सुवार्ता सादरता
आनंदाने
१ येशूला आपल्या सेवकपणात मोठा आनंद मिळाला. त्याला तर त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करणे हे जणू आहारासारखे होते. (योहान ४:३४) त्याचप्रमाणे, पौलाने सुद्धा आपल्या सेवाकार्यात मोठा आनंद मिळविला. या दोघांनाही बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले तसेच छळाचा अनुभवही आला, पण त्यांनी आपल्या सेवाकार्यात आनंद मिळविला यामागील गुपित काय होते? त्यांनी यहोवास सादर केलेली सेवा पूर्ण अंतःकरणाची होती. देवाने दिलेल्या आपल्या नेमणूकीत त्यांनी खूप परिश्रम घेतले व यामुळे त्यांनी आपल्या परिश्रमाचा आनंद घेतला. (योहान १३:१७; प्रकटीकरण १४:१३) तर मग, तुम्हीही यहोवाची सेवा करीत असता आपला आनंद कसा वाढवू शकाल?
लोकांना मदत देण्याच्या अर्थाने विचार करा
२ येशू ख्रिस्त व पौल चांगले शिक्षक होते. त्यांनी श्रोत्यांच्या अंतःकरणाप्रत पोहंचण्याकडे लक्ष दिले. पुष्कळांनी प्रतिसाद दिला नाही. पण ज्यांनी दिला ते त्यांच्या आनंदाचे कारण बनले. (फिलिप्पै. ४:१; पडताळा लूक १५:७.) होय, लोकांनी यहोवाविषयी शिकून घेण्यात त्यांना मदत देणे व ते सत्याकरता आपली भूमिका ग्रहण करीत आहेत हे पाहणे आनंद देते. पहिल्या शतकात ‘परराष्ट्रीय देवाकडे वळाले’ यामुळे “बांधवांना फार आनंदित केले” गेले.—प्रे. कृत्ये १५:३.
३ तुम्हाला जे माहीत आहे त्याची कुशलतेने इतरांसोबत सहभागी केल्यामुळे तुम्हालासुद्धा आनंद अनुभवता येईल. इतरांना सत्याविषयीचे शिक्षण देता यावे यासाठी यहोवाच्या संस्थेने आम्हाला मदत म्हणून बरीचशी साधने दिली आहेत. उदाहरणार्थ, आमची राज्य सेवा यामध्ये संभाषणाचा विषय दिलेला असतो. याशिवाय ज्यात पुष्कळ अपीलकारक प्रस्तावना सापडतात आणि लोक जे महत्त्वपूर्ण प्रश्न विचारतात त्यांची उत्तरे आहेत ते रिझनिंग पुस्तक देखील आहे. यास्तव, तुम्ही सेवाकार्याची तयारी करता तेव्हा तुमच्या क्षेत्रातील लोकांची मदत करण्यासाठी आमची राज्य सेवा तसेच रिझनिंग पुस्तकातील प्रस्तावांचा कसा वापर करता येईल त्या अर्थाने विचार करा. लोकांसोबत चांगल्या प्रकारच्या संभाषणाची सुरवात करण्याची उत्तम तयारी करून त्यांना सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर आणण्यासाठी झटून प्रयत्न करा. यामुळे पुष्कळ फलदायी पवित्र शास्त्र अभ्यास मिळतील आणि आमच्या सेवेत अधिक आनंद मिळेल.—याकोब १:२५.
सरळ मनोवृत्ती
४ तुम्ही प्रचारक असा की, पायनियर, आपल्या सेवेचे उद्दिष्ट ते काय हे नेहमी लक्षात ठेवा. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) सुवार्तेचा प्रचार करणे ही देवाकडील एक नेमणूक आहे. हा एक हक्क आहे आणि यहोवा आपल्या सेवकांकडून ज्याची मागणी करतो ते कठीण नाही याची जाणीव आपण राखली पाहिजे. (१ योहान ५:३) आपल्या सेवकांनी त्यांच्या सेवाकार्यात आनंद मिळवावा ही त्याची इच्छा आहे. यास्तव, जरी काहींनी प्रचार कार्य करीत असता चांगला प्रतिसाद दर्शविला नाही तरीही त्यामध्ये तुम्हाला आनंद मिळू शकतो. ते कसे काय?
५ येशूच्या शिष्यांना आपल्या सेवेत आनंद मिळाला आणि येशूने त्यांना या आनंदामागील प्रमुख कारण काय असले पाहिजे ते विवेचीत केले. (लूक १०:१७-२०) ज्यांना या पृथ्वीवर जिवंत राहण्याची आशा आहे त्या ‘मोठ्या लोकसमुदाय’ यालाही आनंद करण्याचे कारण आहे. (प्रकटी. ७:९, १०) तुमची आशा स्वर्गीय असो की, पृथ्वीवरील, तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे करीत आहात या गोष्टीमुळेच तुम्हाला मोठा आनंद वाटावयास हवा, कारण “प्रभुमध्ये तुमचे परिश्रम व्यर्थ नाहीत.” (१ करिंथ १५:५८) “तुमचे कार्य व तुम्ही देवावर दाखविलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” (इब्री ६:१०) देवावर प्रीती करणाऱ्यांना, यहोवाची पूर्ण अंतःकरणाने सेवा करणे हे आनंद मिळवून देते.—स्तोत्र ४०:८.
६ ख्रिश्चनाने देवास करीत असलेल्या सेवेचा आनंद घेतला पाहिजे. यास्तव त्याच्या सेवेत आनंद घ्या. अस्सल निष्ठेच्या लहानशा कार्याची देखील यहोवा कदर करतो याची खात्री असू द्या. (पडताळा मार्क १२:४१-४४.) आपण आपल्या ‘सेवेचे गौरव करू या’ आणि त्यामुळे मिळणारा आनंद प्राप्त करू या.—रोमकर ११:१३.