वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ५/१ पृ. ३-४
  • स्वातंत्र्य प्रत्येकाचीच मनोकामना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वातंत्र्य प्रत्येकाचीच मनोकामना
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अद्यापही “बंधनात”
  • मुक्‍त पण जबाबदार लोक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • यहोवा देत असलेले खरे स्वातंत्र्य स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • स्वातंत्र्य देणाऱ्‍या यहोवा देवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • खऱ्‍या स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ५/१ पृ. ३-४

स्वातंत्र्य प्रत्येकाचीच मनोकामना

“मानव स्वतंत्र जन्मला होता, पण तो चहूबाजूंनी बंधनात जखडला गेला आहे,” असे फ्रेंच तत्त्वज्ञानी झॉन-झॉक रुसो यांनी १७६२ मध्ये लिहिले होते. जन्मताच स्वातंत्र्य. किती चांगली कल्पना! पण रुसो यांनी असे परीक्षण केले, की संपूर्ण इतिहासात कोट्यवधी लोकांनी स्वातंत्र्य कधी अनुभवलेच नाही. उलटपक्षी, त्यांनी त्यांचे जीवन “बंधनात” घालवले; चिरंतन आनंदापासून आणि समाधानी जीवनापासून वंचित ठेवलेल्या एका व्यवस्थेत ते जखडले होते.

“एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो,” याचा अनुभव अद्यापही कोट्यवधी लोकांना येत आहे. (उपदेशक ८:९) महत्त्वकांक्षी स्त्री-पुरुष अधिकार मिळवण्याच्या मागे लागल्यामुळे त्यांना इतरांच्या स्वातंत्र्याला पायदळी तुडवताना काही वाटत नाही. एका अहवालाने म्हटले: “एका क्रोधिष्ट जमावाने २१ लोकांना ठार मारले.” सुरक्षा दलाच्या लोकांनी केलेल्या एका “हत्याकांडाविषयी” एका अहवालाने म्हटले, की या दलाच्या लोकांनी ‘लाचार, असहाय स्त्रियांना, मुलांना आणि वृद्धांना ठार मारले, लोकांचे गळे कापले, तर असैनिकी कैद्यांना डोक्यात गोळ्या घालून ठार मारले, आणि गावे उद्‌ध्वस्त करून टाकली आणि अचानक बॉम्ब वर्षाव केले.’

म्हणूनच, दडपशाहीतून मुक्‍त व्हावे असे लोकांना वाटते आणि स्वातंत्र्याकरता ते संघर्षही करतात! पण कटू सत्य हे आहे, की एखाद्या व्यक्‍तीच्या स्वातंत्र्याकरता संघर्ष करणे म्हणजे सहसा दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या अधिकारावर आणि स्वातंत्र्यावर गदा आणणे. या प्रक्रियेत निरपराध स्त्री-पुरुषांचा आणि मुलांचा बळी दिला जातो आणि संघर्ष करण्याचे कारण न्याय्य ठरवून त्यांना ठार करणे “योग्य” आहे असे मानले जाते. उदाहरणार्थ, मागील वर्षी आयर्लंडमध्ये ओमॉ या लहानशा नगरात “स्वातंत्र्य सैनिकांनी” एका कारमध्ये बॉम्ब लावला, त्यामुळे त्या रस्त्यावरील २९ निरपराध लोकांना आपला प्राण गमवावा लागला आणि शेकडो लोक त्या बॉम्ब स्फोटात जखमी झाले.

अद्यापही “बंधनात”

हा लढा संपल्यानंतर, काय प्राप्त होते? जेव्हा “स्वातंत्र्य सैनिकांचा” संघर्ष यशस्वी होतो तेव्हा कदाचित त्यांना काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळेलही. पण ते खऱ्‍या अर्थाने स्वतंत्र आहेत का? तथाकथित मुक्‍त जगातील अतिशय मुक्‍त समाजांतील लोक अद्यापही गरिबी, अपरिपूर्णता, आजार आणि मृत्यूच्या क्रूर “बंधनात” जखडले आहेत हे खरे नाही का? ह्‍या सर्व गोष्टींच्या बंधनात असताना एखादा मनुष्य खऱ्‍या अर्थाने स्वतंत्र आहे असे कसे म्हणू शकतो?

प्राचीन बायबल लेखक मोशे याने जीवनाचे वर्णन अचूकपणे केले आहे कारण संपूर्ण इतिहासात आणि अद्यापही याची प्रचिती मिळते. त्याने म्हटले, आपण ७० किंवा ८० वर्षे जगत असलो तरी, आपला “डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे.” (स्तोत्र ९०:१०) यामध्ये केव्हा तरी बदल होईल का? पूर्ण समाधानी जीवन, आज अनेक जण अनुभवत असलेले दुःख आणि भय यांपासून मुक्‍त असलेल्या जीवनाचा अनुभव घेणे आपल्या सर्वांना कधी शक्य आहे का?

बायबल या प्रश्‍नाचे सकारात्मक उत्तर देते. “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” याविषयी बायबल सांगते. (रोमकर ८:२१) पहिल्या शतकातील प्रेषित पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रात ज्या स्वातंत्र्याविषयी सांगितले त्याविषयी आपण आणखी बारकाईने परीक्षण करू या. पौलाने त्याच्या पत्रात स्पष्टपणे सांगितले, की आपल्या सर्वांना कशाप्रकारे खरी, सार्वकालिक “गौरवयुक्‍त मुक्‍तता” मिळू शकते.

[Picture Credit Line on page 3]

From the book Beacon Lights of History, Vol. XIII

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा