आफ्रिकी संस्कृतीतील-वधूमूल्य
बायबल काळात होते त्याप्रमाणेच आजही काही संस्कृतींमध्ये पुरुषाला स्त्रीबरोबर विवाह करण्याआधी वधूमूल्य द्यावे लागते. “आपली धाकटी मुलगी राहेल हिजसाठी मी सात वर्षे आपली चाकरी करीन,” असे याकोब आपला भावी सासरा लाबान यांस म्हणाला होता. (उत्पत्ति २९:१८) याकोबाचे राहेलीवर अत्यंत प्रेम असल्यामुळे त्याने फारच मोठी किंमत दिली—सात वर्षांच्या वेतनाच्या बरोबरीची किंमत! लाबानाने हा प्रस्ताव मान्य केला पण त्याने याकोबाला फसवले; आपली मोठी मुलगी लेआ हिच्याबरोबर त्याचा विवाह लावून दिला. यानंतरही लाबान याकोबाबरोबर चालूपणे वागला. (उत्पत्ति ३१:४१) भौतिक प्राप्तीसाठी लाबानाची हाव पाहून त्याच्या दोन्ही मुलींच्या मनातूनच तो उतरला. त्यांनी विचारले: “त्याच्या दृष्टीने आम्ही परक्याच की नाही? त्याने तर आम्हास विकून टाकिले आहे. आणि आमचे धनहि खाऊन टाकिले आहे.”—उत्पत्ति ३१:१५.
दुःखाची गोष्ट म्हणजे आजच्या भौतिकवादी जगात अनेक पालक लाबानासारखेच आहेत. काही तर याहूनही बेकार आहेत. एका आफ्रिकन बातमीपत्रानुसार, काही विवाहांची बोलणी फक्त, “हावरट बापांना भरमसाट फायदा करून घ्यायचा असतो म्हणून केली जाते.” दुसरे कारण आहे आर्थिक दबाव, जो अनेक पालकांना आपल्या मुलींकडे, आर्थिक विघ्न दूर करणाऱ्या हर्ता या नात्याने पाहण्यास प्रलोभित करतो.a
काही पालकांना सर्वात जास्त रक्कम हवी असते म्हणून ते आपल्या मुलींचे विवाह लवकर लावत नाहीत. यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. पूर्व आफ्रिकेतील एका बातमीपत्राच्या वार्ताहराने लिहिले: “सासरच्या हट्टी लोकांनी मागितलेला प्रचंड हुंडा चुकवण्याकरता तरुण लोक पळून जाण्याचा मार्ग निवडतात.” मोठे वधूमूल्य मागितल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांपैकी एक समस्या आहे लैंगिक अनैतिकता. शिवाय, काही तरुण पुरुष कसेबसे एक बायको विकत घेतात आणि त्यानंतर मग कर्जात बुडून जातात. एका दक्षिण आफ्रिकन स्वयंसेवकाने म्हटले: “पालकांनी विचारी असले पाहिजे. त्यांनी भरमसाठ पैशाची मागणी करू नये. नवविवाहित दांपत्याला आता संसार मांडायचा असतो. . . . तेव्हा तरुण पुरुषाला कर्जबाजाराच्या जंजाळात कशाला ढकलायचं?”
वधू-किंमत देण्याबाबत किंवा घेण्याबाबत होणाऱ्या बोलणीदरम्यान ख्रिस्ती पालक समंजसपणाचे उदाहरण कसे मांडू शकतात? ही एक गंभीर बाब आहे कारण बायबल अशी आज्ञा देते: “तुमची सहनशीलता [समंजसपणा] सर्वांना कळून येवो.”—फिलिप्पैकर ४:५.
वाजवी बायबल तत्त्वे
ख्रिस्ती पालक वधूमूल्याची बोलणी करू इच्छितात की नाही हा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते करू इच्छित असल्यास, ती बायबल तत्त्वांच्या सुसंगतेत झाली पाहिजे. देवाचे वचन म्हणते: “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी.” (इब्री लोकांस १३:५) विवाहाची बोलणी करताना हे तत्त्व दिसत नसल्यास एक ख्रिस्ती पालक हे सिद्ध करील, की तो एक चांगले उदाहरण मांडत नाही. ख्रिस्ती मंडळीत जबाबदार पदी असलेल्या पुरुषांनी ‘समंजस’ व ‘द्रव्यलोभ न धरणारे’ असावे; त्यांनी “अनीतिने पैसा मिळविणारे” नसावे. (१ तीमथ्य ३:३, ८) हावरटपणे व अपश्चातापीपणे मोठे वधूमूल्य घेणाऱ्या ख्रिश्चनाला कदाचित मंडळीतून बहिष्कृतही केले जाऊ शकते.—१ करिंथकर ५:११, १३; ६:९, १०.
लोभापायी उद्भवणाऱ्या समस्यांमुळे काही सरकारांनी, आपल्या नागरिकांचे शोषण रोखण्याकरता काही नियम घालून दिले आहेत. उदाहरणार्थ भारतामध्ये हुंडा मिळण्याकरता बोलणी करणे अथवा हुंडा घेणे बेकायदेशीर तर आहेच शिवाय त्यासाठी कायद्यानुसार शिक्षा देखील होऊ शकते. भारतातील ख्रिस्ती या नियमांचे पालन करतात. पश्चिम आफ्रिकेतील टोगो राष्ट्रात एक असा नियम आहे, की वधूमूल्य “वस्तूंच्या रूपाने किंवा रोख पैशाच्या रूपाने अथवा दोन्ही पद्धतीने देता येऊ शकते.” नियमात पुढे म्हटले आहे: “परंतु, कोणत्याही बाबतीत ती रक्कम १०,००० एफ सीएफए (८०० रुपये) याच्यापलिकडे जाता कामा नये.” ख्रिश्चनांनी कायदा पाळणारे नागरिक असावे असे बायबल त्यांना वारंवार आज्ञापिते. (तीत ३:१) सरकार असा नियम पाळण्याची सक्ती करीत नसले तरी, खरा ख्रिश्चन त्याचे पालन करील. अशाप्रकारे देवासमोर त्याचा विवेक शुद्ध राहील आणि इतरांना तो अडखळणाचे कारण बनणार नाही.—रोमकर १३:१, ५; १ करिंथकर १०:३२, ३३.
Subheading is not for in vernacular
काही संस्कृतींमध्ये वधूमूल्याची बोलणी ज्यापद्धतीने केली जाते ती पद्धत आणखी एका महत्त्वपूर्ण तत्त्वाच्या विरोधात असेल. बायबलनुसार, पिता आपल्या घराण्यासंबंधीच्या बाबींसाठी जबाबदार आहे. (१ करिंथकर ११:३; कलस्सैकर ३:१८, २०) यास्तव, मंडळीत जबाबदार पदी असलेल्या पुरुषांनी “आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे” असावे.—१ तीमथ्य ३:१२.
परंतु कदाचित एखाद्या संस्कृतीत विवाहाची महत्त्वपूर्ण बोलणी कुटुंब प्रमुखाच्या नातेवाईकांनी करावी अशी रीत असेल. आणि मग हे नातेवाईक वधूमूल्याचा एक हिस्सा मागतात. यामुळे ख्रिस्ती घराणे कसोटीस उतरू शकते. चालीरीतींच्या नावाखाली काही कुटुंब प्रमुख सत्यात नसलेल्या आपल्या नातेवाईकांना मोठे वधूमूल्य वसूल करण्यास अनुमती देतात. यामुळे काहीवेळा असे घडले आहे, की ख्रिस्ती मुलगी सत्यात नसलेल्याबरोबर विवाह करते. आणि हे तर, “केवळ प्रभूमध्ये” विवाह करावा या ख्रिश्चनांना दिलेल्या सल्ल्याच्या अगदीच विरुद्ध आहे. (१ करिंथकर ७:३९) जो कुटुंब प्रमुख सत्यात नसलेल्या नातेवाईकांना आपल्या मुलांच्या आध्यात्मिक कल्याणाला घातक ठरणारे निर्णय घेऊ देतो त्याला “आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा,” असे म्हणता येणार नाही.—१ तीमथ्य ३:४.
देवभीरू कुलपिता अब्राहाम याच्या बाबतीत झाले त्याप्रमाणे, ख्रिश्चन पिता आपल्या मुलांच्या विवाहाबद्दलच्या बोलणीत प्रत्यक्ष भाग घेत नसल्यास काय? (उत्पत्ति २४:२-४) बोलणी करण्यास कोणा दुसऱ्याची नेमणूक करण्यात आलेली असेल तर, बोलणी करणारा बायबलमधील वाजवी तत्त्वांच्या सुसंगतेत असलेल्या सूचनांचे पालन करतो आहे याची खात्री ख्रिस्ती पित्याने करावी. याशिवाय, वधूमूल्याची बोलणी करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्याआधी ख्रिस्ती पालकांनी काळजीपूर्वक विचार करावा आणि अवाजवी चालीरीती किंवा मागण्या यांच्या आहारी जाऊ नये.—नीतिसूत्रे २२:३.
अख्रिस्ती लक्षणे टाळणे
गर्व आणि एखाद्याच्या “संसाराविषयीची फुशारकी” यांचे बायबल खंडन करते. (१ योहान २:१६; नीतिसूत्रे २१:४) तरीसुद्धा, ख्रिस्ती मंडळीतील काहींनी त्यांच्या विवाहाच्या बोलणीत अशाप्रकारची लक्षणे दाखवली आहेत. काही जण मोठे वधूमूल्य देताना किंवा घेताना भाव मारतात; याद्वारे ते जगाचे अनुकरण करतात. दुसऱ्या बाजूला पाहता, आफ्रिकेतील वॉच टावर संस्थेच्या एका शाखा कार्यालयाने असा अहवाल दिला: “सासरकडच्या लोकांनी वाजवी मागण्या केल्या तेव्हा काही पतींनी त्यांच्या या निवडीचा आदर केला नाही; आपल्या पत्नींना, एका ‘बकरीच्या’ किंमतीला विकत घेतल्याप्रमाणे त्यांना वाटते.”
काही ख्रिश्चनांवर मोठ्या वधूमूल्याबद्दलच्या लोभाचा परिणाम झाला आहे आणि यामुळे त्यांना कडू फळे चाखावी लागली आहेत. जसे की, वॉच टावर संस्थेच्या दुसऱ्या एका शाखा कार्यालयाकडून आलेल्या या अहवालाचा विचार करा: “बांधवांना विवाह करणे किंवा भगिनींना विवाह सोबती मिळणे जरा कठीणच आहे. परिणामतः, लैंगिक अनैतिकतेमुळे बहिष्कृत होणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. काही बांधव सोन्याच्या किंवा हिऱ्यांच्या शोधात खाणीत जातात जेणेकरून जे मिळेल ते विकून विवाहाकरता त्यांना भरपूर पैसा मिळू शकेल. यासाठी त्यांना सहसा एक, दोन किंवा याहूनही अधिक वर्षे लागू शकतात; आणि बंधूजनांच्या व मंडळीच्या सहवासापासून दूर गेल्यामुळे ते सहसा आध्यात्मिकरीत्या अशक्त होतात.”
हे दुःखद परिणाम टाळण्याकरता, ख्रिस्ती पालकांनी मंडळीतील प्रौढ जनांच्या उदाहरणाचे अनुकरण करणे उचित आहे. प्रेषित पौल लेकुरवाळा नव्हता तरी सहविश्वासूंबरोबरचा त्याचा व्यवहार अगदी चोख होता. इतरांवर महागडे ओझे लादण्याच्या बाबतीत तो सावध होता. (प्रेषितांची कृत्ये २०:३३) निश्चितच मग ख्रिस्ती पालकांनी वधूमूल्याची बोलणी करण्याआधी त्याच्या निस्वार्थी उदाहरणाचा विचार करावा. खरे तर पौलाला असे लिहावयाची प्रेरणा मिळाली: “बंधूंनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकारी व्हा, आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.”—फिलिप्पैकर ३:१७.
समंजस राहिल्याची उदाहरणे
विवाहाच्या बोलणीबाबत अनेक ख्रिस्ती पालकांनी वाजवी राहून उत्तम उदाहरण मांडले आहे. पूर्ण वेळेचे सुवार्तिक या नात्याने कार्य करणारे जोझफ आणि त्यांची पत्नी मे यांचे उदाहरण घ्या.b ते सॉलमन बेटांवरील एका द्वीपावर राहतात; तेथे काहीवेळा वधूमूल्याच्या बोलणीबाबत समस्या उद्भवते. अशा समस्या टाळण्याकरता, जोझफ आणि मे यांनी जवळच्या द्वीपावर आपली मुलगी हेलन हिचा विवाह करण्याचे ठरवले. एस्तेर नामक त्यांच्या आणखी एका मुलीच्या बाबतीतही त्यांनी असेच केले. जोझफ यांनी आपला जावई पिटर याच्याकडून, त्यांना वाजवीपणे स्वीकारता येत होते त्यापेक्षा कमी वधूमूल्य स्वीकारले. त्यांनी असे का केले असे त्यांना विचारल्यावर जोझफ म्हणाले: “पायनियर असलेल्या माझ्या जावयावर मला ओझं लादायचं नव्हतं.”
आफ्रिका येथील अनेक यहोवाच्या साक्षीदारांनी देखील वाजवी राहून उत्तम उदाहरण मांडले आहे. काही भागात, विस्तृत कुटुंबातील सदस्य सामान्यपणे, वधूमूल्याची बोलणी करण्याच्या आधीच मोठ्या रक्कमेची अपेक्षा करतात. वधू मिळवण्याकरता, वराकडून असे अपेक्षिले जाते, की तो भविष्यात, त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या धाकट्या भावासाठी लागणारे वधूमूल्य देईन असे वचन त्याने द्यावे.
पण याच्या अगदी उलट, कोसी आणि त्याची पत्नी मारा यांच्या उदाहरणाचा विचार करा. अलीकडेच त्यांची मुलगी बेबोको हिचा यहोवाच्या साक्षीदारांच्या एका प्रवासी पर्यवेक्षकाबरोबर विवाह झाला. विवाहाआधी नातेवाईकांनी, मोठ्या वधूमूल्यात आपला हिस्सा द्यावा असा पालकांवर दबाव आणला. परंतु, पालक दृढ राहिले आणि त्यांनी त्यांच्या मागण्या धुडकावून लावल्या. त्यांनी थेट जावयाशी बोलणी केली; आपल्या मुलीसाठी त्यांनी फारच कमी वधूमूल्य मागितले आणि त्यातील अर्धी रक्कम त्यांनी या नवीन जोडप्यालाच वापस केली जेणेकरून ते त्याचा उपयोग आपल्या विवाहासाठी करू शकतील.
त्याच राष्ट्रातील आणखी एक उदाहरण आहे एका तरूण साक्षीदार बहिणीचे जिचे नाव आहे ईटॉन्गो. सुरवातीला तिच्या कुटुंबाने माफक वधूमूल्य मागितले. पण मग नंतर, रक्कम वाढवावी अशी तिच्या नातेवाईकांनी मागणी केली. वातावरण अगदी तंग होते; असे वाटत होते, की नातेवाईक ही रक्कम वसूल केल्याशिवाय राहणार नाहीत. ईटॉन्गो स्वभावाने लाजाळू होती तरी ती उभी राहिली आणि तिने अगदी आदरपूर्वक सांगितले, की आपण ठरलेल्या अटींप्रमाणे सॅन्झे नामक एका आवेशी ख्रिश्चनाबरोबरच विवाह करणार. आणि पूर्ण धाडसाने म्हणाली: “म्बी के” (म्हणजे, “सर्व काही ठरलं आहे,”) आणि खाली बसली. तिची ख्रिस्ती आई, सॅम्बेको हिने तिची बाजू घेतली. यावर पुढे चर्चा झाली नाही आणि आधी ठरल्याप्रमाणेच या जोडप्याचा विवाह झाला.
वधूमूल्याच्या व्यक्तिगत लाभापेक्षा प्रेमळ ख्रिस्ती पालकांना इतर अनेक गोष्टींची चिंता असते. कॅमेरून येथील एका पतीने म्हटले: “माझी सासू संधी मिळेल तेव्हा मला सांगत असते, की मला तिला वधूमूल्य म्हणून काहीही द्यावेसे वाटत असेल तर ते तिला देण्याऐवजी तिच्या मुलीच्या भौतिक गरजांसाठी मी खर्च करावे.” प्रेमळ पालकांना आपल्या मुलांच्या आध्यात्मिक कल्याणाची देखील काळजी असते. जसे की, झिम्बाब्वे येथे राहणाऱ्या फराय आणि रूडोचे उदाहरण घ्या; ते देव राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याच्या कार्यात आपला बहुतेक वेळ खर्च करतात. कमावते नसताना देखील त्यांनी, खरे वधूमूल्य जितके असते त्यापेक्षा खूप कमी किंमत घेऊन आपल्या दोन्ही मुलींचा विवाह केला. त्यांनी असे का केले? त्यांची इच्छा होती, की यहोवावर खऱ्या मनाने प्रेम करणाऱ्या मुलांबरोबर विवाह करून आपल्या मुलींनी सुखात रहावे. ते म्हणाले, “आम्ही आमच्या दोन्ही मुलींच्या आणि जावयांच्या आध्यात्मिकतेला जास्त महत्त्व दिले.” किती छान! आपल्या विवाहित मुलांच्या आध्यात्मिक व भौतिक कल्याणाची प्रेमळ काळजी घेणारे सासुसासरे प्रशंसेस पात्र आहेत.
वाजवी राहिल्याचे लाभ
सॉलमन द्वीपांवरील जोझफ आणि मे यांनी आपल्या मुलींचा विवाह उदारपणे व काळजीपूर्वक केल्याबद्दल त्यांना आशीर्वाद मिळाला. यामुळे त्यांच्या जावयांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे पडले नाही. उलट दोन्ही जोडपी राज्य संदेशाचा प्रचार करण्याच्या पूर्ण वेळेच्या कार्यात अनेक वर्षे सेवा करू शकले आहेत. मागील गोष्टींचा विचार करीत जोझफ म्हणतात: “मी आणि माझ्या कुटुंबानं घेतलेल्या निर्णयांमुळे आम्हाला समृद्ध आशीर्वाद लाभले आहेत. ज्यांना कळत नव्हतं त्यांनी आमच्यावर काहीवेळा पुष्कळ दबाव आणला हे खरं, पण आता मी माझ्या मुलांना यहोवाच्या सेवेत मग्न व दृढ असलेले पाहतो तेव्हा माझा विवेक शुद्ध आहे असं मला वाटतं शिवाय समाधानही होतं. ते तर आनंदी आहेतच, आणि आम्ही पतीपत्नी देखील जास्तच आनंदी आहोत.”
आणखी एक लाभ म्हणजे, सासूसासऱ्यांबरोबरचा चांगला नातेसंबंध. उदाहरणार्थ, झोन्डी आणि सिबूसीसो आपापल्या पत्नींबरोबर वॉच टावर सोसायटीच्या शाखा कार्यालयात स्वयंसेवक म्हणून कार्य करतात; त्यांच्या पत्नी सख्या बहिणी आहेत. डकारी नामक त्यांचे सासरेबुवा पूर्ण वेळेचे सुवार्तिक असल्यामुळे त्यांनाही पगार मिळत नाही. वधूमूल्याच्या बोलणीदरम्यान ते म्हणाले, की आम्ही त्यांना जे काही देऊ त्यावर ते समाधानी राहतील. झोन्डी आणि सिबूसीसो म्हणतात: “आमचे आमच्या सासरेबुवांवर फार प्रेम आहे; त्यांना जेव्हा जेव्हा आमची गरज हवी होती तेव्हा तेव्हा आम्ही पुढे सरसावलो.”
होय, वधूमूल्यात वाजवी राहिल्यामुळे कुटुंबाला आनंद लाभतो. जसे की, त्यामुळे नवविवाहितांना कर्जाच्या जंजाळात अडकून बसण्यापेक्षा आपल्या वैवाहिक जीवनात स्वतःला जुळवून घेण्यास सोपे जाते. यामुळे अनेक तरुण जोडपी, प्रचार आणि शिष्य बनवण्याचे निकडीचे कार्य पूर्ण वेळ करून आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त करू शकले आहेत. याबदल्यात विवाहाचा मूळ स्थापक यहोवा देवाचे गौरव होते.—मत्तय २४:२४; २८:१९, २०.
[तळटीपा]
a काही संस्कृतींमध्ये परिस्थिती उलट आहे. वराकडचे लोक वधूच्या पालकांकडून हुंड्याची अपेक्षा करतात.
b या लेखातील नावे बदलण्यात आली आहेत.
[२७ पानांवरील चौकट]
त्यांनी वधूमूल्य मागे दिले
काही संस्कृतींमध्ये, वधू आणि तिच्या पालकांनी वधूमूल्य कमी दिल्यास त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिले जाते. यासाठी काहीवेळा गर्व आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे प्रदर्शन करणे हा, मोठे वधूमूल्य मागण्यामागचा हेतू असतो. नायजेरियातील लागोसमधील कुटुंब एक उत्तेजक फरक दाखवते. त्यांचा जावई डेल म्हणतो:
“माझ्या पत्नीच्या कुटुंबाने मला, महागडा कपडालत्ता खरेदी करण्यासारख्या पारंपरिक वधूमूल्याच्या सोहळ्याशी निगडीत असलेल्या खर्चापासून खूपच वाचवले. माझ्या घरच्यांनी त्यांना वधूमूल्य देऊ केले तेव्हा त्यांच्या प्रवक्त्याने आम्हाला विचारले: ‘तुम्हाला ही मुलगी पत्नी म्हणून हवी आहे की मुलगी म्हणून?’ आम्ही सर्व एकाच वेळी म्हणालो: ‘आम्ही तिला मुलगी म्हणून घेऊ इच्छितोय.’ त्यानंतर आम्ही त्यांना ज्या पाकीटातून वधूमूल्य दिलं होतं ते आम्हाला तसच्यातसं पुन्हा देण्यात आलं.
“माझ्या सासूसासऱ्यांनी विवाहासंबंधीच्या बाबी ज्याप्रकारे हाताळल्या त्याची मी आज सुद्धा प्रशंसा करतो. यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटतो. त्यांच्या उत्तम आध्यात्मिक दृष्टिकोनामुळे मी त्यांना माझे अगदी जवळचे नातेवाईक समजू लागलो आहे. आणि माझ्या पत्नीकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टिकोनावरही त्याचा बराच प्रभाव पडला. तिच्या कुटुंबाने माझ्याबरोबर जो व्यवहार केला त्यामुळे मला तिच्याबद्दल गाढ आदर वाटू लागला आहे. एखाद्या गोष्टीवर आमच्यात दुमत झालेच तर त्याचे रुपांतर समस्येत होईपर्यंत मी थांबत नाही. ती ज्या कुटुंबातून आली आहे याची मी आठवण करतो तेव्हा आमच्यातील मतभेद कमी होतात.
“माझं आणि तिचं कुटुंब मित्रत्वाच्या बंधनानं पक्कं बनलं आहे. आमचं लग्न होऊन दोन वर्ष उलटली आहेत आणि अजूनही माझे वडील तिच्या कुटुंबाला बक्षीसं व खाण्याचे पदार्थ पाठवत असतात.”