तुम्हाला आठवते का?
टेहळणी बुरूजाचे अलीकडील अंक तुम्ही लक्षपूर्वक वाचले का? तुम्ही वाचले असल्यास खालील प्रश्नांची उत्तरे आठविण्यास तुम्हाला मनोरंजक वाटेल:
◻ अक्विला आणि प्रिसिल्ला यांनी घालून दिलेल्या उत्तम उदाहरणाचे आज अनेक विवाहित जोडप्यांनी कशा प्रकारे अनुकरण केले आहे?
अक्विला आणि प्रिसिल्ला यांनी अनेक वेगवेगळ्या मंडळ्यांत सेवा केली. त्यांच्याप्रमाणे आधुनिक दिवसांतील अनेक ख्रिश्चनांनी अधिक आवश्यकता असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी स्वतःला उपलब्ध केले आहे. राज्य आस्थांमध्ये होणारी वृद्धी पाहून तसेच मौल्यवान ख्रिस्ती मैत्रिसंबंध विकसित होत असल्याचे पाहून त्यांनी आनंदाचा आणि समाधानाचा देखील अनुभव घेतला आहे.—१२/१५, पृष्ठ २४.
◻ मद्यार्कयुक्त पेयांविषयी बायबलचा कोणता दृष्टिकोन आहे?
मद्यार्कयुक्त पेयांविषयी बायबलचा दृष्टिकोन संतुलित आहे. एकीकडे, बायबल सांगते, की मद्यार्क एका प्रकारे देवाचे बक्षीस आहे. (स्तोत्र १०४:१, १५) दुसरीकडे पाहता, ते पिण्याच्या अतिरेकास मज्जाव करते. (लूक २१:३४; १ तीमथ्य ३:८ तीत २:३ १ पेत्र ४:३)—१२/१५, पृष्ठ २७.
◻ बायबलमधील हाग्गय नामक पुस्तकाचा कोणता उल्लेखनीय पैलू आहे?
हाग्गय हे पुस्तक जरी केवळ ३८ वचनांचे मिळून बनले असले तरी या पुस्तकात ३५ वेळा देवाच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. यहोवा या नावाऐवजी “प्रभू” ही पदवी घातली जाते तेव्हा अशा प्रकारची भविष्यवाणी निर्जीव वाटते.—१/१, पृष्ठ ६.
◻ दावीद आणि मनश्शे यांनी केलेल्या पातकांपासून कोणता धडा शिकता येतो?
यहोवाने दावीदाला आणि मनश्शेला क्षमा केली होती तरी देखील या दोघा मनुष्यांना—त्यांच्याबरोबर इस्राएलास—त्यांच्या पापमय कृत्यांच्या परिणामांनिशी जीवन जगावे लागले. (२ शमुवेल १२:११, १२; यिर्मया १५:३-५) त्याचप्रमाणे, पश्चात्तापी पापी लोकांस यहोवा क्षमा करतो तरी सुद्धा त्यांच्या कृत्यांचे असे काही परिणाम असू शकतात जे टाळता येऊ शकत नाहीत.—१/१, पृष्ठ २७.
◻ कोणत्या प्रकारे देवाच्या राज्याच्या ‘सुवार्तेची घोषणा करणाऱ्यांचे चरण’ “मनोरम” आहेत? (यशया ५२:७)
इतरांना प्रचार करायला जाताना एखाद्याचे चरणच त्याला ठिकठिकाणी नेत असतात. असे चरण निश्चितच त्या व्यक्तीचे प्रतिनिधीत्व करतात. म्हणून जे राज्याच्या सुवार्तेचा संदेश ऐकणाऱ्यांसाठी आणि त्यास प्रतिसाद देणाऱ्यांसाठी अशा प्रकारच्या संदेशवाहकांचे चरण खरोखरच सुंदर आहेत.—१/१५, पृष्ठ १३.
◻ ‘सुवार्तेची घोषणा करण्यात’ कोणत्या प्रकारचे दुहेरी कार्य सामावलेले आहे? (१ करिंथकर ९:१६)
पहिली गोष्ट म्हणजे, आपण देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा केली पाहिजे. दुसऱ्या पैलूत, राज्य घोषणेला अनुकूल प्रतिसाद देणाऱ्यांना शिकविणे समाविष्ट आहे.—१/१५, पृष्ठ २३.
◻ मंडळीच्या सभांच्यावेळी राज्य सभागृहात राज्यगीते गायल्यामुळे कोणते व्यक्तिगत लाभ मिळतात?
आपल्या निर्माणकर्त्याविषयी असणाऱ्या आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी आपल्याला गायनामुळे मिळते. (स्तोत्र १४९:१, ३) मंडळीच्या गायनात अंतःकरणपूर्वक गायल्यामुळे त्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमासाठी आपले मन आणि हृदय योग्य स्थितीत येऊ शकते. यहोवाच्या उपासनेत अधिक भाग घेण्यासाठी आपण प्रेरित होऊ शकतो.—२/१, पृष्ठ २८.
◻ जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा असे का म्हटले जाऊ शकते? (उपदेशक ७:१)
एखाद्याने आपल्या जीवनात मरणाऱ्या विश्वासू जनांना पुनरुत्थित करण्यास समर्थ असलेल्या यहोवाच्या नजरेत नावलौकिक मिळवल्यास त्याचा मृत्युदिन जन्मदिनापेक्षा बरा ठरू शकतो. (योहान ११:२५)—२/१५, पृष्ठ १२.
◻ उपदेशकाच्या पुस्तकातून व्यक्तिगतरित्या आपल्याला का फायदा मिळू शकतो?
आपल्या जीवनाबद्दलच्या आणि आपण कोणत्या गोष्टींवर जीवन केंद्रीत करतो याविषयीच्या आपल्या दृष्टिकोनात सुयोग्य फेरबदल करण्यासाठी हे पुस्तक आपल्याला मदत करू शकते. (उपदेशक ७:२; २ तीमथ्य ३:१६, १७)—२/१५, पृष्ठ १६.
◻ यहोवाचे साक्षीदार मूलतत्त्ववादी आहेत का?
नाही. त्यांची ठाम धार्मिक मते असली तरी, मूलतत्त्ववादी ही संज्ञा ज्याप्रमाणे वापरण्यात येते त्या अर्थाने ते नाहीत. ज्यांच्याशी त्यांचे एकमत होत नाही अशांविरुद्ध ते कोणतीही प्रदर्शने किंवा हिंसा करत नाहीत. ते, आपला नेता येशू ख्रिस्त याचे अनुकरण करतात.—३/१, पृष्ठ ६.
◻ देवाच्या वतीने बदला घेण्यासाठी येशू नेमका केव्हा येणार हे ठाऊक नसण्याचा ख्रिश्चनांवर कोणता परिणाम होतो?
यामुळे ख्रिश्चन जागृत राहतात आणि आपण निःस्वार्थ हेतूंनी यहोवाची सेवा करीत आहोत हे सिद्ध करण्याची त्यांना दररोज संधी मिळते.—३/१, पृष्ठ १३.
◻ कोणा बांधवाने आपल्याला ठकविल्यास त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याआधी आपण कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे?
आपल्यावर, दुसऱ्या व्यक्तींवर, मंडळीवर आणि बाहेरच्या लोकांवर त्याचा काय परिणाम होईल हे आपण लक्षात घ्यायला हवे. (१ करिंथकर ६:७)—३/१५, पृष्ठ २२.
◻ खरा आनंद कसा प्राप्त केला जाऊ शकतो?
खरा आनंद हा खरा विश्वास आणि यहोवा देवासोबतच्या चांगल्या नातेसंबंधावर आधारित हृदयाची एक अवस्था आहे. (मत्तय ५:३)—३/१५, पृष्ठ २३.
◻ एखाद्या ख्रिश्चनाला ज्यूरी कर्तव्याकरता बोलावले जाते तेव्हा त्याने काय करावे?
ज्यूरी कर्तव्याला तोंड देणाऱ्या प्रत्येक ख्रिश्चनाने बायबलविषयीची आपली समज व आपला स्वतःचा विवेक यांवर आधारित कोणत्या मार्गाचा अवलंब करावा ते ठरवले पाहिजे. (गलतीकर ६:५)—४/१, पृष्ठ २९.