एका खास प्रसंगी आमच्यासोबत जरूर सहभागी व्हा शनिवार, एप्रिल ११, १९९८
यहोवाचे साक्षीदार तुम्हाला हार्दिक निमंत्रण देत आहेत की तुम्हीही त्यांच्यासोबत येशू ख्रिस्ताच्या अर्थात, आपल्या पुत्राच्या रूपात देवाने दिलेल्या देणगीचे स्मरण करावे. या देणगीद्वारे मानवजातीला सार्वकालिक जीवन उपभोगण्याची आशा मिळाली आहे.—योहान ३:१६.
या वर्षी येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी शनिवार, एप्रिल ११ रोजी सूर्यास्तानंतर पार पाडण्यात येईल. ही तारीख बायबलच्या चांद्र दिनदर्शिकेनुसार निसान १४ या तारखेशी जुळते. सभेचे ठिकाण आणि अचूक वेळ जाणून घेण्यासाठी कृपया आपल्या परिसरातल्या यहोवाच्या साक्षीदारांकडे चौकशी करावी.