वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १०/१ पृ. ३-४
  • “सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्ती आत्म्याने व सत्याने उपासना करतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • देवाबद्दल तुम्हाला कितपत माहीत आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • सत्याचा शोध का घ्यावा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • सत्याच्या देवाचे अनुकरण करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १०/१ पृ. ३-४

“सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील”

“तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील.” जेरूसलेमच्या मंदिरातील लोकांना शिकवताना येशूने असे म्हटले होते. (योहान ८:३२) येशूची शिकवण सत्य असल्याचे त्याच्या प्रेषितांना लगेच कळून आले. आपल्या शिक्षकाचा उगम ईश्‍वरी असल्याचे अनेक पुरावे त्यांनी पाहिले होते.

पणआज काही लोकांना येशूने सांगितलेले सत्य ओळखण्यास कदाचित कठीण जाईल. यशयाच्या काळातील लोकांप्रमाणे आजच्या लोकांची स्थिती आहे “जे वाईटाला बरे व बऱ्‍याला वाईट म्हणतात, जे प्रकाशाला अंधकार व अंधकाराला प्रकाश समजतात, गोड ते कडू व कडू ते गोड मानितात.” (यशया ५:२०) आज विविध मतप्रसार, तत्त्वज्ञान आणि जीवनशैलींना बढावा दिला जातो आणि सर्वकाही चालते तसेच सत्य नावाची अशी कोणतीच गोष्ट नाही, असे पुष्कळ लोकांना वाटते.

सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील, असे येशूने लोकांना म्हटले तेव्हा त्यांनी असे म्हणून आपली प्रतिक्रिया व्यक्‍त केली: “आम्ही अब्राहामाचे वंशज आहो व कधीहि कोणाच्या दास्यात नव्हतो; तर तुम्ही बंधमुक्‍त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता?” (योहान ८:३३) आपल्याला एखाद्या व्यक्‍तीने अथवा गोष्टीने बंधमुक्‍त करण्याची आवश्‍यकता आहे, असे त्यांना वाटले नाही. पण त्यानंतर येशूने स्पष्ट केले: “मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करितो तो पापाचा दास आहे.” (योहान ८:३४) पापापासून मुक्‍तता मिळेल अशा सत्याविषयी येशू बोलत होता. येशूने म्हटले: “जर पुत्र तुम्हाला बंधमुक्‍त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्‍त व्हाल.” (योहान ८:३६) यास्तव, लोकांना बंधमुक्‍त करणारे सत्य येशू ख्रिस्ताविषयीचे अर्थात देवाच्या पुत्राविषयीचे सत्य आहे. येशूच्या परिपूर्ण मानवी जीवनाच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवल्यानेच एखादी व्यक्‍ती पापापासून आणि मृत्यूपासून बंधमुक्‍त होऊ शकते.

दुसऱ्‍या एका प्रसंगी येशूने म्हटले: “तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहान १७:१७) देवाच्या वचनाला बायबलमध्ये असे सत्य संबोधले आहे ज्यामुळे अंधश्रद्धेपासून आणि खोट्या उपासनेपासून मुक्‍तता होऊ शकते. येशू ख्रिस्ताविषयीचे सत्य बायबलमध्ये आढळते. या सत्यामुळे लोक त्याच्यावर विश्‍वास ठेवतात आणि त्यांना जीवनात भविष्याबद्दल उज्ज्वल आशाही प्राप्त होते. देवाच्या वचनाचे सत्य जाणणे ही किती उत्तम गोष्ट!

सत्य जाणणे किती महत्त्वाचे आहे? आजच्या काळातील अनेक धर्म बायबलनुसार चालत असल्याचा दावा करतात खरा, पण प्रत्यक्षात मात्र मानवी तत्त्वज्ञान आणि परंपरांनी त्यांना ग्रासून टाकले आहे. बहुतेक वेळा असे दिसून येते, की धार्मिक पुढारी त्यांच्या संदेशातील अचूकतेला इतके महत्त्व देत नाहीत, तर लोकांची मने कशी जिंकायची याचीच त्यांना जास्त चिंता लागलेली असते. जोपर्यंत आपण निष्कपटतेने देवाची उपासना करतो तोपर्यंत देव आपल्या उपासनेविषयी समाधानी असतो, असे काहींना वाटते. परंतु येशू ख्रिस्ताने स्पष्ट केले: “खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे.”—योहान ४:२३.

आपल्या उपासनेचा देवाने स्वीकार करावा, असे आपल्याला वाटत असल्यास सत्य जाणून घेणे आपल्याकरता अगत्याचे आहे. हा एक महत्त्वाचा विषय आहे. आपला सार्वकालिक आनंद यावरच आधारलेला आहे. यास्तव, प्रत्येकाने स्वतःला विचारण्यास हवे: ‘उपासना करण्याची माझी पद्धत देवाला मान्य आहे का? देवाच्या वचनाचे सत्य जाणून घेण्यात मला खरोखरच रस आहे का? किंवा सूक्ष्म परीक्षणानंतर मिळणाऱ्‍या परिणामांमुळे मी धास्तावणार तर नाही ना?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा