वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 ७/१ पृ. १५
  • बायबल प्रश्‍नांची उत्तरे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबल प्रश्‍नांची उत्तरे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • मिळती जुळती माहिती
  • खरी शांती—कोणत्या उगमाकडून?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • मानवाला शांतीकडे कोण नेऊ शकेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • “देवाची शांती” तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • लोक एकमेकांसोबत शांतीने का राहू शकत नाहीत?​—⁠बायबल काय म्हणतं?
    आणखी विषय
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 ७/१ पृ. १५

बायबल प्रश्‍नांची उत्तरे

जगात शांती आणणे इतके कठीण का आहे?

जे सरकार मानवांच्या हृदयाचे परिवर्तन करू शकते तेच या पृथ्वीवर शांती आणू शकते

बायबलमध्ये यामागची दोन कारणे सांगण्यात आली आहेत. पहिले, खरेतर मानवांनी आत्तापर्यंत खूप काही साध्य केले आहे तरी त्यांच्यात स्वतःचे मार्गदर्शन करण्याची कुवत नाही. दुसरे, मानवांच्या सर्व उपाययोजना फोल ठरल्या आहेत कारण “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे” म्हणजे सैतानाच्या मुठीत आहे. म्हणून, जगात शांती आणण्यासाठी मानव करत असलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत!—यिर्मया १०:२३; १ योहान ५:१९ वाचा.

जगात शांती येण्यासाठी मानवांचा स्वार्थ आणि महत्त्वाकांक्षीपणासुद्धा आडवा येतो. जे सरकार लोकांना योग्य गोष्टींवर प्रेम करण्यास आणि एकमेकांची काळजी निःस्वार्थपणे घेण्यास शिकवेल तेच सरकार जगात शांती निर्माण करू शकते.—यशया ३२:१७; ४८:१८, २२ वाचा.

जगात शांती कोण आणेल?

सर्व मानवजातीवर फक्‍त एकच सरकार राज्य करेल असे आश्‍वासन सर्वशक्‍तिमान यहोवा देव आपल्याला देतो. इतर सर्व मानवी सरकारांऐवजी हे सरकार राज्य करेल. (दानीएल २:४४) देवाचा पुत्र, येशू शांतीचा राजा या नात्याने पृथ्वीवरील सर्व दुष्टाईचा मुळासकट नाश करेल आणि लोकांना शांतीचा मार्ग शिकवेल.—यशया ९:६, ७; ११:४, ९ वाचा.

जगातील हजारो लोकांनी तर, येशूच्या मार्गदर्शनाखाली राहून देवाचे वचन बायबल यातून एकमेकांबरोबर शांतीने कसे वागायचे हे इतरांना शिकवायला केव्हाच सुरुवात केली आहे. लवकरच, जगात शांती येणार आहे.—यशया २:३, ४; ५४:१३ वाचा. (w१३-E ०६/०१)

जास्त माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील अध्याय ३ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा