वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ५/१५ पृ. २९
  • ‘ते आपल्या धार्मिक शिक्षणाचे पालन करतात’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘ते आपल्या धार्मिक शिक्षणाचे पालन करतात’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • मिळती जुळती माहिती
  • ‘आपल्याला प्रामाणिक लोक हवेत’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ५/१५ पृ. २९

‘ते आपल्या धार्मिक शिक्षणाचे पालन करतात’

अमेरिकेच्या फ्लॉरिडाच्या मियामी येथील एका महिलाने स्थानिक वृत्तपत्राला पुढीलप्रमाणे पत्र पाठवले: “डिसें. १० रोजी कुणीतरी जुन्या बाजारात माझ्या मुलाचे पाकीट मारले. त्यामध्ये त्याचे ड्रायव्हर्स लायसेन्स, सोशल सेक्युरिटी कार्ड, २६० अमेरिकी डॉलर इत्यादी, गोष्टी होत्या.

“झालेल्या हानीबद्दल मॅनेजरला सांगून तो घरी आला. संध्याकाळी त्याला, स्पॅनिश बोलणाऱ्‍या एका स्त्रीचा फोन आला. तिच्या वतीने बोलणाऱ्‍या [टेलिफोन] ऑपरेटरने त्याला सांगितले, की या स्त्रीला त्याचे पाकीट सापडले होते.

“तिने त्याला तिचा पत्ता दिला. . . . तिने त्याला त्याचे पाकीट दिले, त्यातले सर्व कागदपत्र आणि २६० डॉलर शाबूद होते.

“तिने चोराला त्याचे पाकीट चोरताना पाहिले तेव्हा तिने जोरजोराने आरडाओरडा केला. चोराने ते पाकीट खाली टाकले व तो पळून गेला. तोपर्यंत माझा मुलगा देखील तेथून निघून गेला होता, म्हणून तिने ते पाकीट घरी आणून आम्हाला फोन केला.

“ती आणि तिचे कुटुंब यहोवाचे साक्षीदार आहेत. ते आपल्या धार्मिक शिक्षणाचे पालन करतात हे स्पष्ट आहे.”

यहोवाचे साक्षीदार माणसांकडून प्रशंसा मिळण्याकरता प्रामाणिकपणा दाखवत नाहीत. (इफिसकर ६:७) उलट, त्यांचा स्वर्गीय पिता, यहोवा याची स्तुती व्हावी असे त्यांना मनापासून वाटते. (१ करिंथकर १०:३१) देव आणि आपल्या शेजाऱ्‍यांबद्दलची प्रीती त्यांना देवाच्या राज्याची “सुवार्ता” घोषित करण्यास प्रवृत्त करते. (मत्तय २४:१४) देव आपल्या राज्याद्वारे पृथ्वीचे एका रम्य परादीसमध्ये रुपांतर करण्याचे वचन देतो. तेव्हा पृथ्वी, केवळ नैसर्गिक सौंदर्याचेच नव्हे तर, सर्वकाळासाठी प्रामाणिकपणा टिकून राहील असे नैतिक सद्‌गुणांचे ठिकाण होईल.—इब्री लोकांस १३:१८; २ पेत्र ३:१३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा