वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १२/१५ पृ. २२-२४
  • अक्विला आणि प्रिसिल्ला एक आदर्श दांपत्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अक्विला आणि प्रिसिल्ला एक आदर्श दांपत्य
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तंबू बनविणारे
  • आतिथ्याची उदाहरणे
  • पौलासाठी त्यांनी ‘आपला जीव धोक्यात घातला’
  • सस्नेह दांपत्य
  • शिष्य बनवण्याच्या उद्देशाने प्रचार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “बोलत राहा, शांत राहू नकोस!”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • आपल्याला एकमेकांची गरज आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • तुम्हाला आठवते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १२/१५ पृ. २२-२४

अक्विला आणि प्रिसिल्ला एक आदर्श दांपत्य

“ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी, प्रिस्क व अक्विला ह्‍यांना सलाम सांगा; त्यांनी माझ्या जिवाकरिता आपला जीव धोक्यात घातला. त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्याहि मानतात.”—रोमकर १६:३, ४.

रोममधील ख्रिस्ती मंडळीला उद्देशून लिहिलेल्या पौलाच्या या शब्दांवरून या विवाहित दांपत्याविषयी त्याचे असलेले चांगले मत आणि त्यांच्याबद्दलचा स्नेह दिसून येतो. त्यांच्या मंडळीला लिहितेवेळी त्यांचे विस्मरण होऊ नये म्हणून त्याने खबरदारी घेतली. परंतु पौलाचे हे दोघे “सहकारी” कोण होते आणि ते पौलाचे तसेच मंडळींचे इतके प्रिय का होते?—२ तीमथ्य ४:१९.

अक्विला हा डायसपोराच्या (विकेंद्रित यहुदी) यहुदी असून तो उत्तरेकडील आशिया मायनरच्या पाँटसचा रहिवासी होता. तो आणि त्याची पत्नी प्रिसिल्ला (प्रिस्क) रोममध्ये स्थायिक झाले होते. पॉम्पीने जेरुसलेमवर सा. यु. पू. ६३ मध्ये ताबा मिळवला तेव्हापासून त्या शहरात यहुदी समाज मोठ्या प्रमाणात होता त्यावेळी मोठ्या संख्येने कैदी रोममध्ये गुलाम म्हणून नेण्यात आले. खरे तर, रोमी अभिलेखाप्रमाणे प्राचीन शहरात बारा किंवा त्यापेक्षा अधिक सभास्थाने होती. यहुद्यांनी सुवार्ता ऐकल्यानंतर रोममधील अनेक यहुदी सा. यु. ३३ मध्ये पेन्टेकॉस्टच्या वेळी जेरुसलेममध्ये उपस्थित होते. कदाचित त्यांच्याद्वारे ख्रिस्ती संदेश रोमी साम्राज्याच्या राजधानीत पहिल्यांदा पोहंचला असावा.—प्रेषितांची कृत्ये २:१०.

तथापि, सम्राट क्लौद्याच्या आदेशावरून सा. यु. ४९ किंवा ५० च्या सुरवातीच्या वर्षी यहुद्यांना रोममधून तडीपार करण्यात आले. यामुळे करिंथ या ग्रीक शहरात प्रेषित पौलाची अक्विला आणि प्रिसिल्लेशी गाठ पडली. पौल करिंथमध्ये आल्यानंतर अक्विला आणि प्रिसिल्ला यांनी त्याचे आतिथ्य केले आणि त्या दोघांचा तंबू बनविणे—हा समान व्यवसाय असल्यामुळे त्यास काम देखील दिले.—प्रेषितांची कृत्ये १८:२, ३.

तंबू बनविणारे

हे काही साधे काम नव्हते. जाड, कठीण सामुग्री किंवा चामडे कापणे आणि कापलेले तुकडे पुन्हा नीट शिवणे या गोष्टी त्यात गोवलेल्या होत्या. फर्नान्डो बियॉ या इतिहासकाराच्या मते “प्रवास करताना तळ ठोकण्यासाठी, ऊन आणि पावसापासून आश्रय म्हणून किंवा जहाजांच्या डेकच्या भागातील माल बांधण्याकरिता देखील वापरण्यात येणाऱ्‍या या जाड आणि कडक ताडपत्रीचे” तंबू बनविणाऱ्‍याला हे काम करण्यासाठी “कौशल्य आणि खबरदारीची आवश्‍यकता होती.”

यामुळे एक प्रश्‍न उभा राहतो. येणाऱ्‍या वर्षांत प्रतिष्ठित करियर मिळावे म्हणून ‘गमालिएलाच्या चरणांजवळ मी शिक्षण घेतले’ असे पौलाने म्हटले नव्हते का? (प्रेषितांची कृत्ये २२:३) हे खरे आहे, परंतु पहिल्या शतकातील यहुदी आपल्या मुलास उच्चशिक्षण प्राप्त करावयाचे असले तरी त्यास एखादा व्यवसाय शिकविणे आदरणीय मानत असत. यास्तव अक्विला आणि पौल या दोघांनी तंबू बनविण्याचे कौशल्य आपल्या लहानपणापासूनच प्राप्त केले असावे. या अनुभवाचे नंतर फार मोठे चीज झाले. परंतु ख्रिस्ती या नात्याने, अशा प्रकारचे प्रापंचिक काम म्हणजे सर्वकाही आहे असा त्यांनी विचार केला नाही. पौल याचे स्पष्टीकरण करतो, की करिंथमध्ये अक्विला आणि प्रिसिल्ला यांसोबत त्याने जे काम केले ते ‘कोणावरही भार न होता’ सुवार्तेची घोषणा करण्याच्या त्याच्या प्रमुख कार्यास हातभार लावण्याचे निव्वळ एक साधन होते.—२ थेस्सलनीकाकर ३:८; १ करिंथकर ९:१८; २ करिंथकर ११:७.

पौलाची मिशनरी सेवा सुकर होण्यासाठी आपल्याला जे काही शक्य आहे ते सर्व करण्यात अक्विला आणि प्रिसिल्ला आनंदी होते. कोणास ठाऊक, ग्राहकांना आणि येणाऱ्‍या-जाणाऱ्‍यांना अनौपचारिक साक्ष देण्यासाठी या तिघा मित्रांना किती वेळा आपले काम थांबवावे लागले! त्यांचे तंबू बनविण्याचे काम कमी दर्जाचे आणि कष्टाचे होते तरी ते त्यात इतके आनंदी होते, की राज्य आस्थांना विकसित करण्यासाठी त्यांनी “रात्रंदिवस” काम केले—अगदी त्याचप्रमाणे, आधुनिक दिवसांतील ख्रिस्ती आपला जास्तीत-जास्त वेळ लोकांना सुवार्ता ऐकविण्यात घालविण्यासाठी अंशिक किंवा हंगामी काम करतात.—१ थेस्सलनीकाकर २:९; मत्तय २४:१४; १ तीमथ्य ६:६.

आतिथ्याची उदाहरणे

पौलाचे करिंथमध्ये १८ महिने वास्तव्य होते त्या दरम्यान आपल्या मिशनरी कार्यहालचालींचा पाया म्हणून त्याने अक्विलाच्या घराचा कदाचित वापर केला असावा. (प्रेषितांची कृत्ये १८:३, ११) याची शक्यता आहे, की सीला (सिल्वान) आणि तीमथ्य मासेदोनियाहून आले तेव्हा त्यांना देखील अतिथी म्हणून बोलविण्यात त्यांना आनंद झाला असावा. (प्रेषितांची कृत्ये १८:५) थेस्सलनीकाकरांना लिहिलेली पौलाची दोन पत्रे, प्रेषित जेव्हा अक्विला आणि प्रिसिल्ला यांच्यासोबत राहत होता तेव्हा त्याने लिहिली असावीत जी नंतर बायबल प्रमाणित पुस्तकाचे भाग बनली.

या गोष्टीची कल्पना करणे सोपे आहे, की या काळात प्रिसिल्ला आणि अक्विलाचे घर ईश्‍वरशासित कार्याचा वास्तविक उगम होता. कदाचित याजशी अनेक प्रिय मित्र परिचित होते—स्तेफन आणि त्याचे कुटुंब, अखया प्रांतातील पहिले ख्रिस्ती ज्यांस पौलाने स्वतः बाप्तिस्मा दिला; तीत युस्त ज्याने आपले घर भाषणांसाठी वापरण्यास पौलाला संमती दिली आणि क्रिस्प जो सभास्थानाचा अधिकारी होता ज्याने आपल्या सर्व घरण्यासह सत्याचा स्वीकार केला. (प्रेषितांची कृत्ये १८:७, ८; १ करिंथकर १:१६) तसेच फर्तुनात आणि अखायिक; गायस ज्यांच्या घरांमध्ये मंडळीच्या सभा होत असाव्यात; एरास्त, शहर व्यवस्थापक; तार्तिय, सचीव ज्यास पौलाने रोमकरांना पत्र लिहिण्यास सांगितले आणि फीबी, शेजारील किंख्रिया या मंडळीतील विश्‍वासू बहिणीने करिंथचे पत्र रोममध्ये पोहंचवले असावे.—रोमकर १६:१, २२, २३; १ करिंथकर १६:१७.

प्रवासी सेवकांचे आतिथ्य करण्याच्या संधीचा ज्यांनी लाभ घेतला आहे त्या आजच्या आधुनिक दिवसांतील यहोवाच्या साक्षीदारांना हे ठाऊक आहे, की असे करणे किती उत्तेजनात्मक आणि स्मरणीय आहे. अशा प्रसंगी सांगण्यात येणारे प्रेरक अनुभव आपल्या सर्वांना आध्यात्मिकरीत्या ताजेतवाने करणारे खरे स्रोत ठरू शकतात. (रोमकर १:११, १२) अक्विला आणि प्रिसिल्लाप्रमाणे, स्वतःची घरे सभांसाठी कदाचित मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी उपलब्ध करून देणाऱ्‍यांना खऱ्‍या उपासनेस वृद्धिंगत करण्यास या प्रकारे हातभार लावण्यास शक्य झाल्याने आनंद आणि समाधान मिळते.

पौलासोबत अक्विला आणि प्रिसिल्लाची इतकी जिवलग मैत्री होती, की पौलाने सा. यु. ५२ च्या वसंत ऋतुमध्ये करिंथ सोडले तेव्हा त्यांनी त्यास इफिसपर्यंत प्रवासात सोबत दिली. (प्रेषितांची कृत्ये १८:१८-२१) अक्विला आणि प्रिसिल्ला त्या शहरात राहिले आणि तेथे त्यांनी प्रेषिताच्या पुढील भेटीसाठी पाया घातला. याच ठिकाणी बक्षीसरूपी सुवार्तेच्या शिक्षकांनी वक्‍तृत्वपूर्ण अपुल्लोसला आपल्या “जवळ बोलावून घेतले” आणि त्याला “देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे” दाखविण्यात त्यांना आनंद झाला. (प्रेषितांची कृत्ये १८:२४-२६) आपल्या तिसऱ्‍या मिशनरी यात्रेच्या दरम्यान पौलाने इफिसला पुन्हा भेट दिली तेव्हा सा. यु. ५२/५३ च्या हिवाळ्याच्या आसपास या आवेशी दांपत्याने देखभाल केलेले हे पीक कापणीसाठी तयार झाले होते. इफिस मंडळीच्या सभा अक्विलाच्या घरात होत होत्या तेव्हा पौलाने सुमारे तीन वर्षांपर्यंत तेथे प्रचार केला आणि ‘मार्ग’ शिकवला.—प्रेषितांची कृत्ये १९:१-२०, २६; २०:३१; १ करिंथकर १६:८, १९.

पुढे, जेव्हा अक्विला आणि प्रिसिल्ला रोमला परत आले तेव्हा देखील स्वतःचे घर ख्रिस्ती संभांसाठी उपलब्ध करून देण्याद्वारे पौलाचे हे दोघे मित्र “आतिथ्य करण्यात तत्पर” होते.—रोमकर १२:१३; १६:३-५.

पौलासाठी त्यांनी ‘आपला जीव धोक्यात घातला’

पौल इफिसमध्ये होता तेव्हा तोही अक्विला आणि प्रिसिल्लाच्या घरी राहिला असावा. रौप्यकारांच्या अतिक्षुब्ध काळात तो तेथे राहत होता का? प्रेषितांची कृत्ये १९:२३-३१ येथील अहवालानुसार, देव्हारे बनविणाऱ्‍या कारागिरांनी सुवार्तेच्या प्रचाराच्या विरोधात बंड पुकारले तेव्हा बांधवांनी, पौलाला जमावासमोर जाण्याची जोखीम पत्करू दिली नाही. काही बायबल टीकाकारांनी असा सिद्धान्त रचला आहे, की ही कदाचित इतकी धोकेदायक परिस्थितीही होती, की ‘आपण जगतो की मरतो’ असे पौलाला वाटले तसेच अक्विला आणि प्रिसिल्ला यांनी सुद्धा येणेतेणे प्रकारे पौलाकरिता ‘आपल्या जीव धोक्यात घातला’ होता.—२ करिंथकर १:८; रोमकर १६:३, ४.

“गलबला निवाल्यावर” पौलाने सुज्ञपणे ते शहर सोडले. (प्रेषितांची कृत्ये २०:१) यामध्ये कोणतीही शंका नाही, की अक्विला आणि प्रिसिल्ला यांनी विरोधास व उपहासास तोंड दिले. यामुळे ते निराश झाले का? उलटपक्षी, आपल्या ख्रिस्ती प्रयत्नांत अक्विला आणि प्रिसिल्ला धैर्याने कायम राहिले.

सस्नेह दांपत्य

क्लौद्याचे राज्यत्व संपुष्टात आल्यानंतर अक्विला आणि प्रिसिल्ला रोमला परतले. (रोमकर १६:३-१५) तथापि, त्यांचा बायबलमध्ये शेवटला उल्लेख आढळतो तेव्हा ते इफिसमध्ये परतल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. (२ तीमथ्य ४:१९) पुन्हा, शास्त्रवचनांतील इतर सर्व संदर्भ म्हणून या पती आणि पत्नीचा एकत्रितरीत्या उल्लेख करण्यात आला आहे. किती सस्नेह आणि संघटित दांपत्य! पौलाने जेव्हा अक्विलाचा विचार केला तेव्हा त्याला अक्विलाच्या पत्नीच्या विश्‍वासू सहकार्याचे विस्मरण होऊच शकत नाही. आपल्या सोबत्याला “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक” करण्यास शक्य होण्यासाठी समर्पित सोबत्याने एकनिष्ठ सहकार्य करावे म्हणून आजच्या ख्रिस्ती दांपत्यांसाठी किती उत्तम उदाहरण आणि असे केल्याने काही वेळा इतके साध्य होते जितके सडे राहिल्याने होत नाही.—१ करिंथकर १५:५८.

अक्विला आणि प्रिसिल्ला यांनी अनेक वेगवेगळ्या मंडळ्यांमध्ये सेवा केली. त्यांच्याप्रमाणे, आधुनिक दिवसांतील अनेक आवेशी ख्रिश्‍चनांनी अधिक आवश्‍यकता असणाऱ्‍या ठिकाणी जाण्यासाठी स्वतःला उपलब्ध केले आहे. राज्य आस्थांमध्ये होणारी वृद्धी पाहून तसेच सस्नेह व मौल्यवान ख्रिस्ती मैत्रिसंबंध विकसित होत असल्याचे पाहून ते आनंदाचा आणि समाधानाचा देखील अनुभव घेत आहेत.

ख्रिस्ती प्रेमाच्या आपल्या या उत्कृष्ट उदाहरणाद्वारे अक्विला आणि प्रिसिल्ला पौलाकडून आणि इतरांकडून मुल्यांकन प्राप्त करण्यास पात्र ठरले. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी स्वतः यहोवासोबत एक चांगला नातेसंबंध स्थापित केला. शास्त्रवचने आपल्याला आश्‍वासन देतात: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्री लोकांस ६:१०.

अक्विला आणि प्रिसिल्ला यांप्रमाणे स्वतःला खर्ची पाडण्याची संधी कदाचित आपल्याकडे नसेल तरी देखील आपण त्यांच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करू शकतो. ‘चांगले ते करणे आणि दान करणे, अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो’ याचे कधीही विस्मरण होऊ न देता पवित्र सेवेसाठी आपले सामर्थ्य आणि जीवन खर्च केल्यास आपल्याला खरे समाधान लाभेल.—इब्री लोकांस १३:१५, १६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा