वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w10 ९/१५ पृ. १२-१६
  • एकता—खऱ्‍या उपासनेची ओळख

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एकता—खऱ्‍या उपासनेची ओळख
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खरी उपासना लोकांमध्ये एकता कशी निर्माण करते?
  • आध्यात्मिक मार्गदर्शनाचा एकमात्र स्रोत
  • गर्विष्ठपणा व ईर्ष्या यांच्यावर मात करणे
  • ख्रिस्ती धर्मजगतात सर्वत्र फुटी
  • खरी उपासना राष्ट्रवादापेक्षा श्रेष्ठ
  • यहोवाचे कुटुंब मौल्यवान ऐक्याचा आनंद लुटते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • खऱ्‍या ख्रिश्‍चनांमधील ऐक्यामुळे देवाचा गौरव होतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • खरे ख्रिस्ती ऐक्य—कसे?
    आमची राज्य सेवा—२००३
  • या शेवटल्या दिवसांमध्ये ऐक्य टिकवून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
w10 ९/१५ पृ. १२-१६

एकता—खऱ्‍या उपासनेची ओळख

“मी त्यांस बस्राच्या [“मेंढवाड्यातील,” NW] मेंढरांप्रमाणे एकत्र करीन.”—मीखा २:१२.

१. सृष्टीतून देवाची बुद्धी कशा प्रकारे दिसून येते?

एका सतोत्रकर्त्याने असे म्हटले: “हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे.” (स्तो. १०४:२४) पृथ्वीवरील अद्‌भुत व जटील जीवसृष्टीत पाहायला मिळणारी लाखो निरनिराळ्या प्रकारची झाडेझुडपे, कीटक, प्राणी आणि सूक्ष्मजंतू हे एकमेकांवर अवलंबून असतात. तसेच, तुमच्या शरीरातील मोठ्या अवयवांपासून पेशींतील अतिसूक्ष्म रेणूंपर्यंत हजारो निरनिराळ्या यंत्रणा एकत्र कार्य करतात, ज्यामुळे तुम्ही एक पूर्ण व सुदृढ व्यक्‍ती बनता. या सर्वातून देवाची बुद्धी स्पष्टपणे दिसून येते.

२. पृष्ठ १३ वर दाखवल्याप्रमाणे, ख्रिस्ती मंडळीत असलेली एकता जणू एक चमत्कारच आहे असे पाहणाऱ्‍यांना का वाटले असावे?

२ यहोवाने मानवांना एकमेकांवर अवलंबून राहण्यासाठी बनवले. मानवांमध्ये निरनिराळे रंगरूप, व्यक्‍तिमत्त्व आणि कौशल्ये पाहायला मिळतात. शिवाय, देवाने पहिल्या मानवांना आपल्या स्वतःच्या गुणवैशिष्ट्यांसोबत बनवले असल्यामुळे त्यांना एकमेकांशी सहकार्य करणे आणि एकमेकांवर अवलंबून राहणे शक्य होते. (उत्प. १:२७; २:१८) तरीसुद्धा, आज मानवजात देवापासून दुरावली आहे आणि त्यामुळे जगात आजपर्यंत कधीही ऐक्य पाहायला मिळालेले नाही. (१ योहा. ५:१९) म्हणूनच, पहिल्या शतकात इफिससचे गुलाम, कुलीन ग्रीक स्त्रिया, सुशिक्षित यहुदी पुरुष आणि पूर्वी मूर्तिपूजा करणारे असे विविध पार्श्‍वभूमीचे लोक ख्रिस्ती मंडळीचे भाग बनले, तेव्हा त्यांच्यातील एकता, जणू एक चमत्कारच आहे असे पाहणाऱ्‍यांना वाटले असावे.—प्रे. कृत्ये १३:१; १७:४; १ थेस्सलनी. १:१०; १ तीम. ६:१.

३. बायबल खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये असलेल्या ऐक्याचे वर्णन कशा प्रकारे करते आणि या लेखात आपण कोणत्या गोष्टींची चर्चा करणार आहोत?

३ खरी उपासना, लोकांना एकमेकांशी शरीरातील अवयवांप्रमाणे सहकार्य करण्यास मदत करते. (१ करिंथकर १२:१२, १३ वाचा.) याच्या काही पैलूंची या लेखात चर्चा केली जाईल, जसे की: खरी उपासना कशा प्रकारे लोकांमध्ये एकी निर्माण करते? सर्व राष्ट्रांतील लाखो लोकांना एकत्र आणण्यास केवळ यहोवाच का समर्थ आहे? एकतेला अडथळा निर्माण करणाऱ्‍या कोणत्या गोष्टींवर मात करण्यास यहोवा आपल्याला मदत करतो? आणि ऐक्याच्या बाबतीत, खरा ख्रिस्ती धर्म कशा प्रकारे ख्रिस्ती धर्मजगतापासून वेगळा आहे?

खरी उपासना लोकांमध्ये एकता कशी निर्माण करते?

४. खरी उपासना कशा प्रकारे लोकांमध्ये एकता निर्माण करते?

४ यहोवाने सर्व काही निर्माण केले असल्यामुळे, या विश्‍वावर आधिपत्य चालवण्यास केवळ त्यालाच अधिकार आहे याची देवाच्या खऱ्‍या उपासकांना जाणीव आहे. (प्रकटी. ४:११) म्हणून, खरे ख्रिस्ती अनेक समाजांतून आलेले असले आणि त्यांची परिस्थिती वेगवेगळी असली, तरी ते सर्व देवाने घालून दिलेल्या समान नियमांचे पालन करतात आणि बायबलमधील समान तत्त्वांनुसार जीवन जगतात. त्यामुळे, सर्व खरे उपासक उचितपणे यहोवाला ‘पिता’ म्हणू शकतात. (यश. ६४:८; मत्त. ६:९) त्याअर्थी, ते सर्व जण आध्यात्मिक बंधुभगिनी आहेत आणि स्तोत्रकर्त्याने वर्णन केलेल्या अद्‌भुत ऐक्याचा ते आनंद अनुभवू शकतात: “पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!”—स्तो. १३३:१.

५. कोणता गुण खऱ्‍या उपासकांमधील ऐक्याला हातभार लावतो?

५ खरे ख्रिस्ती अपरिपूर्ण असले, तरी ते ऐक्याने उपासना करतात, कारण ते एकमेकांप्रती प्रेम दाखवण्यास शिकले आहेत. अशा प्रकारे प्रेम दाखवण्यास त्यांना केवळ यहोवाच शिकवू शकतो. (१ योहान ४:७, ८ वाचा.) त्याचे वचन म्हणते: “करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्‍या सर्वांवर धारण करा.” (कलस्सै. ३:१२-१४) पूर्णता करणाऱ्‍या या बंधनामुळे म्हणजे प्रेमामुळे खऱ्‍या ख्रिश्‍चनांना प्रामुख्याने ओळखले जाते. त्यांच्यातील हे ऐक्य खऱ्‍या उपासनेचे खास वैशिष्ट्य असल्याचे तुम्ही आपल्या स्वतःच्या अनुभवावरून पाहिले नाही का?—योहा. १३:३५.

६. देवाच्या राज्याच्या आशेमुळे कशा प्रकारे आपल्याला ऐक्य अनुभवण्यास मिळते?

६ खऱ्‍या उपासकांमध्ये ऐक्य असण्याचे आणखी एक कारण म्हणजे देवाचे राज्य हेच मानवजातीच्या सर्व समस्यांवर एकमेव उपाय असल्याचे ते मानतात. त्यांना माहीत आहे की देवाचे राज्य लवकरच सर्व मानव सरकारांना नाहीसे करेल आणि आज्ञाधारक लोकांसाठी खरी व कायमची शांती आणेल. (यश. ११:४-९; दानी. २:४४) त्यामुळे, येशूने आपल्या अनुयायांबद्दल जे म्हटले होते त्याचे ते पालन करतात: “जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.” (योहा. १७:१६) खरे ख्रिस्ती जगाच्या संघर्षांत भाग घेत नाहीत; ते तटस्थ राहतात. म्हणून, त्यांच्या सभोवतालचे लोक युद्धात गुंतलेले असले, तरी खरे ख्रिस्ती ऐक्याचा आनंद घेतात.

आध्यात्मिक मार्गदर्शनाचा एकमात्र स्रोत

७, ८. बायबलमधील मार्गदर्शन कशा प्रकारे आपल्या ऐक्याला हातभार लावते?

७ पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना एकाच उगमापासून प्रोत्साहन मिळत असल्यामुळे त्यांच्यात ऐक्य होते. जेरूसलेममधील प्रेषित व वडील यांनी मिळून बनलेल्या नियमन मंडळाद्वारे येशू मंडळ्यांना शिकवत आहे व मार्गदर्शन देत आहे याची त्यांना जाणीव होती. हे समर्पित पुरुष देवाच्या वचनाच्या आधारावर निर्णय घ्यायचे आणि इतर अनेक ठिकाणी असलेल्या मंडळ्यांना प्रवासी पर्यवेक्षकांद्वारे मार्गदर्शन द्यायचे. अशा काही पर्यवेक्षकांबद्दल बायबल म्हणते: “त्यांनी नगरांमधून जाता जाता यरुशलेमेतील प्रेषित व वडील ह्‍यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळावयास नेमून दिले.”—प्रे. कृत्ये १५:६, १९-२२; १६:४.

८ त्याचप्रमाणे आजही, आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या ख्रिश्‍चनांनी मिळून बनलेले एक नियमन मंडळ जगव्याप्त मंडळीच्या ऐक्याला हातभार लावते. हे नियमन मंडळ आध्यात्मिक रीत्या प्रोत्साहनदायक असलेले साहित्य अनेक भाषांत प्रकाशित करते. हे आध्यात्मिक अन्‍न देवाच्या वचनावर आधारलेले असते. त्याअर्थी, जे काही शिकवले जाते ते मनुष्यांचे नव्हे, तर यहोवाचे असते.—यश. ५४:१३.

९. देवाकडून मिळालेल्या कार्यामुळे आपल्याला ऐक्याने राहणे कसे शक्य होते?

९ ख्रिस्ती पर्यवेक्षकदेखील प्रचार कार्यात पुढाकार घेण्याद्वारे खऱ्‍या उपासकांमधील ऐक्याला हातभार लावतात. देवाच्या सेवेत एकजुटीने कार्य करणाऱ्‍या लोकांमधील नातेसंबंध, चारचौघांत ऊठबस करणाऱ्‍या जगातील लोकांच्या नातेसंबंधांपेक्षा कितीतरी पटीने मजबूत आहेत. ख्रिस्ती मंडळीची स्थापना, एका सामाजिक क्लबप्रमाणे कार्य करण्यासाठी नव्हे, तर यहोवाचे गौरव करण्यासाठी आणि एक महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी करण्यात आली होती. ते कार्य म्हणजे सुवार्तेचा प्रचार करणे, शिष्य बनवणे आणि मंडळीला बळकट करणे. (रोम. १:११, १२; १ थेस्सलनी. ५:११; इब्री १०:२४, २५) म्हणूनच, प्रेषित पौल ख्रिश्‍चनांना असे म्हणू शकला: “तुम्ही एकजिवाने सुवार्तेच्या विश्‍वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता.”—फिलिप्पै. १:२७.

१०. देवाचे लोक या नात्याने कोणत्या कारणांमुळे आपल्यात ऐक्य आहे?

१० तर मग, यहोवाचे लोक या नात्याने आपल्यामध्ये एकता आहे, कारण आपण त्याचे सार्वभौमत्व स्वीकारतो, आपल्या बंधुभगिनींवर प्रेम करतो, देवाच्या राज्यावर आशा ठेवतो आणि पुढाकार घेणाऱ्‍यांचा आदर करतो. अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्यात अशा काही प्रवृत्ती असतात ज्या आपल्यातील ऐक्याला धोका निर्माण करू शकतात. अशा प्रवृत्तींवर मात करण्यास यहोवा आपल्याला मदत करतो.—रोम. १२:२.

गर्विष्ठपणा व ईर्ष्या यांच्यावर मात करणे

११. गर्विष्ठपणा कशा प्रकारे लोकांमध्ये फूट पाडतो, आणि गर्विष्ठपणावर मात करण्यास यहोवा आपल्याला कशा प्रकारे मदत करतो?

११ गर्विष्ठपणा लोकांमध्ये फूट पाडतो. गर्विष्ठ व्यक्‍ती स्वतःला खूप श्रेष्ठ समजते आणि फुशारकी मारल्याने तिला एक प्रकारचे सुख मिळते. पण, सहसा हीच गोष्ट ऐक्याच्या मार्गात अडथळा बनते. जे अशा प्रकारची फुशारकी ऐकतात त्यांच्या मनात ईर्ष्येची भावना उत्पन्‍न होऊ शकते. शिष्य याकोबाने स्पष्टपणे सांगितले: “अशी सर्व प्रकारची फुशारकी वाईट आहे.” (याको. ४:१६) दुसऱ्‍यांना आपल्यापेक्षा कमी लेखणे हे प्रेमळपणाचे लक्षण नाही. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, यहोवा नम्रतेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे, कारण आपल्यासारख्या अपरिपूर्ण मानवांशी तो नम्रतेने वागतो. दाविदाने लिहिले: “तुझ्या [देवाच्या] लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.” (२ शमु. २२:३६) देवाचे वचन आपल्याला योग्यपणे तर्क करण्यास शिकवते आणि याद्वारे गर्विष्ठपणावर मात करण्यास आपल्याला मदत करते. देवाच्या प्रेरणेने पौलाने असे विचारले: “तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?”—१ करिंथ. ४:७.

१२, १३. (क) आपल्या मनात इतरांबद्दल सहजासहजी ईर्ष्या निर्माण का होऊ शकते? (ख) इतरांबद्दल यहोवाचा दृष्टिकोन बाळगल्याने कोणते परिणाम मिळतात?

१२ ऐक्याला अडथळा निर्माण करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ईर्ष्या. वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे, आपल्याला स्वाभाविकपणे इतरांबद्दल “ईर्ष्या वाटते.” देवाची खूप वर्षांपासून सेवा करत असलेल्या ख्रिश्‍चनांनादेखील काही वेळा इतरांच्या परिस्थितीची, धनसंपत्तीची, विशेषाधिकारांची किंवा क्षमतांची ईर्ष्या वाटू शकते. (याको. ४:५) उदाहरणार्थ, बायकोमुले असलेल्या एखाद्या बांधवाला कदाचित पूर्ण वेळची सेवा करणाऱ्‍या बांधवाजवळ असलेल्या विशेषाधिकारांचा हेवा वाटू शकतो. पण, त्याच वेळी त्या बांधवालाही आपल्या परिस्थितीचा थोडाफार हेवा वाटत असावा या गोष्टीची त्याला जाणीव नसेल. अशा प्रकारच्या ईर्ष्येमुळे आपल्यातील ऐक्याला तडा जाऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे?

१३ बायबल आपल्याला ईर्ष्या टाळण्यास मदत करते. तुम्हाला आठवत असेल की बायबलमध्ये ख्रिस्ती मंडळीतील अभिषिक्‍त सदस्यांची तुलना मानवी शरीराच्या विविध अवयवांशी करण्यात आली आहे. (१ करिंथकर १२:१४-१८ वाचा.) उदाहरणार्थ, तुमच्या हृदयाच्या तुलनेत तुमचे डोळे ठळकपणे दिसणारे असले, तरी हे दोन्ही अवयव महत्त्वाचे नाहीत का? त्याचप्रमाणे, मंडळीतील काही जण काही काळ इतरांच्या तुलनेत सगळ्यांच्या नजरेत येत असले, तरी मंडळीतील सर्वच सदस्य यहोवाच्या नजरेत अनमोल आहेत. तेव्हा, आपल्या बांधवांबद्दल आपण यहोवाचा दृष्टिकोन बाळगू या. इतरांबद्दल ईर्ष्या बाळगण्याऐवजी, आपण त्यांच्याबद्दल कळकळ व वैयक्‍तिक आस्था दाखवू शकतो. असे करण्याद्वारे, खरे ख्रिस्ती व ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चचे सदस्य यांच्यामध्ये किती फरक आहे हे आपण दाखवून देतो.

ख्रिस्ती धर्मजगतात सर्वत्र फुटी

१४, १५. ख्रिस्ती धर्मजगत कशा प्रकारे विभाजित झाले?

१४ खऱ्‍या ख्रिश्‍चनांमधील ऐक्य आणि ख्रिस्ती धर्मजगतातील चर्चेसमधील भांडणतंटे यांच्यात कमालीची तफावत आहे. चौथे शतक उजाडेपर्यंत ख्रिस्ती धर्मातील धर्मत्याग इतका पसरला होता की रोमच्या एका मूर्तिपूजक सम्राटाने त्यावर ताबा मिळवला आणि यामुळे धर्मत्यागाला आणखी खतपाणी मिळाले. नंतर, त्यात फुटी पडत जाऊन अनेक राज्य रोमपासून वेगळे झाले आणि त्यांनी स्वतःच्या राष्ट्रीय चर्चेसची स्थापना केली.

१५ यांपैकी अनेक राज्यांनी कित्येक शतके एकमेकांशी युद्ध केले. १७ व्या आणि १८ व्या शतकांदरम्यान ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेतील लोकांनी राष्ट्रभक्‍तीला प्रोत्साहन दिले, ज्यामुळे राष्ट्रवाद त्यांच्याकरता एका धर्मासारखाच बनला. १९ व्या आणि २० व्या शतकांदरम्यान, राष्ट्रवाद अनेकांच्या विचारसरणीवर जबरदस्त प्रभाव पाडू लागला. कालांतराने, ख्रिस्ती धर्मात अनेक पंथ उदयास आले आणि यांपैकी अनेक पंथांमध्ये आज राष्ट्रवादाला खपवून घेतले जाते. इतकेच काय, तर चर्चला जाणाऱ्‍या या पंथांतील लोकांनी इतर देशांतील आपल्याच पंथातील लोकांविरुद्ध युद्ध केले. आज ख्रिस्ती धर्मजगत निरनिराळ्या पंथांमुळे व राष्ट्रवादामुळे विभाजित झाले आहे.

१६. कोणत्या काही प्रश्‍नांवरून ख्रिस्ती धर्मजगत विभाजित आहे?

१६ विसाव्या शतकात, ख्रिस्ती धर्मजगतातील शेकडो पंथांपैकी काही पंथांनी ख्रिस्ती धर्मजगतात ऐक्य निर्माण करण्यासाठी जगव्याप्त पातळीवर एक चळवळ सुरू केली. पण, अनेक दशके प्रयत्न करूनही, फार कमी चर्चेस एकत्र आले आहेत. तसेच उत्क्रांतिवाद, गर्भपात, समलैंगिकता आणि स्त्रियांना पाळक म्हणून नियुक्‍त करणे यांसारख्या प्रश्‍नांवर आजही चर्चला जाणाऱ्‍यांमध्ये एकमत नाही. पूर्वी ज्या शिकवणींमुळे चर्च विभाजित झाले होते, त्या शिकवणींचे महत्त्व कमी करून, ख्रिस्ती धर्मजगतातील काही धर्मगुरू वेगवेगळ्या पंथांतील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात. पण, असे केल्याने लोकांचा विश्‍वास कमकुवत होतो आणि विभाजित झालेल्या ख्रिस्ती धर्मजगतात निश्‍चितच एकी निर्माण होत नाही.

खरी उपासना राष्ट्रवादापेक्षा श्रेष्ठ

१७. खरी उपासना “शेवटल्या दिवसांत” लोकांमध्ये ऐक्य निर्माण करेल याबद्दल काय पूर्वभाकीत करण्यात आले होते?

१७ आज मानवजात पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने भयंकरपणे विभाजित असली, तरी खरे उपासक त्यांच्यातील ऐक्यामुळे इतरांपेक्षा वेगळे आहेत. देवाचा संदेष्टा असलेल्या मीखा याने असे पूर्वभाकीत केले: “मी त्यांस मेंढवाड्यातील मेंढरांप्रमाणे एकत्र करीन.” (मीखा २:१२) खरी उपासना इतर कोणत्याही प्रकारच्या उपासनेपेक्षा, मग ती खोट्या दैवतांची उपासना असो किंवा राष्ट्रभक्‍ती असो, श्रेष्ठ ठरेल असे मीखाने पूर्वभाकीत केले होते. त्याने लिहिले: “शेवटल्या दिवसांत असे होईल की, परमेश्‍वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरांहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील. सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही परमेश्‍वर आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.”—मीखा ४:१, ५.

१८. खऱ्‍या उपासनेने आपल्याला कोणते बदल करण्यास मदत केली आहे?

१८ पूर्वी एकमेकांचे शत्रू असलेल्या लोकांमध्ये खऱ्‍या उपासनेमुळे कशा प्रकारे ऐक्य निर्माण होईल याबद्दलही मीखाने वर्णन केले होते. “देशोदेशीच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, ‘चला, आपण परमेश्‍वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.’ . . . तेव्हा ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” (मीखा ४:२, ३) यहोवाची उपासना करण्यासाठी जे लोक मानवनिर्मित दैवतांची किंवा राष्ट्रांची उपासना करण्याचे सोडून देतात ते जगव्याप्त ऐक्य अनुभवतात. अशांना देव प्रेमाचे मार्ग शिकवतो.

१९. आज लाखो लोकांना खऱ्‍या उपासनेत एकत्र केले जात आहे हा कशाचा स्पष्ट पुरावा आहे?

१९ आज जगभरातील खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये असलेले ऐक्य अनोखे आहे. आजही यहोवा आपल्या आत्म्याद्वारे आपल्या लोकांना मार्गदर्शित करत आहे याचा हा स्पष्ट पुरावा आहे. मानव इतिहासात पूर्वी कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व राष्ट्रांतील व्यक्‍तींना एकत्र केले जात आहे. हे प्रकटीकरण ७:९, १४ यात जे सूचित करण्यात आले आहे त्याचीच उल्लेखनीय पूर्तता आहे. आणि यावरून दिसून येते की लवकरच देवदूत अडवून धरलेले “वारे” सोडतील ज्यामुळे या दुष्ट जगाचा नाश होईल. (प्रकटीकरण ७:१-४, ९, १०, १४ वाचा.) तर मग, जगभरातील बंधुसमाजात एकत्र येणे हा किती मोठा बहुमान आहे! आपल्यापैकी प्रत्येक जण या ऐक्याला कशा प्रकारे हातभार लावू शकतो? याची चर्चा पुढील लेखात करण्यात येईल.

तुमचे उत्तर काय असेल?

• खरी उपासना कशा प्रकारे लोकांमध्ये ऐक्य निर्माण करते?

• ईर्ष्येमुळे आपल्यातील ऐक्याला तडा जाऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे?

• राष्ट्रवाद खऱ्‍या उपासकांमध्ये फूट का पाडू शकत नाही?

[१३ पानांवरील चित्र]

पहिल्या शतकातील ख्रिस्ती निरनिराळ्या पार्श्‍वभूमीचे होते

[१५ पानांवरील चित्रे]

राज्य सभागृह प्रकल्पांत सहभाग घेतल्याने ऐक्याला कसा हातभार लागतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा