपदेशास आपल्या वागणूकीद्वारा ध्वनित केल्यास कुमार्गी लागण्यापासून व दांभिकतेपासून बचावून ठेवील. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा wMR ८९ ९/१, पृष्ठ ३२]
३५. एक ख्रिश्चन व्यक्ति, जिचा विवाहातील सोबती मेला असेल तिने तिच्या पूर्वीच्या विवाहातील सोबती पुनरूत्थीत होईल व तिला पुनरूपी त्याच नात्यांत प्राप्त होईल या आशेने सडे राहावे अशा बंधनात असल्याचे वाटून घेऊ नये. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w ८७ ६/१, पृष्ठ ३०-१]