वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ४/१ पृ. २१
  • “तुझे लोक संतोषाने पुढे होतात”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुझे लोक संतोषाने पुढे होतात”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • योद्धा आणि एक लहान मुलगी
    बायबलमधून शिकू या!
  • तिची मदत करायची इच्छा होती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • तो हट्टी होता पण शेवटी त्याने ऐकले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • मुलगी बलवान माणसाला मदत करते
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ४/१ पृ. २१

राज्य घोषकांचा वृत्तान्त

“तुझे लोक संतोषाने पुढे होतात”

नामान नावाच्या एका सिरियन बलवान सेनापतीला कुष्ठरोग झाला आहे. या आजारावर उपचार न केल्यास हा किळसवाणा आजार बळावून मनुष्य विद्रुप दिसू शकतो व मृत्यूही ओढवू शकतो. नामानाला आता काय करायचे आहे? नामानाच्या घराण्यात एक चिमुरडी पोर आहे जिला ‘इस्राएल देशातून कैद करून आणले आहे.’ ती धैर्याने बोलते आणि नामानाला केवळ संदेष्टा अलीशाच बरं करू शकतो असं सांगते.—२ राजे ५:१-३.

तिच्या धाडसामुळे नामान अलीशाला शोधून काढतो व तो बरा होतो. एवढेच नव्हे तर नामान यहोवाचा एक उपासकही बनतो! बायबलमध्ये लिहिलेली ही घटना सा.यु.पू. दहाव्या शतकात घडली होती. (२ राजे ५:४-१५) आजही अनेक युवक, राज्य आस्थेबद्दल बोलण्यासाठी असेच धैर्य दाखवतात. मोझांबिकमधील पुढील अनुभवावरून ते तुमच्या प्रत्ययास येईल.

सहा वर्षांचा नुनु बाप्तिस्मा न झालेला सुवार्तेचा प्रचारक आहे. पण ह्‍याही आधी तो शेजारच्या मुलांना एकत्र करीत असे, प्रार्थना करून त्यांना बायबल कथांचं माझं पुस्तक यातून बायबलची शिकवण देत असे.

पुष्कळदा नुनु शनिवारच्या दिवशी लवकर उठून आपल्या कुटुंबाला आठवण करून देतो: “आज आपल्याला प्रिचिंगला जायचयं.” सेवेबद्दलचा त्याचा उत्साह इतर मार्गातही दिसून येतो. मापुटोमध्ये त्याच्या आईवडिलांबरोबर रस्तावरील साक्षकार्य करताना नुनु स्वतःहूनच लोकांकडे बोलायला जातो. असेच एकदा एक व्यापारी त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला: “तू ही नियतकालिके का विकतोस?” नुनु म्हणाला: “नाही, मी विकत नाहिए; हो, पण प्रचार कार्याला पैशाची मदत व्हावी म्हणून मी देणग्या मात्र स्वीकारतो.” तेव्हा व्यापारी म्हणाला: “मला ही नियतकालिके आवडली नाहीत, पण तुझा स्वभाव आणि प्रयत्न पाहून मला आनंद वाटला. या कामासाठी मी काही देणगी देऊ इच्छितो.”

दुसऱ्‍या वेळी एकदा, नुनु रस्त्यावरील एका मनुष्याकडे गेला आणि त्याला खरी शांती आणि सुरक्षितता—तुम्हाला कशी लाभेल? (इंग्रजी), हे पुस्तक दिले. त्या मनुष्याने त्याला विचारले: “तू शाळेला जात नाहीस?” नुनु म्हणाला: “जातो, पण आज मी या पुस्तकातून एक महत्त्वाचा संदेश देत आहे. बघा, या पुस्तकात दाखवलेले हे चित्र, देव जे नवीन जग आणणार आहे त्याचे आहे; तुम्हीपण ह्‍या जगात राहू शकाल.” तो मनुष्य त्याच्याच शाळेतील शिक्षक होता हे नुनुच्या लक्षात पण आले नाही. शिक्षकाने ते पुस्तक तर घेतलेच शिवाय नुनुकडून त्यांना टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकेही नियमितरीत्या मिळतात.

नुनुला जेव्हा विचारले जाते, की त्याला प्रिचिंग करायला इतकं का आवडतं तेव्हा तो म्हणतो: “मला यहोवा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याबद्दल लोकांशी बोलायला आणि त्यांना शिकवायला खूप आवडतं. लोकांना ऐकायचं नाही तर त्यात चिडण्यासारखं काही नाही.”

जगभरात, नुनुसारखे हजारो युवक देवाच्या राज्याविषयी शिकवण्याकरता व प्रचार करण्याकरता “संतोषाने पुढे होतात.” (स्तोत्र ११०:३) पण, हे सर्व आपोआप होत नाही. बालपणापासूनच आपल्या मुलांना यहोवाविषयी शिकवणाऱ्‍या, सेवेत एक आदर्श असणाऱ्‍या व राज्य आस्थांचा आवेशी पाठलाग करणाऱ्‍या पालकांना समृद्ध आशीर्वाद मिळतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा