वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ९/१५ पृ. ८-९
  • कापणीचे सण देवाला प्रसन्‍न करतात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कापणीचे सण देवाला प्रसन्‍न करतात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मूर्तिपूजक संबंध
  • देवाचा काय दृष्टिकोन आहे?
  • इस्राएलच्या इतिहासातील आठवणीत राहिलेले सण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • कापणीच्या कार्यात तत्पर राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • कापणीच्या कामासाठी तातडीने कामकरी हवेत!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • कापणीच्या कामकऱ्‍यांनो आनंदी व्हा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ९/१५ पृ. ८-९

कापणीचे सण देवाला प्रसन्‍न करतात का?

गोड रसाळ फळे, हिरव्यागार भाज्या आणि कणसाच्या पेंढ्यांच्या उंचच उंच राशी निश्‍चितच एक नयनरम्य चित्र रेखाटतात. समस्त इंग्लंडमध्ये, कापणीच्या वेळी, चर्चच्या वेदी व व्यासपीठ अशा दृश्‍यांनी सुशोभित केलेले असतात. इतर ठिकाणी केले जाते त्याप्रमाणे, युरोपमध्येही कापणीच्या हंगामाची सुरवात व त्याचा शेवट देखील अनेकविध सणासुदींनीच केला जातो.

ज्या लोकांचे पोट भूमीच्या उत्पन्‍नावरच भरत असते असे लोक जमिनीच्या उत्पन्‍नाबद्दल विशेष कृतज्ञ असतात. वस्तुतः, देवाने प्राचीन इस्राएल राष्ट्राला कापणीशी संबंधित असलेले तीन वार्षिक सण साजरे करण्यास सांगितले होते. वसंत ऋतूच्या सुरवातीला, म्हणजे बेखमीर भाकरीच्या सणाच्या वेळी सातूचे पहिले पीक तयार होत असे तेव्हा इस्राएल लोक त्याची एक पेंढी देवाला वाहत असत. वसंत ऋतूच्या अखेरीस अर्थात, सप्ताहांच्या सणाच्या वेळी (किंवा पेन्टेकॉस्टला) ते गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकांपासून तयार केलेल्या भाकरी अर्पण करत असत. मग, इस्राएल लोकांच्या कृषी वर्षाच्या अंतास चिन्हांकित करणारा संग्रहाचा सण पानझडित येत असे. (निर्गम २३:१४-१७) हे सण “पवित्र मेळे” असून हर्ष करण्याचे समय होते.—लेवीय २३:२; अनुवाद १६:१६.

तर मग, आधुनिक दिवसांतील कापणीच्या सणांबाबत काय? ते देवाला प्रसन्‍न करतात का?

मूर्तिपूजक संबंध

कॉर्नवॉल, इंग्लंडचा एक अँग्लिकन पाळक, तेथील कापणीच्या वेळेची पारंपरिक मेजवानी व त्या सणासोबतच होणारी दारूबाजी यांमुळे इतका त्रस्त झाला, की सन १८४३ साली त्याने मध्यकालीन कापणी प्रथा पुनरुज्जीवित करण्याचा मनोदय केला. कापणी केलेल्या धान्याच्या प्रथम उत्पन्‍नातून त्याने आपल्या चर्चमधील मासकरता भाकर तयार केली. असे करून त्याने लामास सण कायमस्वरूपी अस्तित्वात आणला; हा एक “ख्रिस्ती” उत्सव असून काहींच्या म्हणण्याप्रमाणे सेल्टिक लोकांचे दैवत, लूक याच्या प्राचीन उपासनेतून त्याचा उगम झाला होता.a म्हणूनच, मूर्तिपूजा ही आधुनिक अँग्लिकन कापणी सणाचे उगमस्थान होय.

कापणी हंगामाच्या अखेरीस साजऱ्‍या होणाऱ्‍या इतर सणांबाबत काय? एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका यानुसार ह्‍या सणांस चिन्हित करणाऱ्‍या अनेकविध प्रथांचे उगमस्थान म्हणजे, “कणीस [धान्य] भूत अथवा कणीस माता हा जडप्राणवाद विश्‍वास” होय. काही ठिकाणी शेतकऱ्‍यांचा असा विश्‍वास होता, की जिची कापणी अद्याप केलेली नाही त्या धान्याच्या शेवटच्या पेंढीत भूत वसलेले असते. हे भूत घालवून देण्यासाठी, सर्व धान्य जमिनीवर पडेपर्यंत ते काठ्यांनी धान्याच्या त्या पेंढीवर मारत असतात. इतर ठिकाणी, ते धान्याच्या काही पात्यांपासून एक “कणीस बाहुली” विणत असत; आणि पुढील वर्षाच्या पेरणीपर्यंत “दैव” म्हणून ते तिला जपून ठेवत असत. मग नवीन पिकांवर आशीर्वाद राहील या आशेने धान्याचे कणीस ते पुन्हा जमिनीत टाकत असत.

काही दंतकथा कापणी-समयाचा संबंध, इश्‍तार सुफलता देवतेचा पती तम्मुज या बॅबिलोनी दैवताच्या उपासनेशी जोडतात. धान्याचे पिकलेले कणीस छाटणे तम्मुजाच्या अकाली मृत्यूसारखे आहे. इतर दंतकथा कापणी समयांची नाळ, यहोवा तिरस्कार करतो त्या नरबळीशी देखील जुळवितात.—लेवीय २०:२; यिर्मया ७:३०, ३१.

देवाचा काय दृष्टिकोन आहे?

प्राचीन इस्राएलासोबत देवाने केलेल्या व्यवहारांतून स्पष्ट होते, की निर्माता व जीवनाचा झरा असलेल्या यहोवाने आपल्या उपासकांकडून अनन्य भक्‍तीची मागणी केली. (स्तोत्र ३६:९; नहूम १:२) यहेज्केल संदेष्ट्याच्या काळात, तम्मुज दैवतासाठी शोकविलाप करण्याचा प्रघात यहोवाच्या नजरेत ‘अतिशय अमंगळ कृत्य’ होते. या व इतर खोट्या धार्मिक विधींमुळे त्या खोट्या उपासकांच्या प्रार्थनांकडे देवाने कान दिला नाही.—यहेज्केल ८:६, १३, १४, १८.

या गोष्टीची तुलना, कापणीच्या वेळी इस्राएल लोकांनी कोणकोणत्या गोष्टी पाळाव्यात याविषयी यहोवाने त्यांना ज्या सूचना दिल्या होत्या त्याजशी करा. संग्रहाच्या सणाच्यावेळी, इस्राएल लोक एक पवित्र मेळावा भरवत असत व त्यावेळी तरुण व वृद्ध, गरीब व श्रीमंत असे सर्वजण शोभिवंत झाडांच्या कसदार पालवीपासून बनविलेल्या मांडवांत तात्पुरते वास्तव्य करत असत. हा त्यांच्याकरता अत्यानंद करण्याचा समय असला तरी मिसर देशातून बाहेर पडताना देवाने त्यांच्या पूर्वजांची जी मुक्‍तता केली होती त्यावर मनन करण्याचाही तो समय होता.—लेवीय २३:४०-४३.

इस्राएल लोकांच्या सणाच्या वेळी एकच सत्य देव, यहोवा यांस अर्पणे वाहिली जात असत. (अनुवाद ८:१०-२०) या आधी उल्लेखिलेल्या जडप्राणवादाच्या विश्‍वासाबद्दल बोलायचे झाल्यास, गव्हाच्या पेंढ्यांसारख्या उत्पन्‍नात जीव असतो असा उल्लेख बायबलमध्ये कोठेही आढळत नाही.b शिवाय, मूर्ती अचेतन असतात, त्यांना बोलता येत नाही, पाहता येत नाही, ऐकता येत नाही, वास घेता येत नाही, जाणीव होत नाही अथवा त्यांच्या उपासकांना ते काही मदतही देऊ शकत नाहीत असे शास्त्रवचन सुस्पष्टपणे दाखवतात.—स्तोत्र ११५:५-८; रोमकर १:२३-२५.

आज ख्रिस्ती, देवाने प्राचीन इस्राएल राष्ट्रासोबत केलेल्या नियमशास्त्राच्या कराराधीन नाहीत. खरे तर, देवाने ‘त्यास खोडले व येशूच्या वधस्तंभाला खिळून रद्द केले.’ (कलस्सैकर २:१३, १४) यहोवाचे आधुनिक दिवसांतील सेवक ‘ख्रिस्ताच्या नियमानुसार’ जीवन व्यतीत करतात व देव तरतूद करतो त्या सर्व गोष्टींना कृतज्ञतेने प्रतिसाद देतात.—गलतीकर ६:२.

प्रेषित पौलाने सरळसोट शब्दांत सांगितले, की यहुदी सण “पुढे येणाऱ्‍या गोष्टींची प्रतिछाया” होते व पुढे तो असेही म्हणतो की, “वास्तवता तर ख्रिस्तच आहेत.” (कलस्सैकर २:१६, १७; [कलोसे] मराठी कॉमन लँग्वेज बायबल) यास्तव, खरे ख्रिस्ती पुढील शास्त्रवचनीय युक्‍तिवाद स्वीकारतात: “परराष्ट्रीय जे यज्ञ करितात ते देवाला नव्हे तर भुतांना करितात; . . . तुमच्याने प्रभूचा प्याला व भुतांचाहि प्याला पिववत नाही.” (१ करिंथकर १०:२०, २१) शिवाय, “जे अशुद्ध त्याला शिवू नका” या निर्देशनाचे पालन ख्रिस्ती करतात. तुमच्या परिसरातील कापणीच्या सणाचा संबंध मूर्तिपूजेशी किंवा खोट्या धर्माशी आहे का? असल्यास, खरे ख्रिस्ती अशा कोणत्याही प्रकारच्या दूषित उपासनेत समाविष्ट होण्यास नकार दर्शवतात व यहोवाला नाखुश करण्याचे टाळतात.—२ करिंथकर ६:१७.

एखाद्या कृतज्ञ मुलाला आपल्या वडिलांकडून बक्षिस मिळते तेव्हा तो कोणाचे आभार मानतो बरे? एखाद्या परक्याचे की आपल्या पालकाचे? मनापासून प्रार्थना करून देवाचे सेवक, त्यांचा स्वर्गीय पिता, यहोवा याच्या विपुल औदार्याचे दररोज आभार मानतात.—२ करिंथकर ६:१८; १ थेस्सलनीकाकर ५:१७, १८.

[तळटीपा]

a “लामास” हा शब्द एका पुरातन इंग्रजी शब्दातून घेतलेला आहे ज्याचा अर्थ “भाकर-मास” असा होतो.

b शास्त्रचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) म्हणते: “वनस्पती रक्‍तहीन असल्यामुळे निर्मितीच्या तिसऱ्‍या ‘दिवशी’ (उत्प १:११-१३) अथवा त्यानंतर निर्माण केलेल्या वनस्पती जीवनाला अनुलक्षून नेफेश (जीव) याचा उपयोग केलेला नाही.”—वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा