वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ३/१ पृ. ३-४
  • चर्चेस पापांची कबुली करतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेस पापांची कबुली करतात
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पोप क्षमा मागतात तेव्हा
  • असे का?
  • ते क्षमा का मागत आहेत?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ३/१ पृ. ३-४

चर्चेस पापांची कबुली करतात

“पोप चर्चची न्यायचौकशी करतात.” “धर्मन्यायालय आणि ज्यूविरोधवाद—चर्च कबुली [मिया कुल्पा]a देण्यास स्वतःला तयार करीत आहे.” “संहाराची कबुली [मिया कुल्पा] करणे.” “पश्‍चिम संयुक्‍त संस्थानाच्या इंडियन्सची मेथडिस्ट क्षमा मागतात.”

असे मथळे तुमच्या वाचनात कधी आलेत का? असे दिसते, की चर्चेस आता वारंवार आपल्या चुका कबूल करून गत शतकांदरम्यान केलेल्या कृत्यांची क्षमा मागत आहेत. प्रसार माध्यम सतत पोपच्या नवनवीन कबुली [मिया कुल्पा] प्रसारित करीत आहे.

पोप क्षमा मागतात तेव्हा

सन १९८० व १९९६ दरम्यान, जॉन पॉल दुसरे यांनी, ९४ वेळा तरी ‘चर्चच्या ऐतिहासिक चुका ओळखल्या किंवा क्षमा मागितली’ असे व्हॅटिकन भाष्यकार ल्युईगी ऑकॉटोली क्वान्डो ईल पॉपॉ क्येड पेरडोनो (पोप क्षमा मागतात तेव्हा) नामक आपल्या पुस्तकात म्हणतात. ऑकॉटोली यांच्यामते, “कॅथलिक चर्चमध्ये केवळ पोपलाच मिया कुल्पा करण्याचा अधिकार आहे.” आणि हे त्यांनी धर्मयुद्धे, युद्धे, हुकूमशाहीला पाठिंबा, चर्चमध्ये विभाजन, ज्यूविरोधवाद, धर्मन्यायालये, माफिया आणि वंशवाद या कॅथलिक इतिहासाच्या सर्वात वादग्रस्त घटनांचा उल्लेख करून कबूल केले आहे. सन १९९४ मध्ये कार्डिनल्सना पाठवण्यात आलेल्या निवेदनात (पोपचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असे काहीजण समजतात) जॉन पॉल दुसरे यांनी, “सामान्य आणि दुसऱ्‍या ख्रिस्ती हजार वर्षांदरम्यान केलेल्या पापांच्या कबुलीचा” प्रस्ताव मांडला.

अनेक धर्माधिकाऱ्‍यांनी पोपचे उदाहरण गिरवले. १९९४ च्या डिसेंबरमध्ये, ईल जोरनॉल नामक एका इटालियन बातमीपत्रात ही बातमी आली: “पुष्कळ अमेरिकी बिशपांनी दूरदर्शनवरून जाहीरपणे क्षमा मागितली.” कशासाठी? अनेक तरुणांचे ज्या कारणामुळे नुकसान झाले त्या बालसंभोगी पाळकांच्या समस्येला कमी लेखल्यासाठी. १९९५ च्या जानेवारीत, ला रिपब्लिका नामक बातमीपत्राने “समकालीन कॅथलिकवादाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व कृतीची”—संहाराचा उल्लेख करण्यात आला तेव्हा पोप पायस बारावे यांनी मौन बाळगल्याच्या समस्येची बातमी दिली. सन १९९५ च्या जानेवारीत त्याच बातमीपत्राने कळवले, की नात्सींच्या गुन्ह्यांना पाठिंबा देणाऱ्‍या रोमन कॅथलिकांच्या “अनेक चुकांबद्दल” जर्मन बिशपांनी क्षमा मागितली. विविध प्रोटेस्टंट चर्चेसनेही स्वतःला आत्मसमीक्षेसाठी तयार केले आहे.

असे का?

आपण चुकतो तेव्हा क्षमा मागण्याचे उत्तेजन बायबल आपल्याला देते आणि चर्चेस जेव्हा स्वतःला आत्मसमीक्षेसाठी तयार करतात तेव्हा अनेकजण त्यांची प्रशंसा करतात. (याकोब ५:१६) पण चर्चेस असे का करत आहेत? त्यांच्याबद्दल आपल्या मनात असलेल्या दृष्टिकोनावर याचा कसा परिणाम झाला पाहिजे?

[तळटीप]

a लॅटिन शब्दाचा अर्थ आहे “माझ्या स्वतःच्या चुकीसाठी;” हा एका कॅथलिक प्रार्थनेचा (कॉन्फिटियोर, किंवा “मी कबूल करतो”) एक भाग आहे ज्यात चर्च सदस्य हे सतत उच्चारतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा