वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ३/१ पृ. ३-४
  • सावत्र कुटुंबांच्या खास समस्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सावत्र कुटुंबांच्या खास समस्या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मुलांचे संगोपन करण्यामधील समस्या
  • सावत्र कुटुंबातही आनंद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • माझ्या पालकाच्या पुनर्विवाहाला मी कसे तोंड द्यावे?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • तुमच्या घरात शांती राखा
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • तुमच्या घराण्याच्या तारणासाठी कठीण परिश्रम करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ३/१ पृ. ३-४

सावत्र कुटुंबांच्या खास समस्या

सावत्र कुटुंबातही आनंद! कसा?

आज जगाच्या अनेक भागांत सावत्र कुटुंबे सर्रास पाहायला मिळतात. या सावत्र कुटुंबांत आगळ्यावेगळ्याच समस्या असतात. सर्वात कठीण समस्या म्हणजे सावत्र कुटुंबांतील मुलांचे संगोपन. पण, सावत्र कुटुंबातही मुलांचे संगोपन चांगल्याप्रकारे करता येणे कसे शक्य आहे हे दाखवण्याचा पुढील दोन लेखांत प्रयत्न करण्यात आला आहे.

सावत्र आईवडिलांच्या नावाला सुरवातीपासूनच काळिमा फासण्यात आला आहे. आपल्यांपैकी बहुतेकांनी लहान असताना सिंड्रेलाची गोष्ट ऐकली असेलच. तिची क्रूर सावत्र आई तिचा खूप छळ करत असे. युरोपमधील मुलांनी स्नो व्हाईट ॲण्ड द सेव्हन डॉर्फस ही गोष्ट देखील ऐकली असेल. स्नो व्हाईटची सावत्र आई नंतर दुष्ट चेटकीण बनते!

अशाप्रकारच्या काल्पनिक कथांमुळे सावत्र कुटुंबांचे अचूक चित्र झळकते का? सर्वच सावत्र आईवडील खरोखरच इतके दुष्ट असतात का? नाही. सावत्र मुलांना चांगले ते द्यावे, असे या सावत्र आईवडिलांना मनापासून वाटते. पण, सावत्र कुटुंबातील मुलांशी वागताना त्यांना काही कठीण समस्यांना सामोरे जावे लागते.

मुलांचे संगोपन करण्यामधील समस्या

वैवाहिक सोबत्यांची अपरिपक्वता हेच बहुतेकवेळा पहिला विवाह मोडकळीस येण्याचे कारण असते. दुसऱ्‍या विवाहात मुलांशी वागताना नातेसंबंधावर मोठा ताण येऊ शकतो. अहवाल असे दाखवून देतात, सावत्र आईवडील असलेल्या १० कुटुंबांपैकी ४ पेक्षा जास्त कुटुंबे विवाहाच्या पहिल्या पाच वर्षांतच मोडकळीस येतात.

भावनात्मक उलघाल, एकनिष्ठेवरून संघर्ष आणि सावत्र पालकांच्या आगमनामुळे मुलांच्या मनात उचल खाणारी द्वेषाची भावना व राग या सर्व गोष्टींची कल्पना नवीन वैवाहिक सोबत्याला कदाचित होणार नाही. या सावत्र मुलांना असे वाटते, की आपले सख्खे पालक आता आपल्यापेक्षा सावत्र पालकांवर जास्त प्रेम करतात. याशिवाय, सख्ख्या पालकाला त्याचा वैवाहिक सोबती सोडतो तेव्हा त्या सख्ख्या पालकाला त्याच्या आधीच्या वैवाहिक सोबत्याशी त्याच्या मुलांची सलगी कदाचित रुचणार नाही. एका मुलाने त्याच्या सख्ख्या वडिलांसोबत असलेल्या त्याच्या चांगल्या नातेसंबंधाविषयी सांगण्याचा प्रयत्न केला, त्याने म्हटले: “आई, तुला पप्पांनी वाईट वागवलं हे मला माहीत आहे, पण माझ्याशी ते तर चांगले वागायचे!” हे कितीही खरे असले, तरी अशा वक्‍तव्याने त्या मुलाच्या वडिलांविषयी तिचे मन कटू होऊ शकते.

एका सावत्र वडिलांनी मान्य केले: “माझ्या सावत्र मुलांचे संगोपन करताना येणाऱ्‍या समस्यांना तोंड देण्याकरता खरं तर मी तयारच नव्हतो. मी असा विचार केला होता, की मी त्यांच्या आईशी लग्न केलंय त्यामुळे मी आता त्यांचा वडील आहे. पण ते इतकं सोपं नव्हतं! मुलांना त्यांच्या सख्ख्या वडिलांविषयी वाटणाऱ्‍या जिव्हाळ्याविषयी मला माहीत नव्हतं आणि त्यामुळे माझ्या हातून पुष्कळ चुका झाल्या.”

मुलांना शिस्त लावण्याच्या वेळी तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मुलांना प्रेमळपणे शिस्त लावण्याची गरज आहे, पण त्यांच्या सख्ख्या पालकांकडूनही त्यांना शिस्त लावण्यात येते तेव्हाही मुले अशा शिस्तीविरुद्ध बहुतेक वेळा बंड करून उठतात. त्यामुळे सावत्र पालकांनी शिस्त लावणे म्हणजे महाकठीणच! सावत्र मुलाला शिस्त लावण्यात येते तेव्हा तो सामान्यपणे असे वक्‍तव्य करील, “तुम्ही माझे सख्खे वडील नाही ना म्हणून!” हे शब्द, चांगल्या हेतूने शिस्त लावणाऱ्‍या सावत्र पालकाच्या किती जिव्हारी लागतील!

सावत्र आईवडील असणाऱ्‍या कुटुंबात मुलांना यशस्वीरीत्या लहानाचे मोठे करणे शक्य आहे का? सावत्र कुटुंबाची यशस्वी उभारणी करण्याकरता सावत्र पालकांना सकारात्मक भूमिका बजावणे शक्य आहे का? या दोन्ही प्रश्‍नांचे उत्तर होय, असे आहे; पण त्यांनी देवाच्या प्रेरित शब्दाचे, बायबलच्या सल्ल्याचे अनुकरण केले तरच.

[३ पानांवरील चित्र]

“तुम्ही माझे सख्खे वडील नाही ना म्हणून!”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा