लग्नाची अंगठी
“माझ्या बोटाकडे पाहा. तुम्हाला माझ्या बोटात लग्नाची अंगठी दिसते का?” असा प्रश्न एका मनुष्याने साक्षीदार असलेल्या एका बहिणीला विचारला. बहिणीने त्या मनुष्याच्या बोटाकडे पाहिले तेव्हा त्याच्या बोटात लग्नाची अंगठी नव्हती. तेव्हा त्या मनुष्याने साक्षीदार बहिणीला सांगितले, की त्याचे आणि त्याच्या पत्नीचे पटत नसल्यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे. हे ऐकताच त्या बहिणीने म्हटले: “तुम्हाला घटस्फोट घेण्याची काही गरज नाही; तुम्ही हे पुस्तक घ्या आणि वाचा. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.” असे म्हणून तिने बायबलवर आधारित असलेले सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञानa हे पुस्तक त्या मनुष्याला दिले.
काही दिवसांनी हा मनुष्य मोठ्या आनंदाने साक्षीदार बहिणीकडे परत आला. आणि त्याने आपल्या बोटातील लग्नाची अंगठी तिला दाखवली. त्याने आणि त्याच्या पत्नीने संपूर्ण ज्ञान पुस्तक वाचून काढले आणि आता ते दोघेही आनंदी आहेत असे त्याने साक्षीदार बहिणीला सांगितले. या पुस्तकामुळे त्या दोघांनी लग्नाच्या अंगठ्या पुन्हा बोटांत घातल्या होत्या.
एकमेकांवर मनापासून प्रेम कसे करावे, यावर बायबल आधारित सल्ल्यामुळे वैवाहिक जोडप्यांना मदत मिळू शकते. कारण बायबलचा लेखक स्वतः आपला निर्माणकर्ता आहे. तो म्हणतो: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.”—यशया ४८:१७.
[तळटीपा]
a वॉच टावर बायबल अण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.