वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ३/१ पृ. ३०-३१
  • येशू ७० शिष्यांना पाठवतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशू ७० शिष्यांना पाठवतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एकाग्र सेवक
  • आपल्याकरता धडे
  • कापणीच्या कामासाठी तातडीने कामकरी हवेत!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • “प्रथम . . . सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • कापणीच्या कामकऱ्‍यांनो आनंदी व्हा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • येशू राज्याचा संदेश घोषित करतो
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ३/१ पृ. ३०-३१

त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले

येशू ७० शिष्यांना पाठवतो

तोसा.यु. ३२ चा वसंत ऋतू होता. येशूचे शेवटचे सहाच महिने उरले होते. यास्तव, प्रचार कार्याचा वेग वाढवण्याकरता व आपल्या काही अनुयायांचे प्रशिक्षण वाढवण्याकरता त्याने ७० शिष्यांना नेमून “ज्या ज्या नगरांत व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठविले.”—लूक १०:१.a

स्वतः येशूचे आगमन होईल तेव्हा लोक त्याच्या बाजूने उभे राहतील की मशीहाच्या विरुद्ध उभे राहतील हे त्यांना लवकरात लवकर ठरवता येईल म्हणून येशूने त्याच्या शिष्यांना “आपणापुढे पाठविले.” पण त्याने “दोघे दोघे” असे का पाठवले? उघड आहे की, विरोधाच्या वेळी एकमेकांना प्रोत्साहन देता यावे म्हणून.

प्रचार कार्याच्या निकडीवर जोर देताना येशूने आपल्या अनुयायांना म्हटले: “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा.” (लूक १०:२) पीकासोबतची तुलना अगदी उचित होती कारण, कापणीच्या वेळी थोडी देखील दिरंगाई झाल्यास सर्व मौल्यवान पीकाचा नाश होऊ शकतो. तसेच, शिष्यांनी त्यांच्या प्रचार नेमणुकीकडे दुर्लक्ष केल्यास बहुमूल्य प्राण गमावले जाऊ शकतात!—यहेज्केल ३३:६.

एकाग्र सेवक

येशूने त्याच्या शिष्यांना पुढे म्हटले: “पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊ नका; वाटेने कोणाला मुजरा [आलिंगन देऊन अभिवादन] करू नका.” (लूक १०:४) रीतीरिवाजानुसार एखादा यात्रेकरू सोबत केवळ एक पिशवी आणि अन्‍नच घेत नसे तर, चप्पलांची आणखी एक जोडही घेत असे, कारण चप्पलांचा तळ झिजू शकत होता वा चप्पलांचे बांध तुटू शकत होते. परंतु येशूच्या शिष्यांना या गोष्टींची चिंता करावयाची नव्हती. तर, यहोवावर भरवसा ठेवायचा होता, की तो, आदरातिथ्याची रीत असलेल्या सहइस्राएलींच्याद्वारे त्यांची काळजी घेणार होता.

परंतु, मग वाटेने भेटणाऱ्‍याला आलिंगन देऊन अभिवादन करू नका असे येशूने आपल्या शिष्यांना का सांगितले बरे? त्यांनी भावनाशून्य, उद्धट व्हायचे होते का? मुळीच नाही! अभिवादन करताना आलिंगन देणे असा अर्थ असलेला ग्रीक शब्द अस्पाझोमाई केवळ सभ्यपणे “नमस्कार” किंवा “कसं काय” केवळ असेच विचारणे नव्हे. त्यामध्ये, दोन ओळखीचे लोक भेटल्यावर रीतीरिवाजानुसार चुंबन देणे, आलिंगन देणे आणि वेळपर्यंत बोलत राहणे समाविष्ट असू शकते. एका भाष्यकाराने म्हटले: “पौर्वात्य लोकांच्या नमस्कारात आपल्यात चालते त्याप्रमाणे पुढे वाकणे किंवा हातात हात देणे नव्हते तर, पुष्कळ वेळा एकमेकांना आलिंगने दिली जात असत, वाकून नमस्कार केला जात असे शिवाय साष्टांग नमस्कारही घातला जात असे. ह्‍या सर्वासाठी पुष्कळ वेळ हवा होता.” (तिरपे वळण आमचे.) (पडताळा २ राजे ४:२९.) म्हणून येशूने आपल्या अनुयायांना, तो रीतीरिवाज होता तरीसुद्धा अनावश्‍यक विकर्षणांना टाळण्यास मदत केली.

शेवटी, येशूने आपल्या शिष्यांना सांगितले, की जेव्हा त्यांना एखाद्या घरात बोलावून त्यांचे स्वागत केले जाईल तेव्हा त्यांनी ‘त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खावेप्यावे.’ परंतु जर त्यांनी एखाद्या शहरात प्रवेश केला आणि चांगल्याप्रकारे त्यांचे स्वागत करण्यात आले नाही तर त्यांनी ‘तेथील रस्त्यांवर बाहेर जाऊन असे म्हणावे: आमच्या पायांस लागलेली तुमच्या गावची धूळ देखील तुमची तुम्हांस झाडून टाकतो.’ (लूक १०:७, १०, ११) एखाद्याच्या पायावरून धूळ पुसून टाकणे किंवा झटकणे म्हणजे, कालांतराने देवाकडून येणारा परिणाम भोगावयास अस्वीकार केलेले घर किंवा शहर शांतीने सोडणे होय. पण येशूच्या शिष्यांना दयाळुपणे स्वीकारणाऱ्‍यांनी स्वतःला आशीर्वादाकरता पात्र केले. दुसऱ्‍या एका प्रसंगी, येशू आपल्या प्रेषितांना म्हणाला: “जो तुम्हास स्वीकारितो, तो मला स्वीकारितो आणि जो मला स्वीकारितो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारितो. आणि ह्‍या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजितो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हास खचित सांगतो.”—मत्तय १०:४०, ४२.

आपल्याकरता धडे

देव राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराची आणि शिष्य बनवण्याची कामगिरी संपूर्ण जगभरातील ५०,००,००० पेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार आज पार पाडत आहेत. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) आपल्याजवळचा संदेश निकडीचा आहे हे त्यांना माहीत आहे. म्हणूनच, त्यांच्या महत्त्वपूर्ण नेमणुकीकडे पूर्ण लक्ष देण्यापासून त्यांना परावृत्त करू शकतील अशी सर्व विकर्षणे टाळून ते त्यांच्या वेळेचा सदुपयोग करतात.

यहोवाचे साक्षीदार त्यांना भेटणाऱ्‍या सर्वांबरोबर प्रेमाने सादर होण्याचा प्रयत्न करतात. पण, ते बाष्कळ बडबडीत भाग घेत नाहीत किंवा सामाजिक विषयांवरील अथवा अन्याय दूर करण्याकरता या जगाच्या निष्फळ प्रयत्नांवरील वादविवादातही भाग घेत नाहीत. (योहान १७:१६) त्याऐवजी, देवाचे राज्य हाच मानवाच्या समस्यांवर एकमात्र दीर्घ मुदतीचा उपाय आहे यावरच ते चर्चा करतात.

बहुधा, यहोवाचे साक्षीदार जोडीजोडीने कार्य करताना दिसतात. पण त्यांनी जर एक एकट्याने कार्य केले तर आणखी साध्य करता येणार नाही का? कदाचितच. तरीपण, एखाद्या सहविश्‍वासूच्या सोबत कार्य केल्याने मिळणारा फायदा ख्रिश्‍चनांना आज माहीत आहे. धोकादायक क्षेत्रांमध्ये साक्ष देताना त्यामुळे काही प्रमाणात संरक्षण मिळते. जोडीने कार्य केल्याने नवोदितांना सुवार्तेच्या अनुभवी प्रचारकांच्या कौशल्याचा फायदा होऊ शकतो. होय, दोघेही एकमेकांना उत्तेजन देऊ शकतात.—नीतिसूत्रे २७:१७.

निःसंदेह, प्रचाराचे कार्य या ‘शेवटल्या काळात’ पार पाडले जाणारे सर्वात निकडीचे कार्य आहे. (२ तीमथ्य ३:१) “एकजिवाने सुवार्तेच्या विश्‍वासासाठी एकत्र” कार्य करणाऱ्‍या एका जागतिक बंधुवर्गाचा पाठिंबा असल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांना आनंद वाटतो.—फिलिप्पैकर १:२७.

[तळटीप]

a येशूने “बहात्तर” शिष्यांस पाठवले असे काही बायबल आणि प्राचीन ग्रीक हस्तलिखिते म्हणतात. परंतु केवळ ‘सत्तरांना’ पाठवल्याचा भरपूर हस्तलिखित पुरावा आहे. या पारिभाषिक चुकीमुळे आपण, येशूने त्याच्या शिष्यांच्या मोठ्या समुहाला प्रचाराला पाठवले होते या मुख्य मुद्द्‌यापासून दुसरीकडे वळता कामा नये.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा