थट्टेखोरांपासून सावध!
आज, सगळीकडे भाकीते सांगितली जातात आणि भविष्यकथनाचा धंदा भरभराटीस लागला आहे. लंडनचे द डेली टेलिग्राफ हे नियतकालिक म्हणते, “जसजसे २००० हे वर्ष जवळ येत आहे तसतसे काहीतरी विचित्र घडत आहे आणि जे घडत आहे त्याची अपेक्षा केली नव्हती असेही नाही. जगात हजारो लोक भविष्याविषयी चित्रविचित्र आणि भयंकर दृष्टान्त पाहत आहेत.” परीक्षण करणाऱ्या अनेकांसाठी भविष्यातील अतिशय आस्थेची गोष्ट म्हणजे आधीच आशा करण्यात आलेल्या बदलांची पुनरावृत्ती आणि खरे तर हे बदल वास्तविकरीत्या कधी झालेच नव्हते.
जेव्हा १९ व्या शतकात घोडागाड्यांमध्ये विलक्षण वाढ झाली तेव्हा एका व्यक्तीने असे भाकीत केले, की युरोपातील शहरांचा घोड्यांच्या लीदेमुळे कोंडमारा होईल. त्याचे भाकीत निश्चितच खोटे ठरले. यास्तव, भाकीते वारंवार खोटी ठरतात हे लक्षात घेऊन लंडनचे द टाईम्स हे नियतकालिक उपरोधकपणे म्हणते: “भविष्य म्हणजेच निव्वळ घोड्यांच्या लीदेचा ढीग आहे.”
पुढील धोके आधीच ताडणाऱ्यांची काही लोकांकडून थट्टा केली जाते. उदाहरणार्थ, अमेरिकेतील एका विद्यापीठात वाणिज्य हा विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी पर्यावरणाच्या अपकर्षणाविषयी इशारा देणाऱ्यांना आव्हान दिले आणि या अपकर्षणामुळे परिस्थिती आणखी खराब होणार नाही, अशी त्यांच्यासोबत त्यांनी पैज लावली. न्यू सायंटिस्ट या नियतकालिकाने अहवाल दिल्यानुसार, ते दावा करतात, की “आपल्या जीवनमानामध्ये सुधारणा होत आहे आणि ही सुधारणा निरंतर होत राहील.”
दावे आणि प्रतिदावे यांच्या गोंधळामध्ये अनेक लोक असे मानतात, की विशेष असा काही बदल होणार नाही. मानवी कार्यहालचालींमध्ये देवाच्या हस्तक्षेपाच्या कोणत्याही विचाराची थट्टा करत ते सा.यु. पहिल्या शतकातील थट्टा करणाऱ्यांप्रमाणे मनोवृत्ती प्रदर्शित करतात.
अजूनही सर्वकाही जसेच्या तसेच आहे का?
सा.यु. ६४ च्या आसपास लिहिण्यात आलेल्या ख्रिस्ती प्रेषित पेत्राच्या दुसऱ्या प्रेरित पत्राने असे आर्जवले: ‘स्वतःच्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसांत येतील.’—२ पेत्र ३:३.
आपल्या थट्टेचे लक्ष्य कसे हास्यास्पद दिसेल, हा एकच विचार थट्टा करणाऱ्यांच्या मनांमध्ये असतो. थट्टेला बळी पडणारी व्यक्ती स्वार्थी पेचात पडण्याची शक्यता आहे कारण थट्टा करणाऱ्याला नेहमी हेच वाटत असते, की त्याचे ऐकणाऱ्यांनी त्याचा दृष्टिकोन स्वीकारावा. थट्टा करणाऱ्यांमध्ये कदाचित असेही काही होते ज्यांविषयी पेत्राने इशारा दिला, की ‘ते स्वतःच्या वासनांप्रमाणे चालणारे होते.’ आपल्या वाचकांना सावध करत या प्रेषिताने जोरदार शब्द वापरले. त्याने ‘थट्टेखोर लोकांच्या’ येण्याविषयी इशारा दिला, की ते ‘थट्टा करीत येतील.’
पहिल्या शतकातील थट्टेखोर लोकांनी मशीहाच्या ‘उपस्थितीच्या वचनातील’ खरेपणावर शंका घेतली. ते असे म्हणत: “त्याच्या येण्याचे [“उपस्थितीचे,” NW] वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.” (२ पेत्र ३:४) सर्वकाही तसेच चालू आहे, असे त्यांना वाटले. तथापि, जेरुसलेमवर येणाऱ्या महासंकटाविषयी सा.यु. ३३ मध्येच येशूने भाकीत केले होते. त्याने म्हटले: “पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रु तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढितील, तुझा चहूकडून कोंडमारा करितील. तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवितील, आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत.” या इशाऱ्याची थट्टा उडवणाऱ्यांनी स्वतःची किती फसवणूक करून घेतली! सा.यु. ७० मध्ये रोमी सैन्यांनी जेरुसलेमला वेढा दिला आणि संपूर्ण शहर त्यातील रहिवाश्यांसह जमीनदोस्त केले. शहरातील बहुतेक रहिवासी या संकटाला तोंड देण्यास का तयार नव्हते? कारण आपला पुत्र येशू याद्वारे देवाने त्यांची पारख केली होती, हे त्यांना समजले नाही.—लूक १९:४३, ४४.
प्रेषित पेत्र, सर्वशक्तिमान देवाच्या भवितव्यातील हस्तक्षेपाविषयी सांगतो. त्याने असा इशारा दिला: “चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल.” (२ पेत्र ३:१०) त्यावेळी देव संपूर्ण पृथ्वीवरील अधम लोकांचे उच्चाटन करील आणि न्याय केल्यानंतर धार्मिक ठरलेल्यांना तो वाचवेल. या नियतकालिकाने वारंवार सांगितल्याप्रमाणे येशूची “उपस्थिती” सन १९१४ पासून सुरू झाली आहे. परंतु दुष्टता काढून टाकण्यासाठी देवाचा दंडाधिकारी म्हणून त्याची कार्य करण्याची वेळ अद्याप आलेली नाही. परिणामी, थट्टेखोर लोकांपासून सावध राहण्याचा प्रेषिताचा इशारा आता पहिल्यापेक्षा अधिक लागू होतो.
मानवाच्या कार्यहालचालींमध्ये देव केव्हा हस्तक्षेप करतो, याची वाट पाहून तुम्हाला कदाचित फार वेळ झाला असेल. थट्टेखोर लोकांना बळी न पडता धीराने वाट पाहत राहण्यात कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकेल? हे जाणण्यास कृपया पुढील लेख वाचा.
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
“तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रु . . तुला वेढितील, तुझा चहूकडून कोंडमारा करितील, . . . आणि [ते] तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत.” हा थट्टेवारी नेणारा इशारा नव्हता. रोमी सैन्यांनी जेरुसलेमचा त्यातील अनेक रहिवाश्यांसह संपूर्ण नाश केला.