“त्याला तुमची काळजी आहे”
जीवनात इतरांनी जरी तुम्हाला निराश केलं असलं, तरी एक अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला कधीच निराश करणार नाही. कोण आहे ती व्यक्ती?
प्राचीन काळातल्या दावीद राजाने म्हटलं: “माझ्या आईबापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करेल.”—स्तोत्र २७:१०.
यहोवा देव हा “अतिशय करुणामय असा पिता आहे, आणि सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे . . . तो आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपले सांत्वन करतो.”—२ करिंथकर १:३, ४.
“आपल्या सर्व चिंता त्याच्यावर टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.”—१ पेत्र ५:७.
देव तुमची कशा प्रकारे काळजी घेतो हे जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेलं कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकाचा धडा ०८ पाहा. हे पुस्तक www.jw.org/mr या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहे.