वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ११/१ पृ. २९
  • पूर्वी विरोध करणारा सत्य शिकतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पूर्वी विरोध करणारा सत्य शिकतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • प्राचीन काळातल्या थैल्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • येशूच्या लहान भावाकडून शिका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • तुमची एक स्थायी मागणी आहे का?
    आमची राज्य सेवा—१९९९
  • नियतकालिके राज्याची घोषणा करतात
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ११/१ पृ. २९

राज्य घोषकांचा वृत्तान्त

पूर्वी विरोध करणारा सत्य शिकतो

लायबेरीयात चाललेल्या यादवी युद्धांविषयी बातम्यांमध्ये बरेच काही सांगितले जाते. हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत आणि त्याहूनही अधिकांना तेथून हाकलण्यात आले. इतके असतानाही, प्रामाणिक अंतःकरणाचे लोक सत्याचा स्वीकार करीत आहेत; पुढील अनुभव ते दाखवून देतो.

वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच जेम्सचे शिक्षण लूथरन चर्चमध्ये झाले. चर्च पेपरचा संपादक झाल्यापासून त्याने यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध लेख लिहिण्यास सुरवात केली. खरे पाहता, तो यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकालाही अद्याप भेटला नव्हता.

काही काळानंतर, जेम्सने संपादकाचे काम सोडून दिले आणि तो एक हॉटेल चालवू लागला. एकदा, हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये तो बसला होता, तेव्हा दोन बहिणी त्याच्याबरोबर बोलायला आल्या. त्यांचा सभ्य पेहराव पाहून त्याने त्यांना आत यायला सांगितले. पण जेव्हा त्यांनी त्यांच्या येण्याचे कारण त्याला सांगितले तेव्हा तो म्हणाला, “मला आता बोलायला बिलकुल वेळ नाही.” या साक्षीदार बहिणींनी त्याला टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या नियतकालिकांची वर्गणी सादर केली तेव्हा त्यांना कटवण्यासाठी त्याने ती स्वीकारली. १२ महिने ही नियतकालिके त्याच्या घरी येऊ लागली; पण त्याने ती सर्वच्या सर्व न उघडताच एका प्लॅस्टीक बॅगेत घालून ठेवली.

यादवी युद्ध जेव्हा उग्र स्वरूप धारण करू लागले तेव्हा जेम्सने एका बॅगेत पैसे आणि मौल्यवान वस्तु भरून ठेवल्या, म्हणजे हल्ल्याचे काही चिन्ह दिसताच त्याला पळून जाता येऊ शकेल. एके सकाळी त्याच्या मागच्या दाराजवळच एक बॉम्बस्फोट झाला; त्याने लगबगीने आपली बॅग उचलली आणि जीव मुठीत धरून तेथून पळ काढला. हजारो नागरिकांबरोबर तोही निघाला; त्याला पुष्कळ चेकपॉईन्टस्‌ पार करावे लागणार होते. या चेकपॉईन्टवर निष्पाप नागरिकांना काही कारण नसताना लुटले जायचे, ठार मारले जायचे.

पहिल्याच चेकपॉईन्टवर जेम्सला काही प्रश्‍न विचारण्यात आले आणि त्याला त्याची बॅग उघडायला सांगितली. त्याने बॅग उघडली आणि आत पाहिले तर तो चकित झाला. त्याने ज्या बॅगेत त्याचे पैसे आणि मौल्यवान वस्तु ठेवल्या होत्या ती ही बॅग नव्हती; त्याच्या पोटात गोळाच उठला. त्याने टेहळणी बुरूज आणि सावध राहा! ही नियतकालिके ज्यात ठेवली होती तीच बॅग घाईघाईत उचलून आणली होती. सैनिकांनी जेव्हा ही नियतकालिके पाहिली व लेबलवरील त्याचे नाव वाचले तेव्हा ते त्याला म्हणाले: “बरं, तू यहोवाचा साक्षीदार आहेस. आम्हाला तुम्ही नकोय, आम्हाला माहीत आहे तुम्ही खोटं बोलत नाही.” बॅगेतून काही नियतकालिके काढून घेऊन सैनिकांनी जेम्सला पुढे जाऊ दिले.

असेच नऊ विविध चेकपॉईन्टवर झाले; सर्व कमांडर्सना वाटले की जेम्स यहोवाच्या साक्षीदारांपैकी आहे म्हणून त्यांनी त्याला काही न करता जाऊ दिले. आतापर्यंत जेम्सने जे काही पाहिले त्यावरून त्याला वाटू लागले की त्याने ती पैशाची बॅग आणली नाही हे बरेच झाले होते; नाहीतर, त्या पैशांसाठी त्याला नक्कीच ठार मारण्यात आले असते.

तो सर्वात शेवटच्या आणि भीतीदायक चेकपॉईन्टवर आला तेव्हा जमिनीवर पुष्कळ प्रेतं पाहून त्याला धस्स झाले. त्याने यहोवाचे नाव घेऊन प्रार्थना केली, की देवा, तू मला यातून वाचवलंस तर मी संपूर्ण आयुष्य तुझी सेवा करीन.

जेम्सने सैनिकांना त्याची बॅग उघडून दाखवली; लागलीच ते म्हणाले: “नाही, आपल्याला हे लोक नकोयत.” आणि त्याच्याकडे वळून ते म्हणाले: “तुमचा एक बांधव त्या टेकडीच्या पायथ्याशी राहतो. जा आणि त्याच्याबरोबर राहा.” यावेळेपर्यंत, जेम्सचे साक्षीदारांबद्दलचे मत पार बदलले होते. त्याने त्वरित त्या बांधवाची भेट घेतली आणि तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकालa या पुस्तकातून बायबल अभ्यासाची योजना करण्यात आली.

काही दिवसांनंतर, त्याला तेथे होणाऱ्‍या हल्ल्यांमुळे तेथून पळावे लागले. यावेळी, जेम्सने फक्‍त अनंतकाल जगू शकाल पुस्तक उराशी घट्ट धरून पळ काढला. साक्षीदारांपासून तो ११ महिन्यांपर्यंत दूर होता, आणि या सर्व वेळेत त्याने पाच वेळा या पुस्तकाचा अभ्यास केला. तो पुन्हा शहरात जाऊ शकला तेव्हा त्याने साक्षीदारांबरोबरचा त्याचा बायबल अभ्यास पुन्हा चालू केला व जलद प्रगती केली. काही काळातच त्याचा बाप्तिस्मा झाला; आज तो आपल्या आध्यात्मिक बांधवांबरोबर विश्‍वासूपणे सेवा करीत आहेत.

[तळटीपा]

a वॉच टावर बायबल ॲण्ड टॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा