वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ४/१५ पृ. ३२
  • ‘बालपणापासूनच तुला माहीत आहे’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘बालपणापासूनच तुला माहीत आहे’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ४/१५ पृ. ३२

‘बालपणापासूनच तुला माहीत आहे’

अलीकडील वैद्यकिय संशोधनांनुसार, तान्ह्या बाळांबरोबर बोलल्याने, त्यांच्या मेंदूच्या वाढीवर विलक्षण परिणाम होतो; त्यांच्यात विचार करण्याची, तर्क करण्याची व समस्या सोडवण्याची क्षमता निर्माण होते. खासकरून बाळाच्या जीवनाच्या पहिल्या वर्षी. इंटरनॅशनल हेरल्ड ट्रिब्यून यानुसार, काही संशोधकांना असे वाटत आहे की, “एक बाळ दिवसाकाठी जितके शब्द ऐकते तेच, त्याची भावी बुद्धिमत्ता, शाळेतील यश आणि सामाजिक कार्यक्षमता, हे सांगणारे सर्वांत महत्त्वाचे भाकीत आहे.”

परंतु हे शब्द एखाद्या व्यक्‍तीच्या तोंडून ऐकणे आवश्‍यक आहेत. टेलिव्हिजन किंवा रेडिओ हे पर्याय चालणार नाहीत असे दिसते.

यु.एस.ए. च्या सिएटल येथील वॉशिंग्टन विद्यापीठाचे मज्जातंतुशास्त्रज्ञ म्हणाले: “मज्जातंतू जोड जीवनाच्या अगदी सुरवातीलाच तयार होतात व बाळाचा मेंदू, जोड कसे तयार होतात हे ठरवण्याकरता अनुभव यावा म्हणून अक्षरशः थांबून असते हे आम्हाला आता समजले. ही प्रक्रिया किती लवकर चालू होते हे आम्हाला इतके दिवस माहीत नव्हते. उदाहरणार्थ, बाळ जेव्हा सहा महिन्यांचे होते तेव्हापासूनच ते त्याच्या मातृभाषेतील आवाज शिकते.”

अलीकडील संशोधन या विस्तृत मताला आव्हान देते, की बाळांना पुष्कळ प्रेम दिल्यास ते बुद्धिमान होतात. मुलांच्या वाढीत पालकांचा सिंहाचा वाटा आहे यावरही ते जोर देते.

यावरून आपल्याला प्रेषित पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या ईश्‍वरप्रेरित पत्रातील शब्द आठवतात: “बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे . . . ते . . . तुला तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे.” (तिरपे वळण आमचे.) बाळ तीमथ्याला त्याच्या ख्रिस्ती विश्‍वासातील आईने व आजीने दिलेल्या पवित्र शास्त्राच्या माहितीने, देवाचा एक उल्लेखनीय सेवक म्हणून वाढ होण्यात प्रमुख भूमिका निभावण्याची शक्यता असावी.—२ तीमथ्य १:५; ३:१५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा