वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w01 ११/१ पृ. २५-२६
  • “धार्मिक सहिष्णुता दिन”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “धार्मिक सहिष्णुता दिन”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचे साक्षीदार खरे ख्रिस्ती आहेत का?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • ख्रिस्तीजन आणि आजचा मानवी समाज
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • राज्य उद्‌घोषक संपूर्ण पृथ्वीवर सक्रिय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
w01 ११/१ पृ. २५-२६

“धार्मिक सहिष्णुता दिन”

यहोवाच्या साक्षीदारांबरोबर झालेल्या चर्चेमुळे उत्सुकता वाढलेल्या पोलंडमधील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने तिच्या शाळेसाठी “धार्मिक सहिष्णुता दिन” साजरा करण्यासाठी एक दिवस ठरवला. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही कॅथलिक, बौद्ध आणि यहोवाचे साक्षीदार यांचे धार्मिक विश्‍वास व प्रथा यांबद्दलची थोडक्यात माहिती देण्याकरता कोणी पुढे येऊ इच्छितो का असे विचारले तेव्हा यहोवाचे साक्षीदार असलेले तीन किशोरवयीन लगेच तयार झाले.

तो दिवस आला तेव्हा, सर्वांत पहिल्यांदा १५ वर्षीय मालविनाने भाषण दिले. तिच्या भाषणात ती म्हणाली: “तुमच्यापैकी बहुतेक जण, आम्ही या शाळेत येण्याआधीपासूनच आम्हाला ओळखत होते कारण आम्ही तुमच्या घरी आलो होतो. आम्ही वारंवार लोकांच्या घरी भेटी का देतो याचा कदाचित तुम्ही विचार करत असाल. लोकांच्या घरी जाण्याचे कारण आम्ही, ख्रिस्ती धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त याच्या उदाहरणाचे अनुकरण करतो. जेथे लोक भेटतील तेथे त्याने देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला. त्याच्या प्रेषितांनी आणि आरंभीच्या इतर ख्रिश्‍चनांनी देखील असेच केले. अनेक ठिकाणी, यहोवाच्या साक्षीदारांना ते बाळगत असलेल्या धार्मिक विश्‍वासामुळे पुष्कळ त्रास सहन करावा लागत आहे; परंतु आपल्या शाळेत, तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्हाला कसलाही त्रास नाही याबद्दल आम्हाला आनंद वाटतो. आणि याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो!”

भाषणाच्या शेवटी मालविना म्हणाली: “आम्ही तुमच्या घरी येण्याचे आणखी एक कारण आहे. आम्हाला तुमच्याबद्दल काळजी वाटते. बायबल म्हणते, की फार लवकर मानवजातीला, जगाला हादरवून टाकणाऱ्‍या घटना अनुभवाव्या लागणार आहेत. त्यामुळे, पुढच्या वेळी आम्ही तुमचे दार ठोठावू तेव्हा कृपा करून आमचं बोलणं ऐकून घ्या. पृथ्वीवरील परादीसात अनंतकाळपर्यंत आपण सर्व एकोप्याने कसे राहू शकतो हे तुम्हाला सांगायला आम्हाला आवडेल.”

यानंतर, मतायुष याने भाषण दिले. तोही १५ वर्षांचा आहे. मतायुषने श्रोत्यांना सांगितले, की अनेक वर्षांपासून यहोवाच्या साक्षीदारांनी सुवार्तेचा प्रचार करण्याकरता अनेकाविध पद्धतींचा अवलंब केला आहे. उदाहरणार्थ, साक्षीदार १९१४ साली—मूकपटांच्या युगात—“फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” हा ध्वनीसहित असलेला चलचित्रपट आणि स्लाईड प्रदर्शन दाखवत होते.

राज्य संदेशाचा प्रसार करण्यात रेडिओची काय भूमिका होती आणि यहोवाच्या साक्षीदारांनी निर्माण केलेल्या कॉम्प्युटराईज्ड मल्टीलँग्वेज इलेक्ट्रॉनिक फोटोटाईपसेटींग सिस्टम (MEPS) या संगणकीय कार्यक्रमाविषयी मतायुषने सांगितले. यहोवाच्या साक्षीदारांनी, रक्‍ताविना उपचार देण्याच्या तंत्राविषयी डॉक्टरांना माहिती देण्यास कशाप्रकारे साहाय्य केले तेही त्याने सांगितले. तो म्हणाला: “आता, ज्येष्ठ पोलिश डॉक्टरसुद्धा, रक्‍ताच्या संबंधाने आम्ही घेतलेल्या भूमिकेची प्रशंसा करतात व यावर जोर देऊन सांगतात, की दरवर्षी साक्षीदार नसलेल्या अधिकाधिक रुग्णांवर देखील रक्‍ताविना शस्त्रक्रिया केल्या जातात.”

मतायुषने आपल्या भाषणाच्या समारोपास राज्य सभागृहांच्या बांधकामाविषयी सांगितले व विचारले: “आमच्या राज्य सभागृहाला भेट द्यायला तुम्हाला आवडेल का? प्रवेश विनामूल्य आहे आणि तिथं कसलीही वर्गणी गोळा केली जात नाही.” सॉस्नोवेट्‌स येथील अधिवेशन केंद्राविषयी बोलताना मतायुष म्हणाला: “तुम्ही एकदा तरी ही भली मोठी वास्तू आणि तिथं चालणारं काम आवर्जून पाहिलं पाहिजे. आपण सर्व मिळून तिथं जाऊ या का? आमच्याकडे एक कल्पना आहे आणि आमची मैत्रिण, कतारझिना तिच्याविषयी तुम्हाला अधिक सांगणार आहे.”

यानंतर, १५ वर्षीय कतारझिनाने पूर्ण उत्साहाने म्हटले: “सॉस्नोवेट्‌स येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रांतीय अधिवेशनाला तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. येथे, तरुणांना उपयोगी पडतील अशा विषयांवर चर्चा केली जाणार आहे.” कतारझिनाने, ख्रिश्‍चनांचा मुख्य सण—येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक विधी—याविषयी देखील सांगितले. तिने सर्वांना असे उत्तेजन दिले: “गेल्या वर्षी, संपूर्ण जगभरात १.४ कोटी लोक या स्मारकविधीला उपस्थित होते. पुढच्या वेळी तुम्ही देखील या स्मारकविधीला उपस्थित राहाल का?”

मालविना, मतायुष आणि कतारझिना या तिघांनी आपले भाग प्रस्तुत केल्यानंतर, यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषक (इंग्रजी) या पुस्तकासह यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्‍वासांची आणि कार्यांची माहिती देणारे दोन व्हिडिओ कॅसेट्‌स शिक्षकांना दिल्या.a शिक्षकांनी तिघांचे आभार मानून ही भेट स्वीकारली आणि या साहित्याचा इतिहासाच्या वर्गात उपयोग केला जाईल असेही आश्‍वासन दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी, १२ वर्षीय मार्टिनाने जमलेल्या सर्वांसाठी “यहोवाला धन्यवाद” हे शीर्षक असलेले राज्य गीत वाजवले. या तरुण साक्षीदारांनी, ‘आपल्या देवाकडून धैर्य मिळवून’ उत्तम साक्ष दिली. (१ थेस्सलनीकाकर २:२) सर्व तरुण साक्षीदारांकरता किती हे उत्तम उदाहरण!

[तळटीप]

a यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

[२६ पानांवरील चित्र]

शाळेत भाषण द्यायच्या काही दिवस आधी त्याची तयारी करताना, मालविना

[२६ पानांवरील चित्र]

आपल्या प्रस्तुतीसाठी बायबलमधून वचने शोधताना, कतारझिना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा