वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ७/१ पृ. ३०-३१
  • शोमरोनी स्वतःला एक चांगला शेजारी शाबीत करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शोमरोनी स्वतःला एक चांगला शेजारी शाबीत करतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दयाळू शोमरोनी
  • आपल्यासाठी धडा
  • शेजारधर्माला जागणारा शोमरोनी
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
  • माझा शेजारी कोण?
    सावध राहा! माहितीपत्रक ६-३ (gbr6-3)
  • चांगल्या शोमरोन्याचा दाखला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • येशूची शिकवण्याची पद्धत
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ७/१ पृ. ३०-३१

त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले

शोमरोनी स्वतःला एक चांगला शेजारी शाबीत करतो

येशूच्या दिवसांत, यहुदी आणि विदेशी यांमधील घृणा अगदी स्पष्टपणे दिसून येई. कालांतराने, यहुद्यांच्या मिशनामध्ये इस्राएली स्त्रियांना गैरयहुदी स्त्रियांच्या बाळंतपणाच्या वेळी मदत करण्यास मनाई असलेला नियम जोडण्यात आला कारण असे केल्याने एक विदेशी मनुष्य या जगात आणण्यास मदत होणार होती.—अबोदा झारा २:१.

विदेशी लोकांच्या तुलनेत शोमरोनी लोकांचा धार्मिकरीत्या आणि वांशिकरीत्या यहुदी लोकांशी जवळचा नातेसंबंध होता. असे असले तरी त्यांना खालच्या जातीचे समजण्यात येत असे. प्रेषित योहानाने लिहिले: “यहुदी शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवीत नसतात.” (योहान ४:९) होय, तालमुदचे शिक्षण होते, की “शोमरोनी लोकांनी दिलेला भाकरीचा तुकडा डुकराच्या मांसापेक्षाही अशुद्ध आहे.” काही यहुदी लोक “शोमरोनी” हा शब्द तिटकारा करण्यासाठी किंवा तुच्छ लेखण्यासाठी वापरत.—योहान ८:४८.

या परिस्थितीला लक्षात घेता, यहुदी नियमशास्त्रामध्ये पंडित असलेल्या मनुष्याला येशूने सांगितलेल्या शब्दांवरून पुष्कळ काही शिकायला मिळते. हा इसम येशूकडे आला आणि त्याने विचारले: “गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” उत्तर देतेवेळी येशूने त्याला मोशेच्या नियमशास्त्राचे स्मरण करून दिले. त्या नियमशास्त्रात आज्ञा आहे: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्‍तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीति कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीति कर.” त्यानंतर त्या धर्मपंडिताने येशूला विचारले: “पण माझा शेजारी कोण?” (लूक १०:२५-२९; लेवीय १९:१८; अनुवाद ६:५) परुशी लोकांच्या मते “शेजारी” हा शब्द केवळ अशा लोकांकरता होता जे यहुदी चालीरीतींनुसार चालत—विदेशी आणि शोमरोनी लोकांकरता तो शब्द निश्‍चितच नव्हता. या दृष्टिकोनाचे येशू समर्थन करील असा विचार हा धर्मपंडित करत असल्यास येशूच्या उत्तराचे त्याला फार आश्‍चर्य वाटले असावे.

दयाळू शोमरोनी

येशूने त्या मनुष्याच्या प्रश्‍नाचे उत्तर एका दाखल्याद्वारे दिले.a त्याने म्हटले: “एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरीहोस जात” होता. यरुशलेम आणि यरीहो यांमधील अंतर सुमारे २३ किलोमीटर होते. या दोन्ही शहरांना जोडणारा रस्ता नागमोडी होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला टेकड्या होत्या. या कारणास्तव चोरांना लपण्यास आणि हल्ला करून नंतर पळून जाण्यास फार सोपे होते. येशूच्या दाखल्यातील प्रवासी “लुटारूंच्या हाती सापडला; त्यांनी त्याचे कपडे काढून घेतले त्याला मारहि दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.”—लूक १०:३०.

येशू पुढे म्हणतो: “मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता; तो त्याला पाहून दुसऱ्‍या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीहि त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्‍या बाजूने चालता झाला.” (लूक १०:३१, ३२) याजक आणि लेवी नियमशास्त्राचे शिक्षक होते—शेजाऱ्‍यार प्रेम करा हा नियम देखील ते शिकवत होते. (लेवीय १०:८-११; अनुवाद ३३:१, १०) निश्‍चितच, त्या जखमी प्रवाशाला मदत करण्यास सर्वांपेक्षा आधी त्यांनी प्रेरित होण्यास हवे होते.

येशू नंतर सांगतो: “मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, तो होता तेथे आला.” शोमरोनी व्यक्‍तीचा उल्लेख करताच त्या जिज्ञासू धर्मपंडिताची उत्सुकता शिगेला पोहंचली असणार यात काही शंका नाही. येशू या वंशाविषयी नकारात्मक टिपणी करणार होता का? उलटपक्षी, त्या दुर्दैवी प्रवाशाला पाहून त्या शोमरोनी मनुष्याला त्याचा “कळवळा आला.” येशूने म्हटले: “त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांस तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत [“पथिकाश्रम,” NW] आणले व त्याची काळजी घेतली.b दुसऱ्‍या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतारशाळेच्या [पथिकाश्रमाच्या] रक्षकाला देऊन म्हटले, ह्‍याची काळजी घ्या; आणि ह्‍यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन.”—लूक १०:३३-३५.

येशू आता त्या धर्मपंडिताला असे विचारतो: “लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्‍या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला?” त्या धर्मपंडिताला उत्तर माहीत होते, तरी पण “शोमरोनी” असे म्हणण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याऐवजी त्याने म्हटले: “त्याच्यावर दया करणारा तो.” त्यानंतर येशूने म्हटले: “जा आणि तूहि तसेच कर.”—लूक १०:३६, ३७.

आपल्यासाठी धडा

येशूला प्रश्‍न विचारणाऱ्‍या मनुष्याचा उद्देश “स्वतःस नीतिमान” ठरविणे हा होता. (लूक १०:२९) कदाचित त्याला असे वाटले असावे, की मोशेच्या नियमशास्त्राचे तंतोतंत पालन केल्यामुळे येशू त्याची प्रशंसा करील. परंतु या आढ्यतेखोर मनुष्याला बायबलच्या नीतिसूत्रामधील सत्य शिकून घेण्याची आवश्‍यकता होती: “मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत. पण अंतःकरणे तोलून पाहणारा परमेश्‍वर आहे.”—नीतिसूत्रे २१:२.

येशूचा दाखला दाखवून देतो, की खरा प्रामाणिक मनुष्य देवाच्या नियमांचे केवळ पालनच करीत नाही तर त्याचे गुणही प्रदर्शित करतो. (इफिसकर ५:१) उदाहरणार्थ, बायबल आपल्याला सांगते, की “देव पक्षपाती नाही.” (प्रेषितांची कृत्ये १०:३५) या बाबतीत तुम्ही देवाचे अनुकरण करता का? येशूचा प्रेरक दाखला दाखवून देतो, की आपला शेजारधर्म राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि धार्मिक सीमा यांपासून मुक्‍त असण्यास हवा. खरोखरच, ख्रिश्‍चनांना सूचना देण्यात आली आहे, की केवळ आपल्याच समाजाच्या, वंशाच्या किंवा राष्ट्राच्या लोकांचे आणि सहविश्‍वासू लोकांचे नव्हे तर, “सर्वांचे . . . बरे करावे.” (तिरपे वळण आमचे.)—गलतीकर ६:१०.

या शास्त्रवचनीय मार्गदर्शनानुसार चालण्याचा यहोवाचे साक्षीदार प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा ते सहविश्‍वासूंना तसेच साक्षीदार नसलेल्या लोकांनाही मानवकल्याण साहाय्य पुरवतात.c याखेरीज, बायबलची चांगल्याप्रकारे लोकांना समज देता यावी म्हणून ते प्रत्येक वर्षी सामुदायिकरीत्या अब्जावधी तास खर्च करतात. ते प्रत्येक व्यक्‍तीला राज्याचा संदेश सांगण्याचा प्रयत्न करतात कारण “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे,” अशी देवाची इच्छा आहे.—१ तीमथ्य २:४; प्रेषितांची कृत्ये १०:३५.

[तळटीपा]

a दाखला लहान असतो आणि सामान्यपणे त्यामध्ये काल्पनिक गोष्ट सांगितलेली असते ज्याद्वारे नैतिक आणि आध्यात्मिक सत्य शिकण्यास मिळते.

b हे स्पष्ट आहे, की येशूच्या दिवसांत काही पथिकाश्रमांमध्ये केवळ राहण्याचीच सुविधा नव्हती तर खाणावळ आणि इतर सुविधा देखील होत्या. येशूच्या मनामध्ये कदाचित अशाप्रकारची निवासव्यवस्था असावी कारण लूक २:७ येथील ‘उतारशाळा’ भाषांतरीत ग्रीक शब्द आणि येशूने वापरलेला शब्द वेगळा आहे.

c उदाहरणार्थ, टेहळणी बुरूज, डिसेंबर १, १९९६, पृष्ठे ३-८ आणि जानेवारी १५, १९९८, पृष्ठे ३-७ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा