जागतिक अन्नसाठ्याची हमी कोणत्या माध्यमाने?
“या शतकाच्या अधिकांश काळादरम्यान अन्नसाठ्याची जी हमी आपल्याला होती ती पुन्हा एकदा सर्वंकश प्रयत्न करूनही देता येऊ शकणार नाही,” असा वॉशिंग्टन डी.सी. मधील वर्ल्डवॉच इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, लेस्टर ब्राऊन यांचा दावा आहे. न्यू सायन्टिस्ट नियतकालिकाप्रमाणे, १९९५ च्या आरंभाला जगाचा धान्याचा साठा २५ कोटी ५० लाख टन इतका वधारला—जगाला केवळ ४८ दिवसांपर्यंत पुरेल इतकाच. पूर्वी हा साठा, ६० दिवसांच्या मर्यादेपलीकडे गेला तरीही त्यास भरून काढता येत होते. तथापि, आता वर्ल्डवॉचला पृथ्वीच्या नुकसान भरपाईच्या सामर्थ्याची खात्री नाही.
तीन वर्ष चांगले पीक न आल्याने आणि विकसनशील देशांनी आपल्या जनावरांच्या खाद्यासाठी धान्य वापरल्याने, रोजच्या आहारात उपयोग करणाऱ्या गोरगरिबांकरिता आज असे धान्य फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. न्यू सायन्टिस्टने बजावले की या परिस्थितीकडे ताबडतोब लक्ष दिले नाही तर, आपल्या मिळकतीतील ७० टक्के भाग आहारावर खर्च करणारे एक अब्ज लोक उपाशी मरतील.
बायबलने भाकीत केले, की आपल्या काळातील लोकांना ‘दुष्काळाचा’ सामना करावा लागेल. (लूक २१:११) पण, या विषयाकडे देव कानाडोळा करीत नाही. वस्तुतः त्याचे राज्य, पृथ्वीचे कारभार हाती घेईल तेव्हा मानवजातीच्या दैन्यावस्थेबद्दल त्याला कळकळ असल्याचे लवकरच दिसून येईल. तेव्हा ‘भूमी आपला उपज देईल.’ ‘भूमीत भरपूर पीक येईल, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलेल.’ (स्तोत्र ६७:६; ७२:१६) मग, निर्माणकर्त्याबद्दल हे भविष्यसूचक वचन पूर्ण होईल: “तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजविली आहे; तू तिला फार फलद्रूप करितोस; . . . खोरीहि धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत.”—स्तोत्र ६५:९, १३.
हे अद्भुत अभिवचन तुम्हाला अपीलकारक वाटते का? तुम्ही त्याचे भाग कसे होऊ शकता हे जाणून घेण्याची तुमची इच्छा आहे का? तर मग, पुढील वेळी यहोवाचे साक्षीदार तुमचे दार ठोठावतील तेव्हा त्यांना या वचनयुक्त परादीसबद्दल माहिती देण्यास सांगा. तुमच्या घरी कोणी येऊन तुमच्यासोबत मोफत गृह बायबल अभ्यास करण्याची तुमची इच्छा असेल तर, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ २ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर लिहा.
[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]
आतील चौकटीतील चित्र: Pictorial Archive (Near Eastern History) Est.