वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १२/१५ पृ. ५-७
  • लूकने चूक केली होती का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लूकने चूक केली होती का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १२/१५ पृ. ५-७

लूकने चूक केली होती का?

नासरेथमध्ये वाढलेल्या व सर्वसामान्यपणे नासोरी म्हणून ओळखला जाणाऱ्‍या येशूचा १५० किलोमीटर दूर असलेल्या बेथलेहेममध्ये जन्म कसा काय झाला असावा? लूक स्पष्टीकरण देतो: “त्या दिवसात [येशूचा जन्म व्हायच्या आधी] असे झाले की, सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त ह्‍याची आज्ञा झाली. क्विरीनिय हा सूरियाचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपआपल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले.”—लूक १:१; २:१-३.

बहुत टीकाकार असा आरोप करतात, की हा उतारा चूक आहे, नव्हे खोटा आहे. ते या गोष्टीवर अडून राहतात, की ही नावनिशी आणि क्विरीनियची सुभेदारी सा.यु. ६ किंवा ७ मध्ये होती. त्यांचे म्हणणे बरोबर असल्यास लूकचा अहवाल खोटा ठरेल, कारण पुरावा दाखवतो की येशूचा जन्म सा.यु.पू. २ मध्ये झाला होता. परंतु हे टीकाकार दोन महत्त्वपूर्ण वस्तुस्थितींकडे दुर्लक्ष करतात. पहिली वस्तुस्थिती म्हणजे, लूक हे कबूल करतो, की या नावनिशीव्यतिरिक्‍त आणखी एक नावनिशी देखील होती—हिचा तो “पहिली नावनिशी” असा उल्लेख करतो याची नोंद घ्या. म्हणजे त्याला दुसऱ्‍या नावनिशीबद्दलची चांगलीच माहिती होती. (प्रेषितांची कृत्ये ५:३७) ही नंतरची नावनिशी, सा.यु. ६ मध्ये होती; इतिहासकार जोसीफस तिचे वर्णन करतो. दुसरी वस्तुस्थिती म्हणजे, क्विरीनिय सुभेदार होता म्हणून काही येशूचा जन्म त्या नंतरच्या तारखेलाच झाला असे ठरवून टाकण्याची गरज नाही. का नाही? कारण, क्विरीनियने या पदावर दोनदा काम केले. अनेक विद्वान कबूल करतात, की सा.यु.पू. २ मध्ये तो या पदावर पहिल्यांदा होता.

काही टीकाकारांचे म्हणणे आहे की येशूचा जन्म बेथलेहेममध्ये झाला होता हे दाखवण्याकरता कारण मिळावे म्हणून लूकनेच कल्पना लढवून ही नावनिशी काढली व मीखा ५:२ मधील भविष्यवाणी पूर्ण केली. या गोष्टीमुळे तर लूक जाणूनबुजून लबाडी करणारा ठरेल व शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये लिहिणाऱ्‍या या प्रामाणिक इतिहासकाराच्या विरोधात पाहता लूकवरील या बिनबुडाच्या आरोपाचे वर्णन कोणत्याही टीकाकाराला देता येणार नाही.

आणखी एक गोष्ट आहे ज्याचे स्पष्टीकरण कोणताही टीकाकार देऊ शकत नाही: झालेल्या नावनिशीने एक भविष्यवाणी पूर्ण केली! सा.यु.पू. सहाव्या शतकात, दानीएलाने एका शासकाबद्दल भाकीत केले, की जो “वैभवी देशात कर वसूल करणाऱ्‍यास पाठवील.” हे औगुस्ताला आणि इस्राएलमध्ये नावनिशी काढण्याच्या त्याच्या हुकूमाला सूचित होते का? ती भविष्यवाणी पुढे म्हणते, की मशीहाचा किंवा ‘करार केलेल्या करदाराचा’ या शासकाच्या उत्तराधिकाऱ्‍याच्या शासनादरम्यान “नाश होईल.” आणि खरोखरच, औगुस्ताचा उत्तराधिकारी तिबिर्य याच्या शासनादरम्यान येशूचा “नाश” अर्थात वध झाला.—दानीएल ११:२०-२२.

[७ पानांवरील चित्र]

कैसर औगुस्त (सा.यु.पू. २७–सा.यु. १४)

तिबिर्य कैसर (१४–३७ सा.यु.)

[चित्राचे श्रेय]

Musée de Normandie, Caen, France

ब्रिटिश संग्रहालयाच्या सौजन्याने फोटो घेण्यात आले आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा