अनुक्रमणिका
१५ ऑक्टोबर २०१३
© २०१३ Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania.
अभ्यास आवृत्ती
२-८ डिसेंबर, २०१३
सृष्टी देवाच्या अस्तित्वाची साक्ष देते
पृष्ठ ७ • गीत क्रमांक: १, १५
९-१५ डिसेंबर, २०१३
“यहोवाचे दास बनून त्याची सेवा करा”
पृष्ठ १२ • गीत क्रमांक:३१, २५
१६-२२ डिसेंबर, २०१३
एका अर्थभरीत प्रार्थनेतून शिकण्यासारखे धडे
पृष्ठ २१ • गीत क्रमांक: ३८, ६
२३-२९ डिसेंबर, २०१३
येशूने केलेल्या हृदयस्पर्शी प्रार्थनेच्या अनुषंगाने कार्य करा
पृष्ठ २६ • गीत क्रमांक: २२, ६
अभ्यास लेख
▪ सृष्टी देवाच्या अस्तित्वाची साक्ष देते
एका अदृश्य देवाने या दृश्य विश्वाची निर्मिती केली. तुमचा यावर पूर्ण विश्वास आहे का? बरेच लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. आपण सृष्टिकर्त्याबद्दलचे सत्य जाणून घेण्यास लोकांना मदत कशी करू शकतो आणि त्याच्यावरील आपला विश्वास दृढ कसा करू शकतो? या प्रश्नांची उत्तरे या लेखात तुम्हाला मिळतील.
▪ “यहोवाचे दास बनून त्याची सेवा करा”
ख्रिश्चनांना यहोवाचे दास बनून त्याची सेवा करण्याचे प्रोत्साहन देण्यात आले आहे. मोशेच्या नियमशास्त्रात दासांसाठी कोणती तरतूद करण्यात आली होती, आपण सैतानाचे आणि त्याच्या जगातील गोष्टींचे गुलाम बनण्याचे कसे टाळू शकतो, आणि देवाचे दास बनून विश्वासूपणे त्याची सेवा केल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात याविषयी आपण या लेखात शिकू.
▪ एका अर्थभरीत प्रार्थनेतून शिकण्यासारखे धडे
▪ येशूने केलेल्या हृदयस्पर्शी प्रार्थनेच्या अनुषंगाने कार्य करा
दररोज देवाच्या वचनावर मनन केल्यास आपल्या प्रार्थना आणखी अर्थभरीत होतील. प्राचीन काळात लेव्यांनी देवाच्या लोकांच्या वतीने केलेल्या एका प्रार्थनेवरून हे कसे दिसून येते याविषयी पहिल्या लेखात सांगण्यात आले आहे. येशूने केलेल्या एका प्रार्थनेच्या अनुषंगाने आपण कसे कार्य करू शकतो हे दुसऱ्या लेखात सांगण्यात आले आहे. आपल्या वैयक्तिक इच्छांऐवजी आपण यहोवाच्या इच्छेला कशा प्रकारे प्राधान्य देऊ शकतो हे या दोन्ही प्रार्थनांवरून दिसून येते.
याच अंकात
३ त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—फिलिपीन्झमध्ये
१७ यहोवावर विसंबून राहिल्यानं मिळणारे आशीर्वाद
३१ इतरांना सावध करण्यासाठी तुम्ही आणखी जास्त प्रयत्न कराल का?
मुखपृष्ठ: आतीत्लान सरोवराजवळ असलेल्या पानायाशेल नावाच्या गावात प्रचार करताना एक प्रचारक. ग्वाटेमालातील यहोवाचे साक्षीदार स्पॅनिश भाषेसोबतच ११ स्थानिक भाषांत प्रचार करतात
ग्वाटेमाला
लोकसंख्या:
१,५१,६९,०००
प्रचारक:
३४,६९३
बायबल अभ्यास:
४७,६०६