लाखो लोक जात आहेत—तुम्हीही जाणार का?
पण कोठे? येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वार्षिक स्मरणोत्सवासाठी. १९९६ मध्ये संपूर्ण जगभरात १,२९,२१,९३३ इतके लोक उपस्थित होते. लोक का उपस्थित राहतात? येशूच्या मृत्यूचा मानवजातीसाठी जो अर्थ होतो त्या कारणास्तव. त्याचा अर्थ, आजारपण, दुःख आणि मृत्यूपासून सुटका. तसेच, मृत पावलेल्या प्रियजणांचे पुनर्स्थापित परादीसवरील पृथ्वीवर पुनरुत्थान केले जाईल. येशू ख्रिस्ताचा मृत्यू असे आशीर्वाद कसे आणू शकतो बरे? त्याचे परीक्षण करण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले जाते. यहोवाचे साक्षीदार या महत्त्वपूर्ण घटनेदरम्यान त्यांना येऊन भेटण्यास तुमचे स्वागत करतात. तुमच्या घराजवळच्या राज्य सभागृहात उपस्थित राहा. या वर्षी ती तारीख रविवार, मार्च २३ सूर्यास्तानंतर आहे. निश्चित वेळेकरता स्थानीय यहोवाच्या साक्षीदारांकडे चौकशी करा.