वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १२/१ पृ. २९-३१
  • “पूर्वकाळचे दिवस आठवा” कशासाठी?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “पूर्वकाळचे दिवस आठवा” कशासाठी?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रेरणा व उत्तेजन
  • गत चुकांपासून शिकणे
  • विनयशीलता व कृतज्ञता
  • कधीही यहोवाला विसरू नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • जीवनाच्या धावेवर हार मानू नका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवाचे मार्ग जाणून घेणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • अनुवादाच्या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १२/१ पृ. २९-३१

“पूर्वकाळचे दिवस आठवा” कशासाठी?

“पूर्वकाळचे दिवस आठवा.” सा. यु. ६१ च्या सुमारास प्रेषित पौलाने लिहिलेला हा सल्ला, यहुदियातील इब्री ख्रिश्‍चनांना उद्देशून होता. (इब्री लोकांस १०:३२) कशामुळे त्याने हा शेरा मारला? यहोवाच्या त्या पहिल्या शतकातील उपासकांना गत काळच्या गोष्टींना न विसरण्याची आठवण करून देण्याची काय आवश्‍यकता होती? आज, अशाच प्रकारच्या स्मरणिकेकडे लक्ष देऊन आपणही लाभ मिळवू शकतो का?

अनेक शतकांपासून बायबल लेखकांनी, गतकाळाला कमी लेखण्याविरुद्ध अथवा त्याकडे लक्ष न देण्याविरुद्ध वारंवार इशारा दिला आहे. पूर्वीचा काळ व घटना ध्यानात ठेवून त्यांचा विचार करावयाचा होता. यहोवानेही असे म्हटले: “प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की, मीच देव आहे, दुसरा कोणी देव नव्हे, मजसमान कोणीच नाही.” (यशया ४६:९) हा सल्ला अनुसरण्यासाठी तीन शक्‍तिशाली कारणांचे आपण परीक्षण करू या.

प्रेरणा व उत्तेजन

पहिले, तो सल्ला प्रेरणा व उत्तेजनाचा स्रोत असू शकतो. पौलाने इब्री मंडळीला हे पत्र लिहिले तेव्हा तो, ज्यांच्या विश्‍वासाची परीक्षा यहुद्यांकडून येणाऱ्‍या छळामुळे रोज होत होती अशा सहख्रिश्‍चनांना लिहित होता. त्यांना सहनशीलता वाढवण्याची आवश्‍यकता आहे हे मान्य करून पौलाने म्हटले: “पूर्वकाळचे दिवस आठवा; त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली.” (इब्री लोकांस १०:३२) गत काळात आध्यात्मिक युद्धादरम्यान त्यांनी दाखवलेल्या निष्ठेच्या कृत्यांचे स्मरणच त्यांना शर्यत पूर्ण करण्यासाठी लागणारा धीर पुरवणार होता. त्याचप्रकारे, संदेष्टा यशयाने लिहिले: “तुम्ही हे आठवा व आपले वीरत्व दाखवा.” (यशया ४६:८, पंडिता रमाबाई भाषांतर) अशाच प्रकारचा इष्ट प्रभाव मनी बाळगून येशू ख्रिस्ताने इफिसमधील मंडळीला सांगितले: “म्हणून तू कोठून पतन पावला आहेस [आपली पहिली प्रीति सोडली] त्याची आठवण कर; व तू पश्‍चात्ताप करून आपली पहिली कृत्ये कर.”—प्रकटीकरण २:४, ५.

“पुरातन काळच्या दिवसाचे स्मरण कर, कैक पिढ्यांची वर्षे ध्यानात आण” हा आर्जव, मोशेने इस्राएल राष्ट्रास यहोवाला निर्भय निष्ठा दाखवण्यास विनवणी करताना दिलेल्या भाषणांतील आवर्तक विषय होता. (अनुवाद ३२:७) अनुवाद ७:१८ मधील त्याच्या शब्दांची नोंद द्या: “त्यांना [कनानी लोकांना] भिऊ नको; तुझा देव परमेश्‍वर ह्‍याने फारोचे व सर्व मिसर देशाचे काय केले हे चांगले आठव.” यहोवाने आपल्या लोकांच्या वतीने केलेल्या बचाव कृत्यांचे स्मरण, देवाच्या नियमांचे विश्‍वासूपणे निरंतर पालन करण्यासाठी एक प्रेरणा ठरावयाची होती.—अनुवाद ५:१५; १५:१५.

इस्राएल लोकांनी बहुतेकवेळा विसरून जाण्याचे पाप केले ही दुःखाची गोष्ट आहे. त्याचा परिणाम काय झाला? “पुन्हा पुन्हा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली, व इस्राएलाच्या पवित्र प्रभूस चिडविले. त्याच्या प्रतापी हस्ताचे त्यांस स्मरण झाले नाही; त्याने त्यांस शत्रूपासून सोडविले.” (स्तोत्र ७८:४१, ४२) कालांतराने, यहोवाच्या नियमांना विसरून गेल्याबद्दल त्याने त्यांना नापसंत केले.—मत्तय २१:४२, ४३.

“मी परमेशाची महत्कृत्ये वर्णीन; खरोखर मी तुझ्या पुरातन कालच्या अद्‌भुत कृत्यांचे स्मरण करीन. मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननहि करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन,” असे लिहिणाऱ्‍या स्तोत्रकर्त्याने एक उत्तम उदाहरण मांडले. (स्तोत्र ७७:११, १२) गतकाळातील निष्ठावान सेवांबद्दल व यहोवाच्या प्रेमळ कृत्यांवर मनन करण्याद्वारे आठवण केल्याने, आपल्याला आवश्‍यक असलेली प्रेरणा, उत्तेजन व समज मिळेल. तसेच, ‘पूर्वकाळचे दिवस आठवल्याने’ थकवा दूर करता येऊ शकतो व होता होईल तितके अधिक करण्यास प्रेरणा मिळू शकते तसेच, विश्‍वासूपणे सहनशील राहता येते.

गत चुकांपासून शिकणे

दुसरे, विसरून न जाणे, ही गोष्ट, गत चुकांपासून व त्यांच्या परिणामांतून धडा शिकण्याचा एक मार्ग ठरू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवून मोशेने इस्राएलांना सल्ला दिला: “रानात तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याला संतापविलेस, त्याची आठवण ठेव; विसरू नको. मिसर देशातून तुम्ही बाहेर निघाला तेव्हापासून ह्‍या ठिकाणी येऊन पोहंचेपर्यंत तुम्ही परमेश्‍वराविरुद्ध बंडच करीत आला आहा.” (अनुवाद ९:७) इस्राएलांनी केलेल्या या अवज्ञेचा परिणाम मोशेने दाखवल्याप्रमाणे ‘त्यांचा देव यहोवा ह्‍याने चाळीस वर्षे त्यांना रानातून चालवले.’ या गोष्टीचे स्मरण करण्यास त्यांना का प्रवृत्त करण्यात आले होते बरे? त्यांना नम्र बनवण्यासाठी व त्यांच्या बंडखोर मार्गांपासून त्यांना सुधारण्यासाठी, जेणेकरून ते ‘त्यांचा देव यहोवा ह्‍याच्या मार्गानी चालून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा ते पाळू शकतील.’ (अनुवाद ८:२-६) त्यांच्या गत चुकांची पुनरावृत्ती होऊ नये या अर्थाने त्यांना शिकायचे होते.

“दूरदर्शी मनुष्य व्यक्‍तिगत अनुभवावरून तर, सुज्ञ मनुष्य इतरांच्या अनुभवावरून लाभ मिळवतो,” असे एका लेखकाने निरीक्षले. मोशेने इस्राएल लोकांना त्यांच्या गत चुकांचा विचार करून लाभ मिळवण्यास सांगितले तर प्रेषित पौलाने इतरांना—पहिल्या शतकातील करिंथकर मंडळीला आणि असेच पुढे गेल्यावर आपल्यालाही—त्याच ऐतिहासिक अहवालातून धडा शिकण्याचा सल्ला दिला. त्याने लिहिले: “ह्‍या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर [इस्राएलींवर] गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या [इशाऱ्‍यासाठी] त्या लिहिल्या आहेत.” (तिरपे वळण आमचे.) (१ करिंथकर १०:११) पण येशू ख्रिस्ताने, “लोटाच्या बायकोची आठवण करा,” असे म्हटले तेव्हा बायबलमधील दुसरी एक प्राचीन घटना व त्यातून शिकण्याची गरज त्याच्या मनात होती. (लूक १७:३२; उत्पत्ति १९:१-२६) सॅम्युएल टेलर कॉलरिज या इंग्रज कवी व तत्त्वज्ञानीने लिहिले: “मनुष्यांनी इतिहासातून धडे शिकून घेतले तर किती तरी धडे तो आपल्याला शिकवू शकतो!”

विनयशीलता व कृतज्ञता

तिसरे, गत गोष्टींची आठवण केल्याने देवाला आवडणारे गुण जसे, की विनयशीलता व कृतज्ञता आपल्यामध्ये उत्पन्‍न होऊ शकतात. आपल्या जगव्याप्त आध्यात्मिक परादीसच्या अनेक पैलूंचा आपण आनंद लुटत असताना ते पैलू काही विशिष्ट मूलभूत घटकांवर आधारित आहे हे आपण विसरून चालता कामा नये. यामध्ये निष्ठा, प्रीती, आत्मत्याग, विपत्तीत असताना धैर्य, सहनशीलता, सोशिकपणा व विश्‍वास यांचा समावेश होतो. हे गुण, अनेक दशकांआधी विविध देशांमध्ये कार्य सुरू करणाऱ्‍या आपल्या ख्रिस्ती बंधू आणि भगिनींनी प्रदर्शित केले आहेत. मेक्सिकोमधील देवाच्या लोकांच्या आधुनिक दिवसातील इतिहासाच्या अहवालाच्या शेवटी, १९९५ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक (इंग्रजी) ने म्हटले: “अलीकडेच यहोवाच्या साक्षीदारांच्या सहवासात आलेल्यांना, मेक्सिकोत कार्याची सुरवात करण्यात भाग घेतलेल्यांनी सामना केलेल्या परीक्षा विस्मयकारक वाटतील. कारण विपुल प्रमाणात आध्यात्मिक अन्‍न असलेल्या, लाखो देवभीरू सोबती असलेल्या व देवाची सेवा पूर्णपणे संघटित पद्धतीने केली जाते अशा एका आध्यात्मिक परादीसची त्यांना सवय झाली आहे.”

ते आरंभीचे आद्यप्रवर्तक बहुतेकवेळा एकएकटे किंवा लहानशा एकाकी गटात कार्य करीत असत. राज्य संदेशाची घोषणा करण्यात टिकून असताना त्यांनी एकाकीपणा, नागवणूक व सचोटीच्या इतर कडक परीक्षांचा सामना केला. गत काळातील या सेवकांपैकी अनेकांचा मृत्यू झाला असला तरी त्यांची विश्‍वासू सेवा यहोवाच्या स्मरणात आहे हे जाणणे किती उत्साहजनक आहे! “तुमचे कार्य व . . . तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही,” असे प्रेषित पौलाने लिहिले तेव्हा त्याने याची खात्री दिली. (इब्री लोकांस ६:१०) यहोवा जर या गोष्टींची कदर बाळगत त्यांची आठवण करतो तर कृतज्ञपूर्वक आत्म्याने आपणही तसे करू नये का?

सत्याशी नव्याने परिचित झालेले हे ऐतिहासिक यथार्थदर्शन यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषकa (इंग्रजी), या प्रकाशनातून प्राप्त करू शकतात. तसेच, दीर्घकाळापासून सेवा करत आलेल्या वृद्ध बंधू व भगिनींचा समावेश असलेल्या कुटुंबाचा अथवा एखाद्या ख्रिस्ती मंडळीचा भाग होण्याचा सुहक्क आपल्याला मिळालेला आहे तर, अनुवाद ३२:७ च्या वचनातील सार आपल्याला, “पुरातन काळच्या दिवसाचे स्मरण कर, कैक पिढ्यांची वर्षे ध्यानात आण; आपल्या बापाला विचार, तो तुला निवेदन करील; आपल्या वडील जनास विचार ते तुला सांगतील,” असे आर्जवते.

ईश्‍वरी भक्‍तीच्या पूर्व कृत्यांचे स्मरण केल्यामुळे, आपल्या ख्रिस्ती सेवेत आनंदाने टिकून राहण्यास आपल्याला प्रेरणा मिळू शकते. तसेच, इतिहासात शिकण्याजोगे धडेही आहेत. देवाचा आशीर्वाद असलेल्या आध्यात्मिक परादीसवरील मनन आपल्यामध्ये विनयशीलता व कृतज्ञता हे साजेसे गुण उत्पन्‍न करते. खरेच, “पूर्वकाळचे दिवस आठवा.”

[तळटीपा]

a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित केलेले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा