वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १०/१५ पृ. ४-७
  • तुम्ही बायबलवर विश्‍वास ठेवू शकता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही बायबलवर विश्‍वास ठेवू शकता का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबल की परंपरा?
  • शास्त्रवचनांचे महत्त्व
  • बायबलनुसार जगल्याचे फायदे
  • नरकाविषयीचे सत्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • पुनरुत्थानावरील तुमचा विश्‍वास किती भक्कम आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • “ख्रिस्ती” धर्माचे बदललेले रूप देवाला मान्य आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १०/१५ पृ. ४-७

तुम्ही बायबलवर विश्‍वास ठेवू शकता का?

बायबलवर या आधुनिक जगातही विस्तृत प्रमाणात विश्‍वास केला जातो. जसे की, अमेरिकन लोकांच्या एका अलीकडील सर्वेत, ८० टक्के लोकांनी, बायबल हे देवाचे प्रेरित वचन आहे असा विश्‍वास असल्याचे कबूल केले. तुमच्या भागातील टक्केवारी कदाचित अधिक असेल अथवा नसेल; तुम्हाला वाटेल, की यांना चर्चमध्ये बायबल शिकवण्यात आले आहे. पण खरे तर त्यांना शिकवण्यात आलेले नाही. मृत्यूनंतर शिक्षा मिळते या शिकवणीचेच उदाहरण घ्या.

बायबलमध्ये कोठेही आपल्याला परगेटरीची किंवा धगधगत्या नरकाची शिकवण मिळते का? आज, ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक विद्वान याचे उत्तर नाही असे देतील. न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ असे म्हणतो: “परगेटरीचा कॅथलिक सिद्धान्त पवित्र शास्त्रवचनांवर नव्हे तर परंपरेवर आधारित आहे.” नरकाविषयी, अ डिक्शनरी ऑफ ख्रिश्‍चन थिऑलॉजी म्हणते: “न[वीन] क[रारात] कोठेही नरकाची शिकवण प्रारंभिक प्रचाराच्या शिकवणुकीचा एक भाग म्हणून आढळत नाही.”

खरे तर, चर्च ऑफ इंग्लंडच्या सिद्धान्त मंडळाने अलिकडेच, नरकाग्नीची एकूण शिकवण अस्वीकार करण्याची शिफारस ठळकपणे जाहीर केली. लिचफिल्ड कॅथड्रलचे धर्मगुरू डॉ. टॉम राईट म्हणतात, की नरकाविषयी भूतकाळातील कल्पनेमुळे “देव एका अक्राळविक्राळ राक्षसासारखा वाटतो आणि यामुळे अनेकांची मने होरपळून गेली आहेत.” मंडळाच्या एका अहवालाने नरकाविषयी असे म्हटले की ते “मुळीच अस्तित्वात” नाही.a तसेच, न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ कॅथलिक दृष्टिकोनाविषयी असे म्हणतो: “धर्मशास्त्र, नरकाच्या शिकवणीकडे देवापासून विभक्‍त असलेली शिकवण या कोनातून पाहतो.”

खरे तर, मृतांच्या स्थितीविषयी बायबलची शिकवण आणि परगेटरीची व नरकाग्नीची शिकवण यांत विरोधाभास आहे. बायबलनुसार, मृत बेशुद्ध असतात; त्यांना वेदना जाणवत नसतात. “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) बायबलमध्ये मृतांसाठी एक आशा आहे—भवितव्यात पुनरुत्थान. येशूचा मित्र लाजर याचे निधन झाले तेव्हा, येशूने त्याच्या मृत्यूची तुलना निद्रेसोबत केली. लाजरची बहीण मार्था हिने असे म्हणून बायबलमध्ये शिकवण्यात आलेली आशा प्रकट केली, की “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” लाजरला मरणातून उठवून येशूने मानवजातीसाठी असलेल्या आशेची खात्री दिली.—योहान ५:२८, २९; ११:११-१४, २४, ४४.

मानवामध्ये एक अमर आत्मा असतो जो शरीरापासून वेगळा असतो या शिकवणीचा उगम बायबलमध्ये नव्हे तर ग्रीक तत्त्वज्ञानातून आहे असे इतिहासकार दर्शवतात. न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ असे निरीक्षितो, की मानव एका भौतिक शरीराचा बनलेला आहे व त्याच्यामध्ये काहीतरी अशरीरी आहे असा विश्‍वास प्राचीन इब्री लोकांत नव्हता.

तोच विश्‍वकोश पुढे म्हणतो, की कॅथलिक विद्वानांनी अलिकडेच, “ठामपणे सांगितले आहे, की न[वा] क[रार] हेल्लनीस्टिक [ग्रीक] यांच्यानुसार आत्म्याच्या अमरत्वाची शिकवण देत नाही.” तो विश्‍वकोश शेवटी म्हणतो: “या समस्येवर मूलभूत तोडगा, तात्त्विक परिकल्पनांपेक्षा, पुनरुत्थानाच्या अलौकिक देणगीत मिळू शकतो.”

बायबल की परंपरा?

परंतु मग, बायबलमध्ये ज्या शिकवणी नाहीत त्या चर्च शिकवणींचा भाग कशा बनल्या? अनेक चर्चेस बायबलला आपला सर्वोच्च अधिकार मानतात. जसे की, अलीकडेच, पोप जॉन पॉल दुसरे यांनी, “विश्‍वासूंनी, शास्त्रवचने पूर्णपणे सत्य व आपल्या विश्‍वासाचा परम दर्जा आहेत असा विश्‍वास करावा” असे म्हटले. परंतु, हे सामान्यपणे स्वीकारले जाते, की आजच्या ख्रिस्ती धर्मजगताच्या शिकवणी पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांच्या शिकवणींशी जुळत नाहीत. बहुतेक चर्चेस हा बदल, चर्च सिद्धान्ताच्या संथ विकासाचा भाग आहेत असे समजतात. याशिवाय, कॅथलिक चर्चने हे मत धारण केले आहे, की चर्च परंपरेला शास्त्रवचनांइतकाच अधिकार आहे. न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ म्हणतो की चर्च, “परंपरेच्या व्यतिरिक्‍त केवळ शास्त्रवचनांच्याच आधारावर किंवा शास्त्रवचनांच्या व्यतिरिक्‍त केवळ परंपरेच्या आधारावर कोणताही सिद्धान्त मानत नाही.”

इतिहासानुसार, चर्चेसनी शास्त्रवचनीय शिकवणींऐवजी केवळ परंपरेवर आधारित शिकवणी दिल्या आहेत. खरे तर, बायबलच्या शिकवणी खोट्या आहेत असे आता अनेक चर्चेस मानतात. जसे की, न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ म्हणतो, की “बायबलमधील पुष्कळ विधानांची, विज्ञान आणि इतिहास यांच्या आधुनिक ज्ञानानुसार परीक्षा केल्यास असे दिसून येईल की ती खरी नाहीत.” मृत लोक बेशुद्धावस्थेत आहेत या बायबलमधील शिकवणीविषयी तो असे म्हणतो: “धार्मिक गोष्टींमध्येही, जु[ना] क[रार] . . . मृत्त्योप्रांत जीवनाबाबत अर्धवट माहिती देतो.” याचे उदाहरण म्हणून तो स्तोत्र ६:५ चा (काही बायबलमध्ये वचन ६) उल्लेख करतो; त्यात असे म्हटले आहे: “मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही; अधोलोकात [किंवा हेडीजमध्ये] तुझे उपकारस्मरण कोण करणार?” काही प्रोटेस्टंट चर्चासत्र आणि सुवार्तिकांचे कॉलेज, बायबल अचूक आहे असे आता शिकवत नाहीत. दुसऱ्‍या बाजूला पाहता, बायबलमध्ये जे शिकवण्यात आले आहे त्याचे स्पष्टीकरण आपल्याजवळ असलेल्या अधिकाराद्वारे आपण देतो असे कॅथलिक चर्चला वाटत आहे. परंतु तुम्ही विचार कराल, की “ही स्पष्टीकरणे शास्त्रवचनांच्या विरोधात असल्यास काय?”

शास्त्रवचनांचे महत्त्व

येशूने वारंवार शास्त्रवचनांना विश्‍वासार्ह म्हणून उद्धृत केले आहे; बहुतेकदा, “असा शास्त्रलेख आहे” या शब्दांत त्याने आपला मुद्दा स्पष्ट केला. (मत्तय ४:४, ७, १०; लूक १९:४६) येशू जेव्हा मनुष्याच्या वैवाहिक स्थितीविषयी बोलला तेव्हा त्याने, ग्रीक तात्त्विक अनुमानाऐवजी, निर्मितीविषयी उत्पत्तीच्या अहवालाकडे लक्ष आकर्षित केले. (उत्पत्ति १:२७; २:२४; मत्तय १९:३-९) स्पष्टतः, येशूने शास्त्रवचनांना ईश्‍वरप्रेरित व वास्तविक समजले. देवाला प्रार्थना करताना तो म्हणाला: “तुझे वचन हेच सत्य आहे.”—योहान १७:१७.b

येशूने आपल्या दिवसातील धार्मिक पुढाऱ्‍यांची केलेली खरडपट्टी बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आली आहे: “तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे! . . . अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता.” (मार्क ७:६-१३) तसेच, प्रेषित पौलानेही ग्रीक तत्त्वज्ञानाची किंवा चुकीच्या परंपरांची आपल्या शिकवणीत भेसळ होऊ न देण्याच्या दबावाचा प्रतिकार केला. त्याने अशाप्रकारे इशारा दिला: “माणसांच्या संप्रदायाप्रमाणे . . . असलेले तत्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्‍यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.” (कलस्सैकर २:८; १ करिंथकर १:२२, २३; २:१-१३) पौलाने ख्रिश्‍चनांना काही संप्रदाय किंवा शिकवणी पाळण्यास आर्जवले खरे, परंतु ते सर्व शास्त्रवचनांवर आधारित होते व पूर्णपणे त्याच्याच सुसंगतेत होते. (२ थेस्सलनीकाकर २:१३-१५) पौलाने लिहिले: ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्‍वरप्रेरित आणि उपयोगी आहे.’ “ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” (तिरपे वळण आमचे.)—२ तीमथ्य ३:१६, १७.

भविष्यात लोक शास्त्रवचनांपासून बहकतील हे पौलाने आधीच ताडले. त्याने तीमथ्याला इशारा दिला: “ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, . . . ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, . . . अशी वेळ येईल.” त्याने तीमथ्याला आर्जवले: “तू तर सर्व गोष्टींविषयी सावध ऐस.” (२ तीमथ्य ४:३-५) ते कसे? एक मार्ग आहे “मोठ्या मनाचे” होण्याद्वारे. एक ग्रीक डिक्शनरी या बायबल शब्दाची परिभाषा: “काहीतरी शिकून घेण्याची स्वेच्छा व समानतेने त्याचे मूल्यमापन करणे,” अशाप्रकारे करते. लूकने या अभिव्यक्‍तीचा उपयोग, बिरुयातील पहिल्या शतकातील पौलाच्या श्रोत्यांचे वर्णन करण्याकरता केला. पौलाच्या शिकवणी त्यांच्यासाठी नवीनच होत्या, पण त्यांना स्वतःची फसवणूक करून घ्यायची नव्हती. त्यांची प्रशंसा करीत लूकने लिहिले: “तेथील लोक [बिरुयाचे लोक] थेस्सलनीकांतल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्‍या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.” बिरुयातील लोकांचे मन मोठे असले तरी, ते शंकेखोर किंवा सांगेल त्यावर विश्‍वास ठेवणारे नव्हते. उलट, त्यांच्या प्रांजळ विचारणेमुळे “त्यांतील अनेकांनी . . . विश्‍वास ठेवला.”—प्रेषितांची कृत्ये १७:११, १२.

बायबलनुसार जगल्याचे फायदे

प्रारंभिक ख्रिस्ती, बायबलचे पालन करण्याकरता व आत्म-बलिदानी प्रीतीसाठी नावाजलेले होते. परंतु आज अनेक लोक “सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य” नाकारणारे आहेत. (२ तीमथ्य ३:५) आज मूळ ख्रिस्ती धर्माच्या अनुरोधात नसलेल्या कोणत्याही प्रकारच्या ख्रिस्ती धर्मात, लोकांच्या भल्यासाठी त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याची खरी शक्‍ती असू शकत नाही. यावरून तुम्हाला, अधिकतर ख्रिस्ती धर्मजगतात वाढती हिंसा, अनैतिकता, कुटुंबांचे विघटन आणि भौतिकवाद का दिसून येतो हे समजेल का? काही “ख्रिश्‍चन” म्हणवणाऱ्‍या राष्ट्रांत, एकाच धर्माचे सदस्य असलेल्यांमध्ये क्रूर वांशिक युद्धे होत आहेत.

बिरुयातील लोकांचे होते तसे मोठे मन नाहीसे झाले आहे का? बायबलमध्ये विश्‍वास करणाऱ्‍या व त्यानुसार आपले जीवन व्यतीत करणाऱ्‍या लोकांचा एखादा गट आज अस्तित्वात आहे का?

एन्सायक्लोपिडिआ कॅनडायना असे निरीक्षण करतो: “यहोवाच्या साक्षीदारांचे कार्य हे, आपल्या शकाच्या पहिल्या आणि दुसऱ्‍या शतकादरम्यान येशू आणि त्याच्या शिष्यांनी जो प्राचीन ख्रिस्ती धर्म पाळला त्याचे पुनरूज्जीवन व पुनःस्थापना आहे.” साक्षीदारांचा उल्लेख करीत न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिआ म्हणतो: “ते बायबलला आपल्या विश्‍वासाचा एकमात्र उगम व वर्तनाचा नियम समजतात.”

याच एका प्रमुख कारणासाठी यहोवाचे साक्षीदार संपूर्ण जगभरात त्यांची आध्यात्मिक समृद्धता, शांतता व आनंद यासाठी नावाजलेले का आहेत यात काहीच संशय नाही. यास्तव, आम्ही आमच्या वाचकांना बायबलमधील आध्यात्मिक हितकारक शिकवणींविषयी अधिक शिकून घेण्याचे उत्तेजन देत आहोत. अधिक ज्ञान घेतल्याने बायबलवर भरवसा अधिक वाढतो व देवावरील विश्‍वास आणखी भक्कम होतो. अशा विश्‍वासाचे चिरकालिक फायदे, केलेल्या प्रयत्नांचे उचित फळ आहे.

[तळटीपा]

a नॅशनल पब्लिक रेडिओ—“मॉर्निंग एडिशन”

b बायबलच्या विश्‍वसनीयतेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, वॉच टावर संस्थेने छापलेले सर्व लोकांसाठी असलेले पुस्तक नामक माहितीपत्रक पाहा.

[६ पानांवरील चित्र]

प्रेषित पौलाने व इतरांनी बाजारात प्रचार केला

[७ पानांवरील चित्र]

यहोवाचे साक्षीदार “बायबलला आपल्या विश्‍वासाचा एकमात्र उगम व वर्तनाचा नियम समजतात”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा