वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 १/१५ पृ. ३
  • भविष्य जाणणे शक्य आहे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भविष्य जाणणे शक्य आहे!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • तुमचे भवितव्य त्याविषयी शिकण्याचा एक उत्तम मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • देवाच्या भविष्यसूचक वचनात भविष्याची आशा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • कुंडली—साहाय्यक की घातक?
    सावध राहा! माहितीपत्रक ६-३ (gbr6-3)
  • लाखो लोक जाणार आहेत—तुमच्याबाबत काय?
    सावध राहा!—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 १/१५ पृ. ३

भविष्य जाणणे शक्य आहे!

पुष्कळ लोकांना आपल्या भविष्याची चिंता असते. भविष्य नीट योजलेले असावे, पैशांची योग्यरितीने गुंतवणूक केलेली असावी आणि आपले जीवन सुरक्षित असावे असे त्यांना वाटते. पण उद्या काय होईल हे जाणण्याचा एखादा खात्रीशीर मार्ग आहे का?

भविष्य जाणून घेण्याचा एकही उपाय मानवांनी सोडलेला नाही. फ्युचरोलॉजिस्ट्‌स (भविष्याचा अभ्यास करणारे तज्ज्ञ) म्हणून ओळखले जाणारे समाजशास्त्रज्ञ चालू वहिवाटींच्या अनुसार भविष्य वर्तवतात. अर्थशास्त्रज्ञ देखील आपल्या क्षेत्रात हेच करतात. ज्योतिषी आणि शकुन पाहणारे भविष्य सांगण्यासाठी राशी भविष्य, क्रिस्टल बॉल तसेच गूढ शक्‍तींचा उपयोग करतात. उदाहरणार्थ, फ्रेंच फलज्योतिषी नॉस्ट्रडेमस याचा मृत्यू होऊन कित्येक शतके उलटून गेली असली, तरी आजही त्याची ख्याती आहे.

या तथाकथित भविष्य वर्तवणाऱ्‍यांचे भविष्यकथन मुळीच विश्‍वसनीय ठरलेले नाही; उलट त्यामुळे लोकांची निराशाच झाली आहे. का? कारण ते यहोवा देव आणि त्याचे वचन बायबल याकडे लक्ष देत नाहीत. मात्र, ‘बायबलमध्ये भाकीत केलेल्या गोष्टी पूर्ण होणार आहेत हे खात्रीने का सांगता येते? मानवांसाठी असलेल्या देवाच्या उद्देशात त्यांची काय भूमिका आहे? या भविष्यवाणींचा लाभ माझ्या कुटुंबाला त्याचप्रमाणे मला कसा होऊ शकतो?’ अशा मूलभूत प्रश्‍नांची उत्तरे त्यांना देता येत नाहीत. पण बायबल या प्रश्‍नांची खात्रीदायक उत्तरे देते.

बायबलमधील भविष्यवाण्या इतरही गोष्टींमुळे श्रेष्ठ ठरतात. एखाद्याला बरे-वाईट यात निवड करायला बायबलची भाकिते वाव देतात आणि त्यामुळे ही भाकिते फलज्योतिषशास्त्रातील भाकितांप्रमाणे नाहीत. बायबलनुसार माणूस दैवाच्या हातातले खेळणे नाही. (अनुवाद ३०:१९) पण नॉस्ट्रडेमससारख्या भविष्य वर्तवणाऱ्‍यांच्या लिखाणांमध्ये जीवनाविषयी काहीच नैतिक मार्गदर्शन आढळत नाही; ही पोकळी गूढता व सनसनाटी विषयांनी भरून काढली आहे. पण, बायबलमधील भविष्यवाण्या मात्र आपल्याला स्पष्ट नैतिक मार्गदर्शन पुरवतात. देवाने जे उद्देशिले आहे ते तो का करणार आहे याचे त्यात स्पष्टीकरण दिले आहे. (२ इतिहास ३६:१५) आणि यहोवाच्या भविष्यवाण्या पूर्ण झाल्याशिवाय राहात नाहीत कारण ‘देवाच्याने असत्य बोलवतच नाही.’ (तीत १:२, पं.र.भा.) यास्तव, देवाच्या वचनातून मार्गदर्शन मिळवणाऱ्‍या व्यक्‍ती भविष्यासंबंधी अंधारात नाहीत, त्यांचे जीवन उद्देशपूर्ण आणि आनंदी आहे; आपला मौल्यवान वेळ आणि साधनसंपत्ती ते व्यर्थ गोष्टींवर उधळत नाहीत.—स्तोत्र २५:१२, १३.

या आणि इतर अनेक गोष्टींची चर्चा, संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या १९९९/२००० “देवाचे भविष्यसूचक वचन” या प्रांतीय अधिवेशनांमध्ये करण्यात आली होती. भाषणे, मुलाखती, प्रस्तुती आणि बायबलवर आधारित एक नाटक यांद्वारे देवाच्या भविष्यसूचक वचनाचा अभ्यास आणि पालन करणारे लोक आध्यात्मिकतेचा अद्‌भुत वारसा कसा उपभोगत आहेत त्याकडे श्रोत्यांचे लक्ष आकर्षित केले आहे. पुढील लेखामध्ये अधिवेशनातील काही ठळक गोष्टींची उजळणी करण्यात आली आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा