तुम्हाला आठवते का?
तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:
• काही ख्रिश्चनांना लग्नानंतर कोणत्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागते, पण त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे?
काही ख्रिश्चनांना लग्नानंतर लक्षात येते की, त्यांचा विवाह-सोबती त्यांनी अपेक्षा केली होती तसा नाही. अशा विवाहात कितीही समस्या असल्या तरी, बायबल ज्याला अनुमती देत नाही असा घटस्फोट घेणे हा यावरील तोडगा नसल्याचे खऱ्या ख्रिश्चनांना माहीत आहे. त्यामुळे, ते आपला विवाह टिकवून ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात.—४/१५, पृष्ठ १७.
• वृद्धाश्रमात राहणाऱ्या ख्रिस्ती बंधूभगिनींना कदाचित कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते?
वृद्धाश्रम ज्या परिसरात आहे तेथील मंडळीबद्दल कदाचित त्यांना काही माहिती नसेल. शिवाय वृद्धाश्रमातील बहुतेकजण वेगवेगळ्या धर्मांचे असल्यामुळे, कदाचित ते त्यांच्यावर धार्मिक कार्यक्रमांत भाग घेण्याचा दबाव आणू शकतात. त्यांच्या ख्रिस्ती कुटुंबीयांनी व स्थानिक मंडळीच्या सदस्यांनी या समस्यांविषयी जागरूक राहून वृद्ध बांधवांना साहाय्य व आधार दिला पाहिजे.—४/१५, पृष्ठे २५-२७.
• आपल्या समस्या सोडवण्यासाठी वैवाहिक सोबत्यांनी कोणते चार कानमंत्र आठवणीत ठेवण्याची गरज आहे?
समस्येची चर्चा करण्यासाठी निश्चित वेळ ठरवा. (उप. ३:१, ७) आपले मत प्रामाणिकपणे व आदराने व्यक्त करा. (इफिस. ४:२५) आपल्या सोबत्याच्या भावना ऐकून घ्या आणि त्या मान्य करा. (मत्त. ७:१२) समस्येवर तोडगा निघतो तेव्हा सहमती दाखवा. (उप. ४:९, १०)—७/१, पृष्ठे १०-१२.
• येशूने आपल्याला आमची ॠणे आम्हास सोड अशी प्रार्थना करायला आर्जवले तेव्हा तो कोणत्या ॠणांबद्दल बोलत होता?
मत्तय ६:१२ व लूक ११:४ या वचनांची तुलना केल्यास हे स्पष्ट होते की येशू या ठिकाणी आर्थिक ॠणांबद्दल बोलत नव्हता. तर तो पापांच्या संदर्भात बोलत होता. आपण क्षमाशील असण्याद्वारे देवाचे अनुकरण केले पाहिजे.—५/१५, पृष्ठ ९.
• नियमन मंडळाचे सदस्य कोणत्या समित्यांचे काम पाहतात?
सूत्रसंचालक समिती; सभासद समिती; प्रकाशन समिती; सेवा समिती; शिक्षण समिती; लेखन समिती.—५/१५, पृष्ठ २९.
• नोहाच्या काळात आलेला जलप्रलय जगव्याप्त होता हे आपण खात्रीने का म्हणू शकतो?
जलप्रलय खरोखरच झाला होता व तो जगव्याप्त होता या गोष्टीला येशूने दुजोरा दिला. येणाऱ्या नाशाविषयी बायबलमधील इशारे जगव्याप्त जलप्रलयाच्या सत्य घटनेवरच आधारित आहेत.—७/१, पृष्ठ १७.
• रोमकर १:२४-३२ यात ज्या आचरणाविषयी वर्णन केले आहे ते यहुद्यांविषयी होते की गैर-यहुदी लोकांविषयी?
हे वर्णन तसे दोन्ही गटांतील लोकांना लागू होऊ शकते, पण पौल या ठिकाणी पुरातन काळात ज्यांनी नियमशास्त्राचे पालन केले नाही, त्या इस्राएल राष्ट्रातील लोकांविषयी बोलत होता. देवाचे नीतिमान नियम त्यांना माहीत असूनही, त्यांनी या नियमांचे पालन केले नाही.—६/१५, पृष्ठ २९.
• वाजवी अपेक्षा ठेवल्यामुळे आपला आनंद कशा प्रकारे वाढू शकतो?
जर आपण परिणामांचा विचार न करता अवाजवी ध्येये ठेवली व आकाशपाताळ एक करून ती साध्य करण्याचा प्रयत्न केला, तर आपण अनावश्यक तणाव ओढवून घेऊ. पण त्याच वेळी, स्वतःच्या बाबतीत आपण अतिमवाळही असू नये. म्हणजेच, साध्या साध्या समस्यांचा बाऊ करून आपण ख्रिस्ती सेवाकार्यापासून अनावश्यकपणे अंग चोरू नये.—७/१५, पृष्ठ २९.
• पालक आणि पौगंडावस्थेतील मुलांमधील संवादाच्या आड येणारी अडखळणे कोणती असू शकतात?
पौगंडावस्थेतील मुलांचा लाजाळूपणा,स्वतंत्रतेची त्यांच्या मनात असलेली तीव्र ओढ आणि एकलकोंडेपणाचे कवच तयार करण्याची त्यांची प्रवृत्ती ही काही अडखळणे असू शकतात. पायी किंवा गाडीने फिरायला जाताना, एखादा खेळ खेळताना किंवा घरातले एखादे काम जोडीने करताना आईवडील आपल्या मुलांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि मूल जे सांगायचा प्रयत्न करत आहे त्यामागच्या भावनाही समजून घेण्यास त्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे.—१०/१, पृष्ठे १०-११.