वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ८/१५ पृ. ३२
  • नात्सी छळादरम्यान ते खंबीर राहिले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नात्सी छळादरम्यान ते खंबीर राहिले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ८/१५ पृ. ३२

नात्सी छळादरम्यान ते खंबीर राहिले

जर्मनी नात्सी प्रभुत्वाखाली असताना, तेथील यहोवाच्या साक्षीदारांनी दाखवलेली निर्भय सचोटी आणि दुसरीकडे ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसनी जो पावित्रा घेतला होता, त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. इतिहासाचे प्राध्यापक, जॉन वाइस यांनी आइडियोलॉजी ऑफ डेथ्‌ या आपल्या पुस्तकात असे सूचित केले. ते लिहितात:

“१९३४ साली इव्हॅन्जेलिकल चर्चने ठामपणे प्रतिपादित केले, की ‘लुथरन मतप्रणालीने’ नात्सींचे ‘स्वागत’ करावे आणि जर्मन लोकांना एक ‘धार्मिक आणि विश्‍वासू अधिपती’ दिल्याबद्दल ‘प्रभू परमेश्‍वराचे’ धन्यवाद त्यांनी मानले. . . . एका प्रॉटेस्टंट बिशपने आपल्या पाळकवर्गाला लिहिले, ‘[हिटलर] यांना देवानेच आपल्याकरता पाठवले आहे.’” वाइस पुढे म्हणतात: “हिटलरने जर्मनीला बोल्शेव्हिक क्रांतीच्या टांगत्या तलवारीपासून वाचवले, शांती आणि स्थैर्य स्थापन केले, हे बिशप डीबेल्यूसचे मत जर्मन मेथोडिस्ट चर्चनेही मान्य केले. . . . मॉर्मन चर्चने आपल्या सदस्यांना असा उपदेश दिला की हिटलरचा विरोध करणे मॉर्मन कायद्याचे उल्लंघन करण्यासारखे आहे.” याशिवाय, ते म्हणतात: “कॅथलिकांना सांगण्यात आले होते की, नवीन सरकारचे आज्ञापालन करणे हे त्यांचे पवित्र कर्तव्य आहे, असे एक कर्तव्य जे पौर्वात्य युरोपात नात्सींनी केलेल्या भयंकर छळाची पाळकवर्गाला कल्पना आल्यावरही कायम राहिले.”

पण यहोवाच्या साक्षीदारांविषयी काय? प्राध्यापक वाइस यांनी निदर्शनास आणले की, “सामुहिकपणे केवळ यहोवाच्या साक्षीदारांनीच नात्सींचा प्रतिकार केला.” त्यांच्यापैकी हजारोंना कैद करण्यात आले होते, तरीसुद्धा प्राध्यापक वाइस पुढे सांगतात की, “खरे पाहता, आपण आपल्या विश्‍वासाचा त्याग करत आहोत असे लिहिलेल्या एका दस्तऐवजावर केवळ सही केल्यास छावणीत असलेल्या कोणत्याही साक्षीदाराला स्वतःची सहज सुटका करून घेता येत होती.”

यहोवाच्या साक्षीदारांच्या सचोटीविषयी, प्राध्यापक वाइस आपले मत सांगतात: “ख्रिस्ती धर्म एक प्रस्थापित संस्था बनण्याआधी आणि आपल्या विश्‍वासांची तडजोड न करता जगण्याच्या माणसाच्या इच्छेवर सामाजिक बांधीलकीने प्रभुत्व मिळवण्याआधी, आरंभीच्या ख्रिस्ती धर्मात जी विलक्षण दृढनिश्‍चयी आणि जोरदार ताकद होती त्याचे एक जिवंत उदाहरण ते आहेत. एका प्रॉटेस्टंट पाळकाने त्यांच्याविषयी लिहिल्यानुसार, ‘नात्सींच्या असुरी कोपापुढे खंबीर राहून स्वतःच्या विश्‍वासाच्या जोरावर त्यांच्याविरुद्ध हिमतीनं लढा दिला, तो मोठमोठ्या चर्चेसनी नव्हे, तर बदनाम करण्यात आलेल्या आणि तुच्छ लेखण्यात आलेल्या या लोकांनी.’”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा