वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ५/१ पृ. २५
  • तुमच्या मुलांबरोबर वाचा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या मुलांबरोबर वाचा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ५/१ पृ. २५

तुमच्या मुलांबरोबर वाचा

वेझा नामक एका ब्राझीलियन मासिकानुसार, ज्या पालकांना वाचण्याची आवड असते त्यांच्या मुलांनाही पुस्तकांचे वेड लागते, पण जे पालक स्वतःचे चांगले उदाहरण मांडत नाहीत त्यांची मुले देखील त्यांच्यासारखीच होतात. “एकत्र वाचन केल्यामुळे पालक आणि पाल्य यांच्यामधील जवळीक आणखी दाट होते व पाल्याला पुस्तकातील विषय अधिक चांगल्याप्रकारे आत्मसात करण्यास मदत मिळते,” असे बालविकास तज्ज्ञा मार्था होप यांचे म्हणणे आहे.

आपल्या मुलांना वाचून दाखवताना त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याची तुम्हाला संधी मिळते. वाचत असताना पुस्तकातील चित्रांची तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करू शकता. “एखाद्या मुलाला पुस्तकांचे विषय जितक्या चांगल्याप्रकारे समजतील तितके ते आपली जिज्ञासा तृप्त करण्यासाठी पुस्तके वाचण्यास प्रवृत्त होईल,” असे होप म्हणाल्या.

यहोवाच्या साक्षीदारांपैकी अनेक पालकांना आपल्या पाल्याबरोबर वाचायला आवडते. बायबल कथांचं माझं पुस्तक, थोर शिक्षकाचे ऐका व सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य यासारखी पुस्तके ते वाचतात.a अशाप्रकारची पुस्तके मुलांना चांगले वाचक होण्यास तर मदत करतातच, शिवाय जगातील सर्वाधिक खप असलेले पुस्तक अर्थात पवित्र बायबल याच्याबद्दलही त्यांची आवड वाढते. तेव्हा, तुम्ही पालक असाल तर देवाच्या वचनाचे व्यासंगी होण्याद्वारे आपल्या पाल्यापुढे चांगले उदाहरण मांडा. (यहोशवा १:७, ८) आणि त्यांच्याबरोबर वाचन करण्यासाठी जरूर वेळ काढा!

[तळटीप]

a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा