तुम्हाला आठवते का?
टेहळणी बुरूजाचे अलीकडील अंक वाचण्यास तुम्हाला आवडले का? अंक आवडले असल्यास खालील प्रश्नांची उत्तरे आठविण्यास तुम्हाला मनोरंजक वाटेल:
◻ मत्तय २४:३, २७, ३७, ३९ याठिकाणी वापरण्यात आलेल्या पराऊसिया या ग्रीक शब्दाचा अर्थ काय आहे?
वाईन यांचा नव्या करारातील शब्दांवर टीकात्मक शब्दकोश (इंग्रजी) म्हणतो: “पराऊसिया . . . आगमन तसेच त्यानंतर लगेच सोबतची उपस्थिती दाखवून देतो.” यास्तव, ते केवळ येण्याचा क्षण नव्हे तर आल्यानंतरच्या काळापासूनची उपस्थिती आहे.—८/१५, पृष्ठ ११.
◻ पहिल्या शतकात “मनुष्याचा” निभाव लागावा म्हणून ‘दिवस कसे कमी’ केले होते आणि या गोष्टीची मोठ्या प्रमाणात कशी पूर्णता होईल? (मत्तय २४:२२)
सा. यु. ६६ मध्ये रोमी सैन्याने जेरुसलेमवरील आपली मोहीम अचानकपणे थांबवून ख्रिस्ती ‘मनुष्यांस’ निभावण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे, आपण अशी अपेक्षा करतो, की मोठ्या बाबेलवरील हल्ला कसातरी कमी करण्यात येईल. यामुळे अभिषिक्त ख्रिस्ती आणि त्यांचे सोबती येणाऱ्या नाशातून बचावतील.—८/१५, पृष्ठे १८-२०.
◻ एखादा मनुष्य स्मारकविधीची बोधचिन्हे घेण्यास सुरवात करतो किंवा तसे करण्याचे थांबवतो तेव्हा आपली कोणती प्रतिक्रिया असण्यास हवी?
इतर ख्रिश्चनांना याविषयी चिंता करण्याची काही एक आवश्यकता नाही. येशूने म्हटले: “मी उत्तम मेंढपाळ आहे; . . . जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो.” अशाच प्रकारे, यहोवा अशा लोकांना ओळखतो ज्यांस त्याने आत्मिक पुत्र म्हणून निवडले आहे. (योहान १०:१४; रोमकर ८:१६, १७)—८/१५, पृष्ठ ३१.
◻ मोशेच्या नियमशास्त्राचा प्रमुख उद्देश कोणता होता?
प्रथमतः, त्याकरवी इस्राएली लोकांना त्यांच्या पापमय स्थितीतून सुटका करील अशा एका मशीहाची त्यांना गरज आहे याविषयीचे शिक्षण मिळाले. (गलतीकर ३:२४) नियमशास्त्राकरवी त्यांना ईश्वरी भय व आज्ञाधारकता यांचे देखील शिक्षण मिळाले तसेच अवतीभोवतीच्या राष्ट्रांतील नीतिभ्रष्ट रीतींपासून अलिप्त राहण्यास या नियमशास्त्राने इस्राएलास मदत केली. (लेवीय १८:२४, २५)—९/१, पृष्ठ ९.
◻ नव्या कराराचा कोणता उद्देश आहे? (यिर्मया ३१:३१-३४)
याचा उद्देश म्हणजे सर्व मानवजातीला आशीर्वादित करण्यासाठी राजे व याजकांनी बनलेले एक राष्ट्र उत्पन्न करणे. (निर्गम १९:६; १ पेत्र २:९; प्रकटीकरण ५:१०)—९/१, पृष्ठे १४, १५.
◻ दिलगिरी व्यक्त करण्याच्या कलेचा आपण अवलंब का करावा?
अपरिपूर्णतेमुळे होणारे दुःख कमी करण्यात दिलगिरी साहाय्य करू शकते आणि दिलगिरीमुळे कमकुवत नातेसंबंध पुर्ववत होऊ शकतात. आपण ज्या-ज्यावेळी दिलगिरी व्यक्त करतो त्या-त्यावेळी तो आपल्यासाठी नम्रतेचा धडा असतो आणि दिलगिरी इतरांच्या भावनांविषयी अधिक संवेदनशील होण्यासाठी आपल्याला प्रशिक्षण देत असते.—९/१५, पृष्ठ २४.
◻ नोहाच्या दिवसांतील जगव्याप्त जलप्रलय ही एक ऐतिहासिक घटना होती का?
होय. जगव्याप्त जलप्रलयाचा उल्लेख करणारा प्राचीन अहवाल अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत अर्थात संपूर्ण जगभरात पाहावयास मिळू शकतो. सर्वज्ञात असणारी ही घटना जगव्याप्त जलप्रलय होऊन गेला, या बायबलमधील वास्तविकतेस आणखी पुष्टी देते. (उत्पत्ति ७:११-२०)—९/१५, पृष्ठ २५.
◻ आतिथ्यामध्ये कशाचा आंतर्भाव होतो? (रोमकर १२:१३)
आतिथ्य हा शब्द, “प्रीती” व “अनोळखी व्यक्ती” या अर्थाच्या दोन मूळ शब्दांपासून बनलेल्या ग्रीक शब्दापासून अनुवादित केलेला आहे. त्याअर्थी, आतिथ्य याचा मुळात, “अनोळखी लोकांविषयी प्रीती” असा अर्थ होतो. परंतु त्यामध्ये तत्त्वावर आधारित, कर्तव्याच्या जाणिवेमुळे दाखवण्यात येणाऱ्या प्रेमापेक्षा अधिक काही गोवलेले आहे. ते प्रांजळ स्नेह, माया आणि मैत्री यांवर आधारित आहे.—१०/१, पृष्ठ ९.
◻ करिंथकराच्या पहिल्या पत्रातील ७ व्या अध्यायात विवाह आणि सडेपणा यांवर पौलाचा कोणता वादविवाद आहे?
विवाह कायदेशीर व विशिष्ट परिस्थितींमध्ये काहींकरता योग्य आहे. तरी देखील कमीतकमी विकर्षणांसह यहोवाची सेवा करू इच्छिणाऱ्या ख्रिस्ती पुरुषाकरता आणि स्त्रीकरता सडेपण निर्विवादपणे फायदेकारक आहे.—१०/१५, पृष्ठ १३.
◻ एखादा वडील कशाप्रकारे ‘आपल्या घरची व्यवस्था चांगली’ ठेवतो? (१ तीमथ्य ५:८)
वडिलाने आपल्या पत्नीसाठी आणि मुलांसाठी—‘आपल्या घरच्यांकरिता’—मानसिकरीत्या, आध्यात्मिकरीत्या आणि भावनात्मकरीत्या तरतूद करण्यास हवी.—१०/१५, पृष्ठ २२.
◻ यहोवा आपल्या सेवकांना कशा प्रकारे सांत्वन देतो?
यहोवाचा पवित्र आत्मा “सांत्वनकर्ता” म्हणून कार्य करतो. (योहान १४:१६, NW तळटीप) देव आणखी एका मार्गाने सांत्वन देतो तो मार्ग म्हणजे त्याचे वचन अर्थात बायबल. (रोमकर १५:४) देव आपल्या वैयक्तिक गरजा जाणतो व करिंथकरांबद्दल तीताने दिलेल्या अहवालामुळे जसे पौलाला सांत्वन लाभले तसेच एकमेकांस सांत्वन देण्यासाठी तो आपला उपयोग करून घेऊ शकतो. (२ करिंथकर ७:११-१३)—११/१, पृष्ठे १०, १२.
◻ २ करिंथकर १:३ येथे यहोवाचे “करुणाकर पिता” असे पौलाने केलेल्या वर्णनावरून काय सूचित होते?
“करुणाकर” भाषांतरित ग्रीक नाम, कोणा दुसऱ्याच्या कष्टाबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एका शब्दापासून येते. अशा प्रकारे क्लेश सोसत असलेल्या आपल्या विश्वासू सेवकांतील कोणाही संबंधाने देवाच्या करुणामय भावनांचे पौल वर्णन करतो.—११/१, पृष्ठ १३.
◻ वार्षिक प्रायश्चित्ताच्या दिवशी उपवास करण्याद्वारे इस्राएलांनी काय साध्य केले? (लेवीय १६:२९-३१; २३:२७)
प्रायश्चित्ताच्या दिवसाच्या पालनाने इस्राएल लोकांना त्यांच्या पापीपणाची व मुक्ततेच्या आवश्यकतेची मोठी जाणीव राखण्यास प्रवृत्त केले. याद्वारे त्यांनी आपल्या पातकांबद्दल दुःख व देवासमोर पश्चात्ताप व्यक्त केला.—११/१५, पृष्ठ ५.
◻ “आपल्या निर्माणकर्त्याला स्मर” असा सल्ला युवकांना देण्यात आला आहे, यावरून काय सूचित होते? (उपदेशक १२:१)
एक अधिकार सूत्र असे म्हणते, की ‘स्मरण’ भाषांतरित इब्री शब्द “मनातील स्नेहाचा व स्मरणासोबत घडणाऱ्या कृतीचा” अर्थ ध्वनित करतो. या सल्ल्याकडे लक्ष देण्यात यहोवाविषयी विचार करण्यापेक्षा अधिक काही गोवलेले आहे. यामध्ये कार्याचा समावेश होतो, अशा गोष्टी करणे ज्यामुळे तो आनंदित होतो.—१२/१, पृष्ठ १६.