वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w12 ४/१ पृ. ३
  • शिक्षा देतो आहे का देव आपल्याला?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शिक्षा देतो आहे का देव आपल्याला?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • का येताहेत इतक्या नैसर्गिक विपत्ती?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • लोकांना शिक्षा देण्यासाठी देव नैसर्गिक संकटांचा वापर करतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • महाकठीण प्रश्‍न
    सावध राहा!—२००७
  • नैसर्गिक आपत्तींचा घाला पडतो तेव्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
w12 ४/१ पृ. ३

शिक्षा देतो आहे का देव आपल्याला?

जपान येथे मार्च २०११ मध्ये ९.० तीव्रतेचा भूकंप आल्यानंतर तेथील एका सुविख्यात राजकीय पुढाऱ्‍याने म्हटले, “या विपत्तीला बळी पडलेल्यांबद्दल मला सहानुभूती आहे, पण माझ्या मते हा तेम्बात्सू (दैवी प्रकोप) होता.”

जानेवारी २०१० मध्ये हैटी देशाला भूकंपाचा तडाखा बसून २,२०,००० जण मृत्युमुखी पडले तेव्हा टीव्हीवर उपदेश करणाऱ्‍या एका सुप्रसिद्ध धर्मप्रचारकाने असा दावा केला की लोकांनी देवाकडे परत फिरण्याची गरज आहे कारण लोक देवाला विसरले असल्यामुळेच ही दुर्घटना घडली.

फिलिपीन्झमधील मनिला शहरात झालेल्या चेंगराचेंगरीत ७९ लोकांचा जीव गेला तेव्हा एका कॅथलिक पाळकाने म्हटले की “आपली कोडगी व मृतवत झालेली विवेकबुद्धी जागी करण्यासाठीच देव” अशा घटना घडवून आणतो. तेथील एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार “२१ टक्के प्रौढ असे मानतात की देवाचा कोप भडकला असल्यामुळेच दरडी कोसळणे, वादळे व इतर विपत्ती” या देशात वारंवार येत आहेत.

देव लोकांना शिक्षा देण्यासाठी विपत्ती आणतो ही धारणा काही नवीन नाही. १७५५ साली पोर्तुगालच्या लिस्बन शहरात भूकंप झाला. तसेच तेथे आग लागली व त्सुनामीदेखील आली. या दुर्घटनांमुळे जवळजवळ ६०,००० लोक दगावले. त्या वेळी व्हॉल्टेयर नावाच्या एका विख्यात तत्त्ववेत्त्याने असा प्रश्‍न केला: “या आपत्तींना बळी पडलेल्या लिस्बन शहरात, इष्कबाजी व चैनबाजीकरता ओळखल्या जाणाऱ्‍या पॅरिसपेक्षाही जास्त पाप आढळले की काय?” खरोखर, नैसर्गिक संकटे आणून देव लोकांना शिक्षा देत असावा का? असा लक्षावधी लोकांना प्रश्‍न पडतो. बऱ्‍याच देशांत तर अशा संकटांना देवाची करणी म्हटले जाते.

हे सर्व लक्षात घेता, आपण पुढील प्रश्‍न विचारले पाहिजेत: देव खरोखरच नैसर्गिक आपत्ती आणून लोकांना शिक्षा देत आहे का? अलीकडे, एकापाठोपाठ एक येत असलेल्या अनर्थकारक घटना देवाचा कोप भडकल्यामुळे घडत आहेत का?

देवाला जबाबदार धरू पाहणारे लोक सहसा बायबलमधील अशा वृत्तान्तांचे दाखले देतात ज्यांत देवाने नैसर्गिक तत्त्वांच्या साहाय्याने विनाश घडवून आणल्याचे सांगण्यात आले आहे. (उत्पत्ती ७:१७-२२; १८:२०; १९:२४, २५; गणना १६:३१-३५) पण, या बायबल वृत्तान्तांचे परीक्षण केल्यास, यांपैकी प्रत्येक घटनेत तीन मुख्य वैशिष्ट्ये असल्याचे दिसून येते. पहिले वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळी संकट येण्याअगोदर त्याविषयी पूर्वसूचना देण्यात आली होती. दुसरे, आजकालच्या नैसर्गिक दुर्घटनांमध्ये चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारच्या लोकांचा जीव जातो, पण देवाकडून आलेल्या विनाशात सरसकट सर्वांचा नाश झाला नाही. तर, फक्‍त वाईट मार्गांत निर्ढावलेल्या दुष्टजनांचा आणि ज्यांनी धोक्याच्या सूचनेकडे लक्ष दिले नाही त्यांचाच केवळ नाश झाला. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळी देवाने निर्दोष लोकांच्या बचावाची तरतूद केली.—उत्पत्ती ७:१, २३; १९:१५-१७; गणना १६:२३-२७.

आज लाखो लोकांचे जीवन उद्‌ध्वस्त करणाऱ्‍या असंख्य दुर्घटनांकडे पाहिल्यास, त्यांमागे देवाचा हात असल्याचा कोणताही पुरावा दिसून येत नाही. पण मग, अशा दुर्घटना इतक्या का वाढल्या आहेत? आपण त्यांना तोंड कसे देऊ शकतो? आणि अशी संकटे येणार नाहीत असा काळ कधी आपण पाहू का? या प्रश्‍नांची उत्तरे पुढील लेखांत पाहू या. (w११-E १२/०१)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा