राज्य घोषकांचा वृत्तान्त
काँगो लोकसत्ताक गणतंत्रातील तरुण देवाची स्तुती करतात
‘कुमार व कुमारी, वृद्ध व तरुण यहोवाच्या नावाचे स्तवन करा, कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे,’ या सनातन राजाच्या स्तवनात सामील होण्याचे प्रेमळ आमंत्रण स्तोत्रकर्त्याने अनेक शतकांपूर्वी तरुणांना दिले. (स्तोत्र १४८:१२, १३) काँगो लोकसत्ताक गणतंत्रातील पुढील अनुभव या अतुल्य विशेषाधिकारावर जोर देतात.
• एका खास पायनियरचा घरमालक यहोवाच्या साक्षीदारांचे वर्तन पाहून खूपच प्रभावित झाला होता. त्यामुळे त्याने आपली पाच वर्षांची मुलगी, फीफी हिच्यासोबत बायबल अभ्यास करण्याची अनुमती त्यांना दिली. फीफीची, बायबल कथांचं माझं पुस्तकa (इंग्रजी) नामक पुस्तकाच्या अभ्यासाची प्रगती पाहून त्याने तिला राज्य सभागृहात होणाऱ्या सभांना जाऊ दिले. तेथे, चिमुकली फीफी साक्षीदारांच्या गीतपुस्तकातून राज्य गीते शिकली. तिला सर्वात जास्त “परादीसविषयी देवाचे अभिवचन” हे शीर्षक असलेले गीत क्र. ४ आवडे.
एकदा तिच्या बाबांनी तिला त्यांच्या चर्चला नेले. फीफीला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले कारण तिने चर्च गीते गाण्यास चक्क नाकारले! का नाकारले? कारण तिला वाटले की तिच्या बाबांच्या चर्चमध्ये गायिली जाणारी गीते, तिने तिच्या बायबल अभ्यासातून जे काही शिकले होते त्यांच्या एकवाक्यतेत नव्हती. म्हणून तिनं तिचं आवडतं राज्य गीत अगदी धैर्यानं गायिलं.
तिचं मन बदलण्याकरता केलेल्या अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर, चर्च पुढाऱ्यांनी पाच वर्षीय चिमुकल्या फीफीला बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला! ह्या सर्व गैरवागणुकीदरम्यान फीफीचे बाबा शांत राहिले. तिने तिच्या विश्वासासाठी दृढ भूमिका घेतल्याचे पाहून त्यांना तिचा अभिमान वाटत होता. तिने यहोवाच्या साक्षीदारांबरोबरच संगती करावी असे तिच्या आईबाबांना वाटते.
• लुकोडी नावाच्या एका किशोरवयीन मुलाने यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली तेव्हा त्याच्या बाबांनी त्याला खूप विरोध केला. एकदा तर तो राज्य सभागृहात होणाऱ्या सभेला जाण्यासाठी तयार होत असताना, त्यांनी त्याला कोयत्याचा धाक दाखवला. दुसऱ्या वेळी तर त्यांनी त्याला काठीने असे मारले की त्याच्या पाठीवर खोल जखम झाली. इतक्या कडक विरोधातही लुकोडी यहोवाचा साक्षीदार बनण्याच्या आपल्या निर्धाराशी पक्का राहिला. तो प्रगती करीत राहिला आणि एके दिवशी बाप्तिस्मा घेतला. आज तो नियमित पायनियर म्हणून सेवा करीत आहे.
लुकोडीची धाकटी बहीण सोना, आपल्या दादाने घेतलेल्या पावित्र्याने इतकी प्रभावित झाली की तीसुद्धा यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करू लागली. पण तिच्या बाबांनी तिचा अभ्यास बंद करण्याकरता तिला दुसऱ्या एका खेड्यातील शाळेत घातले जेथे कोणी साक्षीदार नव्हते. पण सोनाने मात्र शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगण्याची सवय स्वतःला लावून घेतली. यामुळे तिच्या मावस बहिणीत आवड निर्माण झाली.
शेजारच्या खेड्यांतील यहोवाच्या साक्षीदारांनी सोनाच्या प्रचारकार्याबद्दल ऐकले तेव्हा त्यांनी तिला भेट दिली आणि तिच्याबरोबर नियमित गृह बायबल अभ्यासाची व्यवस्था केली. तीही प्रगती करीत गेली आणि आपल्या भावाप्रमाणे यहोवाची समर्पित, बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार बनली. याशिवाय, तिची मावस बहीण आता बाप्तिस्मा न झालेली प्रचारक आहे व त्या खेड्यात एक पुस्तक अभ्यास संचालित होतो.
तरुणजन यहोवाच्या नावाच्या स्तवनात सामील होतात तेव्हा ते किती सुखावह आणि तजेला देणारे ठरते!
[तळटीप]
a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.