वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 ५/१ पृ. २३
  • “हे यहोवा, मी तुझ्या वेदीभोवती फिरेन”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “हे यहोवा, मी तुझ्या वेदीभोवती फिरेन”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 ५/१ पृ. २३

“हे यहोवा, मी तुझ्या वेदीभोवती फिरेन”

“मीआपले हात निर्दोषतेत धुईन; तेव्हा हे यहोवा, मी तुझ्या वेदीभोवती फिरेन.” (स्तोत्र २६:६, पं.र.भा.) या शब्दांत प्राचीन काळच्या राजा दावीदाने यहोवाबद्दलची आपली श्रद्धा व्यक्‍त केली. पण तो यहोवाच्या “वेदीभोवती” का फिरणार होता आणि त्याचा काय अर्थ होतो?

दावीद यहोवाची उपासना करायला निवासमंडपात जायचा. या निवासमंडपात तांब्याचा पृष्ठभाग असलेली एक वेदी होती. त्याच्या कारकीर्दीत हे निवासमंडप जेरुसलेमच्या उत्तरेस गिबोन येथे होते. (१ राजे ३:४) या निवासमंडपातील चौकोनी वेदी फक्‍त सात फूट उंच होती; कालांतराने शलमोनाच्या मंदिरातील अंगणात उभारण्यात आलेल्या भव्य वेदीसमोर तर ही अगदी ठेंगणी होती.a तरीपण, दावीदाला या निवासमंडपात येऊन यहोवाची उपासना करायला आनंद वाटायचा. आणि याच निवासमंडपात संपूर्ण इस्राएल राष्ट्राचे लोक येऊन यहोवाची उपासना करत असत.—स्तोत्र २६:८.

निवासमंडपातील या वेदीवर होमार्पणे, शांत्यर्पणे व दोषार्पणे वाहिली जायची आणि प्रायश्‍चित्ताच्या दिवशी संपूर्ण राष्ट्राच्या वतीने अर्पणे केली जायची. या वेदीचा आणि अर्पणांचा आज ख्रिश्‍चनांसाठी काही विशिष्ट अर्थ आहे. प्रेषित पौलाने म्हटले, की वेदी देवाच्या इच्छेला चित्रित करते. आणि देवाच्या याच इच्छेमुळे त्याने मानवजातीला मुक्‍त करणाऱ्‍या उचित अर्पणाचा स्वीकार केला. पौल म्हणाला: “त्या ‘इच्छेने’ आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहो.”—इब्री लोकांस १०:५-१०.

वेदीवर अर्पण चढवायच्या आधी, स्वतःला शुद्ध करण्याकरता याजक आपले हात धूत असत. तेव्हा, राजा दावीदाने ‘वेदीभोवती फिरण्याआधी’ “निर्दोषतेत” आपले हात धुतले. हे योग्यच नाही का? तो “खऱ्‍या मनाने व सरळतेने” वागला. (१ राजे ९:४) त्याने अशाप्रकारे आपले हात धुतले नसते तर त्याची उपासना, अर्थात ‘वेदीभोवती चालणे’ देवाने स्वीकारले नसते. दावीद लेवी नव्हता आणि वेदीवर याजकीय सेवा पार पाडायचा सुहक्कही त्याला नव्हता हे खरे आहे. शिवाय तो राजा असूनही त्याला निवासमंडपाच्या अंगणातही यायची परवानगी नव्हती. तरीपण, एक विश्‍वासू इस्राएली या नात्याने त्याने मोशेच्या नियमशास्त्राचे कटाक्षाने पालन केले आणि वेदीवर अर्पण करावयास नियमितरीत्या बलिदाने आणली. तो वेदीभोवती फिरला याचा हाच अर्थ होतो की, त्याने शुद्ध उपासनेला त्याच्या जीवनात प्रथम स्थान दिले.

आपणही आज दावीदाच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो का? निश्‍चितच करू शकतो. येशूच्या बलिदानावर विश्‍वास ठेवून आपणही आपले हात निर्दोषतेत धुऊन यहोवाच्या वेदीभोवती फिरू शकतो आणि ‘स्वच्छ हाताने व शुद्ध मनाने’ यहोवाची सेवा करू शकतो.—स्तोत्र २४:४.

[तळटीप]

a ही चौकोनी वेदी सुमारे ३० फूट उंच होती.

[२३ पानांवरील चित्र]

वेदी यहोवाच्या इच्छेला चित्रित करते; आणि देवाच्या याच इच्छेमुळे त्याने मानवजातीला मुक्‍त करणाऱ्‍या उचित अर्पणाचा स्वीकार केला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा