वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ३/१५ पृ. २४
  • फ्रान्समधील खोट्या आरोपांवर प्रतिक्रिया

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फ्रान्समधील खोट्या आरोपांवर प्रतिक्रिया
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ३/१५ पृ. २४

फ्रान्समधील खोट्या आरोपांवर प्रतिक्रिया

फ्रान्समधील यहोवाचे साक्षीदार अलीकडेच खोट्या आरोपांना बळी पडले होते. युरोप आणि जपानमधल्या धार्मिक तत्त्वप्रणालींसंबंधीच्या दुःखद घटनांचा फायदा घेऊन, प्रसिद्धी माध्यमाने यहोवाच्या साक्षीदारांविषयी विपर्यस्त माहिती पसरवली. सर्वात मोठा व घातक धर्म म्हणून त्यांचे चित्रण करण्यात आले.

या समस्येची तड लावण्याच्या प्रयत्नात, यहोवाच्या साक्षीदारांनी पुढील प्रश्‍नांची उत्तरे देणारी पत्रिका प्रकाशित केली: यहोवाचे साक्षीदार कोण आहेत? ते ख्रिस्ती आहेत का? ते वैद्यकीय उपचार स्वीकारतात का? ते घरोघरी का जातात? त्यांच्या कार्याला अर्थसाहाय्य कोठून मिळते? यहोवाचे साक्षीदार समाजाला फायदेकारक कसे आहेत?

फ्रेंच भाषेतील या माहितीयुक्‍त पत्रिकेचे शीर्षक, यहोवाचे साक्षीदार—तुम्हाला काय जाणून घेण्याची गरज आहे हे होते. होता होईल तितक्या लोकांपर्यंत ही पत्रिका पोहंचवण्याकरता एक मोहीम आखण्यात आली. मे १३ ते जून ९, १९९६ पर्यंत ९० लाखापेक्षा अधिक प्रतींचे वितरण करण्यात आले.

या पत्रिकेने पुष्कळांवर, सामाजिक अधिकाऱ्‍यांवरही प्रभाव पाडला. “यहोवाच्या साक्षीदारांवर करण्यात आलेली टीका पाहून मला संताप येतो,” असे प्रादेशिक परिषदेच्या एका सदस्याने पत्रिका वाचल्यावर लिहिले. “पुनः-पुन्हा तुमच्या कार्याच्या जनहितेच्छु आणि निःस्वार्थ कल्याणकारी उद्देशाची मला प्रशंसा वाटली आहे.” युरोपियन संसदेच्या एका सदस्याने ही पत्रिका वाचल्यावर असे लिहिले: “तुम्ही ज्या ख्रिश्‍चनांच्या गटाचे भाग आहात त्यामधील आणि इतर धर्मांमधील फरक बहुतांश लोकांना चांगलाच ठाऊक आहे.”

ब्रिटनीमध्ये एका साक्षीदाराने एका पाळकाला ही पत्रिका दिल्यावर त्यांनी लागलीच ती स्वीकारली. “तुमच्या कार्यासाठी मी तुमची प्रशंसा करतो,” असे ते पाळक म्हणाले. मग ते म्हणाले: “माझ्या चर्चच्या सदस्यांनी तुम्हाला घरात घ्यावं आणि एक कप कॉफी द्यावी असं उत्तेजन मी त्यांना देतो. तुम्ही माझ्या घरी भेट देऊन गेलात असं तुम्हाला भेटणाऱ्‍या इतरांनाही तुम्ही सांगू शकता. आणि हो, तुमची प्रकाशनं वाचायला मला आवडतात.”

ही पत्रिका मिळाल्यावर, एल्सास येथील एका प्रोटेस्टंट माणसाने वॉचटावर संस्थेला आपल्याला बायबल अभ्यास हवा आहे असे पत्राद्वारे कळवले. “चर्चवर आता माझा भरवसा नसल्याने, आध्यात्मिकरित्या पुन्हा एकदा सुरवात करण्याची माझी इच्छा आहे,” असे त्याने लिहिले. खोटे आरोप केलेले असतानाही, फ्रान्समधील यहोवाचे साक्षीदार—अर्थात, जगातील सर्व भागातले साक्षीदार—लोकांना बायबलमधील देवाच्या उद्देशांबद्दलचे अचूक ज्ञान मिळवण्यास मदत करत आहेत.—२ तीमथ्य ३:१६, १७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा