वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ८/१५ पृ. ३१
  • तुम्हाला आठवते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला आठवते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • येशू जेव्हा राज्य वैभवात येईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • तुम्ही इतरांनाही सांगू शकता असे रहस्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • ख्रिश्‍चनांनी गुप्त ठेवण्याचे धाडस करू नये असे एक रहस्य!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • पवित्र गूज उलगडते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ८/१५ पृ. ३१

तुम्हाला आठवते का?

टेहळणी बुरूजचे अलीकडील अंक तुम्हाला व्यावहारिक दृष्टीने मोलाचे वाटले का? तर मग, खालील प्रश्‍नांच्या साहाय्याने तुम्हाला किती आठवते हे पडताळून पाहण्यात काय हरकत आहे?

◻ हर्मगिदोन कसे असेल? (प्रकटीकरण १६:१४, १६)

ते एखाद्या आण्विक महासंकटासारखे किंवा मानवांनी घडवून आणलेल्या विपत्तीसारखे नसेल. ते तर देवाचे युद्ध आहे, जे सर्व मानवी युद्धांचे उच्चाटन करील, अशा युद्धांना प्रोत्साहन देणाऱ्‍यांचाही समूळ नाश करील आणि शांतिप्रिय लोकांसाठी खरी शांती आणील. त्याला विलंब लागणार नाही. (हबक्कूक २:३)—४/१५, पृष्ठ १७.

◻ कोणत्या प्रकारचा विवाह यहोवाला सन्मानित करतो?

लग्नात आध्यात्मिक बाबी जेव्हा जगिक मार्गांवर वर्चस्व गाजवतात तेव्हा खरोखरच यहोवाचा आदर होईल. जगाच्या रूढीपरंपरा, अंधश्रद्धा आणि अतिरेक टाळून, नेहमीच्या ईश्‍वरशासित कार्यांमध्ये व्यत्यय न आणण्याद्वारे आणि दिखाऊपणाऐवजी मर्यादशीलता प्रदर्शित करण्याद्वारे ख्रिस्ती या प्रसंगाचा आनंद घेतील.—४/१५, पृष्ठ २६.

◻ सचोटी राखणाऱ्‍या माणसाची लक्षणे कोणती?

सचोटी राखणाऱ्‍या माणसावर भरवसा टाकला जाऊ शकतो, केवळ त्याचे सोबतीच नव्हे तर त्याहून महत्त्वाचे म्हणजे स्वतः देव सुद्धा त्याच्यावर भरवसा टाकेल. त्याचे शुद्ध मन त्याच्या कार्याद्वारे उघड होते. त्याच्याठायी कोणत्याही प्रकारची दांभिकता नसते. तो फसविणारा किंवा भ्रष्ट नसतो. (२ करिंथकर ४:२)—५/१, पृष्ठ ६.

◻ “मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे,” असे यिर्मयाने का म्हटले? (विलापगीत ३:२७)

एखादा इसम त्याच्या तारुण्यात संकटांना तोंड देतो तेव्हा तो त्याच्या प्रौढावस्थेत येणाऱ्‍या आव्हानात्मक परिस्थितींना तोंड देण्याचे देखील शिकत असतो. (२ तीमथ्य ३:१२) हातमिळवणी केल्यामुळे जरी तात्पुरती सुटका झाली तरी विश्‍वासू राहिल्यामुळे मिळणारे लाभ त्यापेक्षाही अधिक आहेत.—५/१, पृष्ठ ३२.

◻ रूपांतराच्या दृष्टान्तात मोशे व एलिया दिसल्यामुळे काय पूर्वसूचित झाले?

रूपांतराच्या संदर्भात, मोशे व एलिया हे येशूच्या अभिषिक्‍त बांधवांना सूचित करणाऱ्‍या उचित प्रतिमा आहेत. येशूसोबत ते देखील “तेजोमय” दिसले, यावरून सूचित झाले की स्वर्गीय राज्य व्यवस्थेत विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिस्तीजनांना “त्याच्याबरोबर [येशूबरोबर] गौरव प्राप्त” होईल. (लूक ९:३०, ३१; रोमकर ८:१७; २ थेस्सलनीकाकर १:१०)—५/१५, पृष्ठे १२, १४.

◻ देवाचे ‘पवित्र रहस्य’ म्हणजे काय? (१ करिंथकर २:७)

देवाचे ‘पवित्र रहस्य’ येशू ख्रिस्तावर केंद्रित आहे. (इफिसकर १:९, १०) तथापि, त्यात केवळ येशूची वाग्दत्त मशीहा या नात्याने ओळखच समाविष्ट नाही; तर, त्यामध्ये एक स्वर्गीय सरकार, देवाचे मशिही राज्य आहे आणि देवाच्या उद्देशांमध्ये येशूला दिलेल्या भूमिकेचा देखील त्यात समावेश होतो.—६/१, पृष्ठ १३.

◻ वार्धक्य किंवा आजारपण याविषयी एखाद्या ख्रिश्‍चनाचा कसा दृष्टिकोन असावा?

अशाप्रकारच्या परीक्षांमुळे यहोवाची आपली सेवा मर्यादित झाली आहे, असा विचार करण्याऐवजी, यामुळे यहोवावर विसंबून राहण्याची आणखी एक संधी मिळाली आहे, या दृष्टीने त्याने त्यांकडे पाहावे. त्याने हे देखील लक्षात असू द्यावे, की एखाद्या ख्रिश्‍चनाच्या मोलाचे मोजमाप तो किती कार्य करतो यावरून नव्हे, तर त्याच्या विश्‍वासाद्वारे आणि गाढ प्रीतीद्वारे केले जाते. (मार्क १२:४१-४४.)—६/१, पृष्ठ २६.

◻ यहोवाने देवदूतांऐवजी मनुष्यांकडून बायबलचे लिखाण करवून घेतले, यातून त्याची मोठी सुज्ञता कशी दिसून येते?

मानवी घटक अजिबातच नसता तर कदाचित बायबलचा संदेश आत्मसात करण्यास आपल्याला फार जड गेले असते. या मानवी घटकामुळे बायबलमधला मजकूर उबदार, वैविध्यपूर्ण आणि अपीलकारक बनला आहे.—६/१५, पृष्ठ ८.

◻ कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य काय आहे?

कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य देवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये तसेच त्यातील आत्मसंयम, मस्तकपदाला मान्यता, चांगले दळणवळण, आणि प्रीती यांसारख्या तत्त्वांचे अनुसरण करण्यामध्ये आढळते.—६/१५, पृष्ठे २३, २४.

◻ येशूने केलेली रोगमुक्‍ती आज सर्वसामान्यपणे जे काही दिसते किंवा जो दावा केला जातो त्यापेक्षा कोणत्या अर्थाने फार वेगळी होती?

लोकसमुहात तीव्र भावनात्मक प्रदर्शने होत नव्हती किंवा येशू चित्तभ्रम झाल्याचे नाटक करीत नव्हता. शिवाय, आजाऱ्‍यांनी दिलेली वर्गणी उदार मनाने नव्हती किंवा त्यांच्यामध्ये विश्‍वासाची उणीव होती अशी सबब सांगून येशूने त्यांना बरे करण्याचे कधीच टाळले नाही.—७/१, पृष्ठ ५.

◻ आपले नाव व राज्य यांसंबंधीच्या आपल्या ईश्‍वरी उद्देशात लोकांना स्थान मिळावे म्हणून यहोवाने त्यांना कोणकोणत्या मार्गांनी साहाय्य केले आहे?

पहिले, यहोवाने आपल्या लोकांना सत्य बहाल केले आहे. दुसरा मार्ग म्हणजे, त्याने त्यांना आपला पवित्र आत्मा दिला आहे. आणि तिसरा मार्ग म्हणजे, आपला जागतिक बंधूसमाज व उपासनेकरता असलेली यहोवाची मनमोहक संघटनात्मक व्यवस्था.—७/१, पृष्ठे १९, २०.

◻ सद्‌गुण म्हणजे काय?

सद्‌गुण म्हणजे नैतिक गुणवत्ता, चांगुलपणा, योग्य आचार आणि विचार. हा एक निष्क्रीयतेचा गुण नसून एक सक्रिय, सकारात्मक गुण आहे. सद्‌गुण म्हणजे केवळ पाप करण्याचे टाळणे नव्हे; तर चांगला मार्ग अनुसरणे. (१ तीमथ्य ६:११)—७/१५, पृष्ठ १४.

◻ पालक आपल्या मुलांना देऊ शकतात असा सर्वात मौल्यवान वारसा कोणता?

पालक आपल्या मुलांना जो सर्वात मौल्यवान वारसा देऊ शकतात तो आहे इतरांविषयी प्रेम व्यक्‍त करण्यातील त्यांचे स्वतःचे उदाहरण. आपले पालक त्यांच्या प्रत्येक कृतीतून देवाबद्दल खरे प्रेम व्यक्‍त करतात आणि दाखवतात, हे मुलांना स्पष्टपणे पहायला आणि ऐकायला मिळणे गरजेचे आहे.—७/१५, पृष्ठ २१.

◻ परिणामकारक कौटुंबिक अभ्यासाच्या काही अटी कोणत्या आहेत?

कौटुंबिक अभ्यास नियमित असला पाहिजे. अभ्यासासाठी तुम्ही ‘वेळ साधली’ पाहिजे. (इफिसकर ५:१५-१७) बायबल सजीव बनवून अभ्यास मुलांकरता चेतनादायी बनवा. अभ्यासाचा आनंद लुटायचा असल्यास आपल्यालाही त्यात समाविष्ट केले आहे असे मुलांना वाटले पाहिजे.—८/१, पृष्ठे २६, २८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा