“असाधारण” अधिवेशनाची प्रशंसा
लिमा, पेरू येथील एका रेडिओ निवेदकाची यहोवाच्या साक्षीदारांप्रती फारच शंकेखोर वृत्ती होती. पण, त्यांच्या एका अधिवेशनाला हजर राहिल्यानंतर त्याची ही वृत्ती पार बदलली. किंबहुना, त्याच्यावर इतकी चांगली छाप पडली की त्याने आपल्या रेडिओ श्रोत्यांपुढे साक्षीदारांची चक्क प्रशंसा केली. त्याचे काही उद्गार खाली दिलेले आहेत:
“सदर अधिवेशन अगदीच असाधारण म्हणावे लागेल. जमिनीवर कागदाचा चिटोरा नव्हता की कुठे आसपास एक हातगाडीवाला नव्हता. वाहतुकीतही काही अडथळा नाही. तब्बल पाच हजार दोनशे लोक, प्रत्येकजण आपल्यासोबत बादली, पुसण्याचे कापड, केर काढण्याचे सुपडे, केरसुणी, ब्रश, हातमोजे, डिटर्जंट, असे सर्व साहित्य घेऊन साफसफाई करायला स्टेडियमवर आले, तेही स्वखर्चाने. जिथे कुठे पेंट निघाला होता, तिथे त्यांनी पेंटही लावला. आणि यासाठी लागणारा पैसा कुठून येतो? ते स्वतःच उभा करतात! काही करायचे आहे म्हटले, की लगेच सर्वजण आपापल्या खिशात हात घालतात. मी तर म्हणेन, की अशा गोष्टींबाबतीत कॅथलिक चर्च नुसतं झोपा काढतंय. यहोवाच्या साक्षीदारांना आणि या कार्यक्रमाच्या संचालकांना माझे अभिनंदन. आणि अगदी मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो, देव तुमची मदत करो आणि तुमचे कल्याण करो.”
या वर्षी सबंध जगातील वेगवेगळ्या शहरांत, यहोवाचे साक्षीदार “ईश्वरी जीवनाचा मार्ग” प्रांतीय अधिवेशनांचा आनंद लुटतील. तुम्ही उपस्थित राहणार का?
[३२ पानांवरील चित्र]
“जमिनीवर कागदाचा चिटोरा नव्हता”