वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 ८/१५ पृ. ३०-३२
  • मिशनरी कशा प्रकारे टोळांसारखे आहेत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मिशनरी कशा प्रकारे टोळांसारखे आहेत?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • स्वेच्छेने लोक गिलियडला येतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यशस्वी विद्यार्थी, यशस्वी मिशनरी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • सेवा करण्याची प्रेरणा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • गिलियड प्रशाला आपला १०० वा वर्ग पाठवते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 ८/१५ पृ. ३०-३२

१२४ वा गिलियड पदवीदान समारंभ

मिशनरी कशा प्रकारे टोळांसारखे आहेत?

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा दर सहा महिन्यांनी पदवीदान समारंभ होतो. संयुक्‍त संस्थानांतील बेथेल कुटुंबाच्या सर्व सदस्यांना या समारंभाला आमंत्रित केले जाते. ८ मार्च २००८ रोजी गिलियड प्रशालेचा १२४ वा पदवीदान समारंभ संपन्‍न झाला. यंदा, ३० पेक्षा जास्त देशांतील पाहुणे बेथेल कुटुंबातील सदस्यांसोबत या कार्यक्रमात सामील झाले. कार्यक्रमाला आलेले एकूण ६,४११ जण गिलियड विद्यार्थ्यांच्या जीवनातील या अतिशय महत्त्वाच्या दिवशी त्यांच्या आनंदात सहभागी झाले.

नियमन मंडळाचे स्टीवन लेट्‌ हे सभाध्यक्ष होते. त्यांनी “यहोवाच्या लाक्षणिक टोळधाडीसोबत पुढे चला” या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात केली. काही काळ अक्रियाशील राहिल्यावर १९१९ साली पुन्हा एकदा सक्रिय झालेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍नांच्या छोट्याशा गटाची तुलना प्रकटीकरण ९:१-४ यात, झुंडीने येणाऱ्‍या टोळांच्या धाडीशी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आठवण करून देण्यात आली की ‘दुसऱ्‍या मेंढरांतील’ सदस्य या नात्याने तेसुद्धा या लाक्षणिक टोळधाडीत सामील झाले आहेत.—योहा. १०:१६.

यानंतर, संयुक्‍त संस्थानांतील शाखा समितीचे सदस्य लॉन शिलिंग यांचे, “परस्परपूरक असा” या विषयावर भाषण झाले. हे भाषण पहिल्या शतकातील अक्विल्ला व प्रिस्किल्ला या ख्रिस्ती विवाहित जोडप्याच्या उदाहरणावर आधारित होते. (रोम. १६:३, ४) यंदाच्या गिलियड वर्गात एकूण ५६ विद्यार्थी म्हणजेच २८ विवाहित जोडपी होती. या सर्वांना आठवण करून देण्यात आली की मिशनरी कार्यात यशस्वी होण्यासाठी त्यांचे वैवाहिक नाते भक्कम असण्याची गरज आहे. बायबलमध्ये अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांचा नेहमी एकत्र उल्लेख करण्यात आला आहे. त्याअर्थी, प्रेषित पौलाच्या व ख्रिस्ती मंडळीच्या दृष्टीने ते दोघे अविभाज्य होते. त्याच प्रकारे, आजही मिशनरी जोडप्यांनी सोबत मिळून कामे केली पाहिजेत, एकत्र मिळून उपासना केली पाहिजे व परदेशातील नेमणुकीच्या वैशिष्ट्यपूर्ण आव्हानाला दोघांनी मिळून सामोरे गेले पाहिजे.—उत्प. २:१८.

यानंतर नियमन मंडळाचे सदस्य गाय पिअर्स यांनी “यहोवाच्या चांगुलपणाला प्रतिसाद द्या,” हे भाषण दिले. चांगुलपणाचा अर्थ फक्‍त वाईट गोष्टी करण्यापासून स्वतःला आवरणे इतकाच नाही, असे बंधू पिअर्स यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. चांगली व्यक्‍ती इतरांच्या हिताचा विचार करून त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करते. यहोवाचा चांगुलपणा हा परमोच्च कोटीचा आहे. (जख. ९:१६, १७) त्याचा हा चांगुलपणा व प्रेम आपल्यालाही इतरांकरता चांगल्या गोष्टी करण्याची प्रेरणा देते. विद्यार्थ्यांची प्रशंसा करत बंधू पिअर्स शेवटी म्हणाले: “तुमची आजवरची कामगिरी उत्तम होती. आणि यहोवा देव तुम्हाला भविष्यात जे काही कार्य नेमेल ते तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि त्याद्वारे त्याच्या चांगुलपणाचे कृतज्ञपणे अनुकरण कराल याची आम्हाला खात्री आहे.”

भूतपूर्व मिशनरी व अलीकडेच गिलियड प्रशालेचे प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आलेले मायकल बर्नेट यांनी पुढचे भाषण दिले. भाषणाचे शीर्षक, “ते तुमच्या डोळ्यांच्या दरम्यान कपाळपट्टीसारखे असावे,” असे होते. इस्राएलांना यहोवाने ज्या अद्‌भुत रीतीने इजिप्तमधून सोडवले होते ते त्यांनी जणू “कपाळपट्टी” बांधल्याप्रमाणे सदैव आठवणीत ठेवायचे होते. (निर्ग. १३:१६) विद्यार्थ्यांना, गिलियड प्रशालेत विपुल प्रमाणात मिळालेले मार्गदर्शन, कपाळपट्टी बांधल्याप्रमाणे नेहमी आठवणीत ठेवण्यास सांगण्यात आले. बंधू बर्नेट यांनी नम्र व विनयशील असण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि मिशनरी सहकाऱ्‍यांसोबत किंवा इतरांसोबत मतभेद झाल्यास बायबलमधील तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.—मत्त. ५:२३, २४.

अनेक वर्षे गिलियड प्रशिक्षक म्हणून सेवा करणारे मार्क न्यूमर यांच्या भाषणाचा विषय होता, “तुमच्यासाठी कोणते गीत गायिले जाईल?” प्राचीन काळी, युद्धात विजय मिळवल्यावर गीत गाऊन योद्ध्‌यांचा गौरव करण्याची प्रथा होती. अशाच एका गीतात, रऊबेन, दान व आशेर या इस्राएली गोत्रांनी कशा प्रकारे कर्तव्यापासून अंग चोरले हे उघड करण्यात आले, तर जबुलून या गोत्रातील लोकांनी दाखवलेल्या आत्मत्यागी वृत्तीची वाहवा करण्यात आली. (शास्ते ५:१६-१८) प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीची, गीतातील बोलांप्रमाणे असणारी कृत्ये आज न उद्या सर्वांना कळतात. एखाद्या व्यक्‍तीने ईश्‍वरशासित व्यवस्थेला जीवनभर एकनिष्ठ राहून आवेशाने देवाची सेवा केल्यास, यहोवाला तर तिच्याविषयी संतोष वाटेलच पण इतर बांधवांसाठी तिचे उदाहरण अनुकरणीय ठरेल. आपल्या कृत्यांद्वारे लिहिले जाणारे लाक्षणिक गीत मंडळीतील बांधव ऐकतात तेव्हा त्यांना आपल्या चांगल्या कृत्यांचे अनुकरण करण्याची चालना मिळते.

गिलियड प्रशिक्षणाचा भाग म्हणून, १२४ व्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून प्रचार कार्यात एकूण ३,००० तास खर्च केले. “पवित्र आत्म्याचे नेतृत्व स्वीकारणे” हा विषय असलेल्या भागात, विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या प्रशालांचे आयोजन करणाऱ्‍या थियोक्रॅटिक स्कूल्स डिपार्टमेंटच्या सॅम रॉबर्सन यांना क्षेत्र सेवाकार्यात आलेले अनुभव सांगितले व काही अनुभव प्रात्यक्षिकांच्या रूपात सादर केले. या प्रोत्साहनदायक अनुभवांनंतर संयुक्‍त संस्थानांतील शाखा समितीचे पॅट्रिक लाफ्रँका यांनी विविध देशांत सेवा करत असलेल्या गिलियड पदवीधरांच्या मुलाखती घेतल्या. या बांधवांनी दिलेल्या व्यवहारोपयोगी सूचना विद्यार्थ्यांनी कृतज्ञतापूर्वक स्वीकारल्या.

नियमन मंडळाच्या ॲन्टनी मॉरिस यांनी शेवटचे भाषण दिले. “लक्षात ठेवा, दृश्‍य गोष्टी क्षणिक आहेत” असे त्यांच्या भाषणाचे शीर्षक होते. सध्या आपल्याला तोंड द्याव्या लागत असलेल्या कोणत्याही तात्पुरत्या संकटापेक्षा, यहोवा आपल्याला भविष्यात जे आशीर्वाद देणार आहे त्यांवर आपण लक्ष केंद्रित करावे असे बायबल आपल्याला सांगते. (२ करिंथ. ४:१६-१८) दारिद्र्‌य, अन्याय, अत्याचार, रोगराई व मृत्यू या आज सर्वत्र दिसणाऱ्‍या वास्तविकता आहेत. मिशनऱ्‍यांनाही यांपैकी काही दुःखद संकटांना तोंड द्यावे लागू शकते. पण या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत हे लक्षात ठेवल्यास, आपल्याला आध्यात्मिक समतोल कायम राखण्यास व सतत आशावादी राहण्यास साहाय्य मिळेल.

बंधू लेट्‌ यांनी कार्यक्रमाचा समारोप केला, त्यावेळी सर्व पदवीधर व्यासपीठावर होते. बंधू लेट्‌ यांनी या पदवीधरांना कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याचे प्रोत्साहन देऊन म्हटले: “यहोवा आपल्या पाठीशी असल्यास, कोणतीही गोष्ट त्याच्याप्रती असलेली आपली निष्ठा भंग करू शकणार नाही.” त्यांनी नवोदित मिशनऱ्‍यांना टोळांप्रमाणे यहोवाच्या सेवेत सतत पुढे वाटचाल करण्याचे व सर्वदा आवेशी, एकनिष्ठ व आज्ञाधारक राहण्याचे उत्तेजन दिले.

[३० पानांवरील चौकट]

वर्गाची आकडेवारी

विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीत्व केलेले एकूण देश: ७

नेमलेले देश: १६

एकूण विद्यार्थी: ५६

सरासरी वय: ३३.८

सत्यात सरासरी वर्षे: १८.२

पूर्ण वेळेच्या सेवेत सरासरी वर्षे: १३.८

[३१ पानांवरील चित्र]

वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचा १२४ वा पदवीधर वर्ग

खालील यादीत ओळींना पुढून मागे अशा रीतीने क्रमांक देण्यात आला आहे आणि नावे डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने देण्यात आली आहेत.

(१) निकलसन, टी.; मेन, एच.; सेन्गे, वाय.; स्नेप, एल.; वानेगास, सी.; पो, एल. (२) सान्टाना, एस.; ओ, के.; लमॅट्रा, सी.; विल्यम्ज, एन.; ॲलिक्झांडर, एल. (३) वुड्‌ज, बी.; स्टेन्टन, एल.; हन्टली, ई.; ॲल्वरेज, जी.; क्रूस, जे.; बेनट, जे. (४) विल्यमसन, ए.; गॉन्सालेस, एन.; झुरॉस्की, जे.; डहॉन्ड, आय.; मे, जे.; ड्येमी, सी.; टॅवनर, एल. (५) लमॅट्रा, डब्ल्‌यू.; हॅरिस, ए.; वेल्झ, सी.; रॉजर्झ, एस.; डरन्ट, एम.; सेन्गे, जे. (६) हन्टली, टी.; वानेगास, ए.; पो, ए.; सान्टाना, एम.; बेनट, वी.; टॅवनर, डी.; ओ, एम. (७) झुरॉस्की, एम.; रॉजर्झ, जी.; ड्येमी, डी.; निकलसन, एल.; ॲल्वरेज, सी.; स्नेप, जे. (८) हॅरिस, एम.; गॉन्सालेस, पी.; मेन, एस.; वुड्‌ज, एस.; स्टेन्टन, बी.; विल्यमसन, डी.; डरन्ट, जे. (९) क्रूस, पी.; डहॉन्ड, बी.; विल्यम्ज, डी.; वेल्झ, एस.; ॲलिक्झांडर, डी.; मे, एम.

[३२ पानांवरील चित्र]

गिलियड प्रशाला, वॉचटावर शैक्षणिक केंद्राच्या ठिकाणी स्थित आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा