वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ४/१५ पृ. ३१
  • तुम्हाला आठवते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला आठवते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • नव्या कराराकरवी मोठे आशीर्वाद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • इस्राएलच्या इतिहासातील आठवणीत राहिलेले सण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • तुम्ही “याजकराज्य” व्हाल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • दुसरी मेंढरे आणि नवा करार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ४/१५ पृ. ३१

तुम्हाला आठवते का?

अलीकडील टेहळणी बुरूज अंक तुम्हाला व्यावहारिक मूल्याचे वाटले का? मग पुढील प्रश्‍नांनी तुमच्या स्मरणशक्‍तीची परीक्षा घ्यायला तुम्हाला आवडेल का?

◻ ‘प्रभूचा दिवस’ आणि “परमेश्‍वराचा दिवस” यात कोणता फरक आहे? (प्रकटीकरण १:१०; योएल २:११)

‘प्रभूच्या दिवसांत,’ प्रकटीकरणाच्या १ ते २२ अध्यायातील १६ दृष्टान्तांची पूर्णता आणि येशूच्या शिष्यांनी त्याला त्याच्या उपस्थितीच्या चिन्हाविषयी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्याने ज्यांच्याबद्दल भाकीत केले त्या मुख्य घटना समाविष्ट आहेत. प्रभूच्या दिवसाचा कलाटणी देणारा महत्त्वाचा क्षण म्हणजे, यहोवा सैतानाच्या भ्रष्ट जगावर आपला न्यायदंड बजावतो तेव्हा यहोवाच्या भयप्रेरक दिवसाचा उद्रेक. (मत्तय २४:३-१४; लूक २१:११)—१२/१५, पृष्ठ ११.

◻ माकार्योस बायबलची काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये कोणती आहेत?

माकार्योस बायबलमध्ये यहोवाचे नाव ३,५०० पेक्षा अधिक वेळा आलेले आहे. रशियन धार्मिक साहित्याचे एक अभ्यासक म्हणाले: “त्यांचे भाषांतर हिब्रू मूळग्रंथाशी निष्ठावान असून, भाषा शुद्ध आणि विषयाला शोभेल अशीच आहे.”—१२/१५, पृष्ठ २७.

◻ येशू कोणत्या ‘सत्याविषयी’ बोलत होता जे आपल्याला बंधमुक्‍त करील? (योहान ८:३२)

“सत्य” म्हणजे, बायबलमध्ये जतन करून ठेवण्यात आलेली ईश्‍वरप्रेरित माहिती—खासकरून देवाच्या इच्छेबाबतची माहिती, असा येशूच्या म्हणण्याचा अर्थ होता.—१/१, पृष्ठ ३.

◻ आधुनिक दिवसांतील येहू आणि यहोनादाब कोण आहेत?

येहू, येशू ख्रिस्ताला चित्रित करतो; पृथ्वीवर येशूचे प्रतिनिधीत्व ‘देवाचे इस्राएल’ अर्थात अभिषिक्‍त ख्रिस्ती करतात. (गलतीकर ६:१६; प्रकटीकरण १२:१७) येहूला भेटण्यासाठी यहोनादाब आला त्याप्रमाणे, राष्ट्रांतून एक “मोठा लोकसमुदाय” येशूच्या पार्थिव प्रतिनिधींना समर्थन देण्यासाठी आला आहे. (प्रकटीकरण ७:९, १०; २ राजे १०:१५)—१/१, पृष्ठ १३.

◻ ‘देवाबरोबर चालणे’ म्हणजे काय? (उत्पत्ति ५:२४; ६:९)

देवावर दृढ विश्‍वास असल्याचा पुरावा आपल्या वागणुकीद्वारे देणारे लोक देवाबरोबर चालतात; हनोख आणि नोहा यांनी असे केले होते. यहोवाने आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांनी पाळल्या आणि मानवजातीबरोबरच्या त्याच्या व्यवहारातून त्याच्याबद्दल जे काही माहीत झाले होते त्याच्या एकवाक्यतेत आपले जीवन घडवले.—१/१५, पृष्ठ १३.

◻ एखाद्याने आपल्या मृत्यूच्या शक्यतेमुळे आधीच योजना का करावी?

एका अर्थी, अशी योजना करणे म्हणजे कुटुंबाला बक्षिस देण्यासारखे होय. त्यातून प्रीती दिसून येते. त्यातून, “आपल्या घरच्यांची तरतूद” करण्याची इच्छा दिसून येते, आपण त्यांच्याबरोबर नसू तेव्हादेखील. (१ तीमथ्य ५:८)—१/१५, पृष्ठ २२.

◻ ‘जुन्या कराराने’ काय साध्य केले? (२ करिंथकर ३:१४)

त्यात नव्या कराराच्या पूर्वछटा होत्या आणि त्यातील वारंवार कराव्या लागणाऱ्‍या अर्पणांनी मानवाला पाप आणि मृत्यूपासून सुटका मिळवण्याची अत्यंत गरज आहे हे प्रदर्शित केले. नियमशास्त्र हे “ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक होते.” (गलतीकर ३:२४)—२/१, पृष्ठ १४.

◻ नवा करार कोणत्या मार्गांनी सर्वकाळचा आहे? (इब्री लोकांस १३:२०)

प्रथम, नियमशास्त्राच्या कराराप्रमाणे तो कधीच बदलला जाणार नाही. दुसरी गोष्ट, त्याच्या कार्यशीलतेचे परिणाम कायमचे आहेत. तिसरी गोष्ट, देवाच्या राज्याच्या पार्थिव प्रजेला ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान नव्या कराराच्या व्यवस्थेतून लाभ होत राहील.—२/१, पृष्ठ २२.

◻ कृतज्ञ असल्यामुळे कोणते लाभ मिळतात?

हृदयापासून कृतज्ञता व्यक्‍त केल्यामुळे तिच्यात उत्पन्‍न होणाऱ्‍या चांगुलपणाच्या भावनेमुळे तिला आनंद व शांती मिळते. (पडताळा नीतिसूत्रे १५:१३, १५.) सकारात्मक गुण असल्यामुळे कृतज्ञता त्या व्यक्‍तीचे क्रोध, द्वेष आणि राग या नकारात्मक भावनांपासून संरक्षण करते.—२/१५, पृष्ठ ४.

◻ आत्म्याने अभिषिक्‍त झालेल्यांना कोणकोणत्या करारांत सामील करण्यात आले आहे?

आध्यात्मिक इस्राएलबरोबर यहोवाने केलेला नवा करार आणि येशूने आपल्या पदचिन्हांवर चालणाऱ्‍या अभिषिक्‍त अनुयायांबरोबर केलेला राज्याचा करार. (लूक २२:२०, २८-३०)—२/१५, पृष्ठ १६.

◻ इस्राएलांना कोणते तीन मोठे सण पाळण्याची आज्ञा देण्यात आली होती?

निसान १४ च्या वल्हांडणानंतर लगेच येणारा बेखमीर भाकरीचा सण; निसान १६ नंतर ५० व्या दिवशी येणारा सप्ताहांचा सण; आणि सातव्या महिन्यातील संग्रहाचा सण किंवा मांडवांचा सण. (अनुवाद १६:१-१५)—३/१, पृष्ठे ८, ९.

◻ ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे हा एक विशेषाधिकार का आहे?

येशू म्हणाला: “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.” (मत्तय १८:२०; २८:२०) आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याचे प्रमुख माध्यम म्हणजे मंडळीच्या सभा तसेच संमेलने आणि अधिवेशने यांसारख्या मोठ्या सभा. (मत्तय २४:४५)—३/१, पृष्ठ १४.

◻ निम्रोदच्या नावाचा उगम काय आहे?

अनेक विद्वानांचे याबाबतीत एकमत आहे की, निम्रोद हे नाव, जन्मल्यावर देण्यात आलेले नाव नव्हते. त्याउलट, त्यांच्या मते, त्याची बंडखोर वृत्ती प्रकट झाल्यावर, त्याला शोभण्यासाठी हे नाव देण्यात आले.—३/१५, पृष्ठ २५.

◻ कुटुंब हे मानव समाजाला केवढे महत्त्वाचे आहे?

कुटुंब ही एक मानवी आवश्‍यकता आहे. कौटुंबिक व्यवस्थेचा ऱ्‍हास होतो तेव्हा समाजांची आणि राष्ट्रांची ताकद कमी होते हे इतिहास आपल्याला दाखवतो. म्हणजे, समाजाच्या स्थैर्यावर आणि मुलांच्या तसेच भावी पिढीच्या कल्याणावर कुटुंबाचा थेट परिणाम होतो.—४/१, पृष्ठ ६.

◻ बायबल हे देवाचे वचन असल्याचे कोणते तीन पुरावे आहेत?

(१) ते वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहे; (२) आधुनिक जीवनाकरता व्यावहारिक ठरतील अशी कायम टिकणारी तत्त्वे त्यात आहेत; (३) त्यात अशा भविष्यवाण्या आहेत ज्या पूर्ण झाल्या आहेत आणि ऐतिहासिक पुराव्यांवरून त्या सिद्ध झालेल्या आहेत.—४/१, पृष्ठ १५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा